Friday, 10 June 2016

सोन्यासारखी संधी

                                सोन्यासारखी संधी 

संधी हा एक शब्द कुणाच्या  आशा  पल्लवित करणारा तर कुणाच्या जगण्याला बळ देणारा शब्दबरेचवेळा आपण आपल्यापेक्षा यशस्वी व्यक्तीकडे   पाहूनत्याच्याबद्दल  आपल्या मनात इर्षा निर्माण करत तसेच मला देवाने अशी  एक  संधी द्यायला हवी होती असं म्हणून स्वतःच्या अपयशावर पांघरून घालतअसतो . परंतु नक्की संधी म्हणजे काय हेच आपल्याला माहित नसते आणि आपण सहज शक्य होणार्या णि दिलासा देणाऱ्या गोष्टींनाच संधी समजूनबसतोजगाच्या कानाकोपर्यात वावरताना एक  अनेक संधी आपल्या आजूबाजूला हवेप्रमाणे हरत असतात परंतु केवळ ती ओळखता  आल्याने त्याअखेरीस हवेतच विरून जातात आणि आपण नशिबाला दोष देत बसतोया संधीवरच वाचनात आलेली अतिशय समर्पक गोष्ट येथे आवर्जून मांडावीशी वाटते.
एका गावात एक गरीब आणि आळशी  माणूस  राहत असतो नेहमी इतरांच्या यशावर जळणारातो नेहमी मंदिरा जातो आणि देवाला म्हणतो "माझ्याआयुष्याचं सोनं कर". एके दिवशी देव त्याच्या स्वप्नात येतो आणि त्याला सांगतो किइथून दू सर्वांत उंच डोंगरावर तुला एक दगडाप्रमाणे  दिसणारा एकपरिसाचा तुकडा सापडेल त्याचा स्पर्श तू ज्या लोखंडी वस्तूला करशील िचे सोने होईल"  स्वतः च्या नशिबाला दोष देणारा तो माणूस परीस  शोधायलानिघाला.
त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचागळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झालासंपूर्ण डोंगर शंभरदा पालथा घातला त्यात दिवस गेले,महिने लोटले,वर्षे सरलीपण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही.दगड घ्यायचा,साखळीला लावायचा आणि मगतो फेकून द्यायचा.
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.णि ज्या क्षणि तो आपले शेवटचे ्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले.  तीसाखळी सोन्याची झाली होती,दगड घ्यायचासाखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे क्षच गेले नाही आणि परिणामी हातीआलेला परिस त्याला प्राप्त करता आला नाही.
थोडक्यात काय तर या परिसाचे अने दगड आपल्याकडे संधीच्या रूपाने येत असतात फक्त योग्य वेळी ोग्य संधीचा फायदा  घेत आल्याने आपण अपयशीहोतो.
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी एक उत्तम संधी  येत असतो कधी संकटाच्या रूपानेकधी मेहनतीच्या जोरावर ,तर कधी ज्ञानाच्या  बळावर  कोणत्या नाकोणत्या रूपात   आपल्याला भेटत असते  आणि आपल्या आयुष्याचे सोने करीत असतेपरंतु केवळ भीतीने,अपयशाने किंवा आत्मविश्वासाच्या अभावानेआपल्याला ती ओळखता येत नाही आणि आप हताशपणे दुसर्या संधीची वाट ाहत बसतोआपल्या  आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पणत्या क्षणाला आपण तिच्याकडे आंधळे पणाने पाहत असतोआणि अशीच एक छोटीशी संधी आपल्या  आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते.
संधी ओळखण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही फक्त त्या संधीकडे पाहण्याची आपली नजर बदलली ाहिजेबर्याचवेळा आपण संधीकडे नकारात्मकभावनेने अथवा आव्हान ्हणून पाहत असतो आणि परिणामी आपल्याला त्या संधीचे सोने करता ेत नाहीनोकरीव्यवसायात आणि कोणत्याही क्षेत्रात प्रगती   होण्याचं  महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक संधी ही आव्हान िंवा संकट  वाटणं हे होयफक्त आपली बघण्याची नजर आणि सकारात्मक दृष्टीकोनआपल्याला संधीचे सोने करून देऊ शकतात.
आपल्या आजूबाजूला घडणारे  बदलआलेल्या जबाबदाऱ्याघेतलेले निर्णय याकडं संधी म्हणून बघण्याचं सोडून आपण आव्हान म्हणून बघत आणिनकारात्मक भावनेने त्या गोष्टींना टाळतोत्यामुळे आपलं  नुकसान तर होतंचपरंतु संधी हि फक्त स्वप्नातच दिसते ती प्रत्यक्षात कधीही अवतरत नाही.
वार्याच्या वेगाने बदलणाऱ्या आजच्या युगात अनेक संधी आपल्यासमो स्वैरपणे लहरत आहेत आणि हीच ोग्य वेळ आहे त्या संधीला आपलेसे करून त्यासंधीने प्रगतीची मंदी घालविण्याची.
चला तर मग संकट असोआव्हान असो किंवा अजून काहीही असो त्याकडे आपण संधी म्हणूनच पाहूया आणि ोन्यासारख्या आयुष्याला नवी झळाळी देऊया.


सागर नवनाथ ननावरे 

0 comments:

Post a Comment

 
;