"देवा" पाव रे
हरिनामाच्या गजरात दरवर्षी
मोठ्या उत्साहात
निघणा-या पंढरीच्या
वारीत लाखो
लोक मोठ्या
भक्तिभावाने सहभागी
होतात.
याच काळात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
येते या
अधिवेशनात पालखी मार्ग आणि पंढरपूर
येथील सोयीसुविधांसाठी
शासनातर्फे लाखो रुपयांचा निधीही जाहीर
केला जातो.
परंतु तरीही वारक-यांना पावलोपावली
गैरसोयींचा सामना करावा लागतो आणि
वारी संपताच
आश्वासनेही हवेत विरून जातात. पालखीमार्गावरील
नद्यांचे प्रदूषण,
सार्वजनिक शौचालयाची समस्या यासारख्या गोष्टी
वारीवर साथीच्या
रोगांचे सावट
आणू शकतात. दरवर्षी
या समस्या सोडवण्यासाठी
सरकारकडून आश्वासने मिळतात मात्र त्याचा पाठपुरावा
होणे अत्यंत
गरजेचे आहे.
पावसाळ्यात रौद्र रूप धारण करणारे
साथीचे
रोग आणि स्वाईन फ्लू सारख्या
समस्यांवर मात करण्यासाठी आगोदरच उपाययोजनांचा
कार्यक्रम शासनाने हाती घ्यायला हवा.
त्याचप्रमाणे पालखीच्या मुक्कामासाठी
तळांसाठी ठराविक
भूखंड आरक्षित
करून वारकऱ्यांची
होणारी गैरसोय
थांबवता येऊ
शकते. दिवसेंदिवस
वाढणारी वारीतील
वारकऱ्यांची संख्या आणि त्यामानाने असणारा
सोयीसुविधांचा अभाव याकडे पाहून
विठ्ठलाआधी शासनाला साकडे घालण्याची वेळ
आता वारकऱ्यांवर
आली आहे.
त्यामुळे शासनाने
लोकांचा भक्तिभाव
आणि भावना
लक्षात घेऊन
गैरसोयी दूर
करण्यासाठी फिरती शौचालये,स्नानगृह ,अँब्युलन्स,
डॉक्टर्स आणि
पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करायला
हवी.
0 comments:
Post a Comment