Friday, 17 June 2016

नवं ते हवं : बदल

            ✌🏻 नवं ते हवं"✌🏻
दर रविवारी प्रभात वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या प्रेरणादायक लेखमालेतील आजचा लेख
✌🏻 नवं ते हवं✌🏻
अवश्य वाचा
भेटुया पुढील रविवारी एका नवीन प्रेरणादायी विचारासह     

                नवं ते हवं
जुनं ते सोनंखरच अतिशय सुंदर आणि खूप छान संदेश देणाऱ्या या मराठीतल्या म्हणीच्या ओळी ऐकायला आणि बोलायलाही छान वाटतातपरंतु याच ओळीबर्याचदा त्रासदायक ठरतात जेव्हा कारण नसताना केवळ या ओळींचा वापर करून मनुष्य प्राणी  आपल्या दोषांवर आणि नाकर्तेपणावर पांघरून घालत असतो.आपल्या आवाक्यात नसणाऱ्या किंबहुना शक्य असतानाही केवळ प्रयत्न  केल्याने येणाऱ्या प्रसंगासाठी तर या ओळी अगदी सोयीस्कररित्या वापरल्याजातात.
कालपरवाच एक किस्सा घडला असंच एका सुसंस्कृत लोकांच्या एका सुंदर कार्यक्रमाला जाण्याचे निमंत्रण आम्हा दोन मित्रांना मिळालेत्याठिकाणी स्टेजवरबोलण्याची मला आणि माझ्या मित्राला संधी मिळणार होतीतसे आम्ही दोघे गावाकडचे  परंतु बालपणापासूनच प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारेआम्ही आमच्या परिसरातील एकमेवाद्वितीयचनिमंत्रण देणाऱ्या सरांनी आम्हा दोघांना छान सुटाबुटात यायला सांगितले त्या दृष्टीने मी तयारीही केलीदुसर्यादिवशी आम्ही दोघे मित्र त्या कार्यक्रमात भेटलो समोर माझ्या मित्राला पाहताच मी आवक झालो आणि त्याला विचारलं अरे जर सरांनी छान सुटाबुटात यायलासांगितले होते तर तू असा साध्या गणवेशात का आलास ?
तो क्षणभर थबकला आणि मोठ्या आवेशाने बोलला " गणवेशाने काय फरक पडणार?  हा माझा आवडता,लकी  आणि खूप जुना गणवेश आहे आणि तसाहीमला सुटा पेक्षा हाच ड्रेस चांगला दिसतो.
शेवटी "जुनं तेच सोनंअसतं मित्रा" .
मी काहीही बोललो नाही थोड्या वेळाने अशाच गप्पा रंगल्या असता मोबाईल चा विषय निघालाआणि  तो मित्र  आपल्या मोबाईलबद्दल मोठ्या अभिमानाने सांगू लागला कि, " आपण मोबाईल  महिन्यांपेक्षा जास्त वापरत नाही हा तर आताचा लेटेस्ट व्हर्जन आहेतेवढ्यात एक वात्रट मित्र संधी  सोडता  त्यालाउद्देशून पटकन बोलला "मग आता काय जुनं ते लोखंड ?' आणि सर्वच मोठमोठ्याने हसायला लागलेत्याचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा झाला होता.

मित्रांनो आपलंही असंच  असतं एखाद्या गोष्टीला आपण इतक्या परंपरा आणि जुन्या जोखंडात बांधून ठेवतो आणि दुसरीकडे मात्र आपण अप्रत्यक्षपणे नव्यागोष्टींच्या प्रहावात वाहत असतोखरं तर आपण प्रत्येकाने झपाट्याने बदलत्या जगातील सकारात्मक बदलांना आपण स्वीकारले पाहिजेजुन्यांतून बोधघ्यायला हवा आणि नव्याचा शोध  घ्यायला हवा.
बदलाबाबत कवी माधव ज्युलियन यांच्या या ओळी खूप काही सांगतात
""कायदा पाळा गतीचाकाळ मागे लागला,
थांबला तो संपला!
धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे."
याचाच अर्थ असा कि आपल्या वैभवशाली भूतकाळाला स्मरून  उज्जवल भवितव्यासाठी काळाबरोबर पुढे गेले पाहिजे म्हणजेच येणाऱ्या बदलाला आपणहीस्वीकारले पाहिजे.
बदलत्या काळासोबत चालल्यास प्रत्येक क्षेत्रात प्रगती करता येऊ शकतेत्यामुळे गतवैभवात रममाण राहण्यापेक्षा प्रत्येकाने होणारा बदल स्वीकारूनस्वतःचा आणि समाजाचा  विकास  साधला पाहिजे.
मात्र जे बदल आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या हितासाठीउन्नतीसाठी उपयुक्त असतील अशाच बदलांना आपण आपलंसं करायला हवं
सध्याच्या युगात आर्थिक,राजकीय,सामाजिक,वैज्ञानि आणि सर्वच क्षेत्रांत झपाट्याने बदल होत आहे आणि जो या बदलाला स्वीकारतो तोच आजच्या घडीलाकाहीतरी भव्यदिव्य करू शकतोसातत्याने अपडेट होणारे ज्ञान आणि तंत्रज्ञान सुपरफास्ट जगात आपल्याला नेहमी वेगवेगळी आव्हाने देत आहे आणि हीचआव्हाने आपण काळाबरोबर राहून स्वीकारल्यास हा काळच आपल्या प्रगतीला गती देऊ शकतोउद्याच्या आशेच्यायशाच्या सुर्योद्यासाठी आजच्या अंधारावरमात हि करावीच लागतेम्हणूनच सूर्यास्ताच्या काळोखातून आशेचा नवा किरण पहायचा असेल तर सूर्यास्ताच्या अंधाराला मागे ठेवावेच लागेल.
बदल हवा असेल तर
हवाच असतो जुन्याचा अस्त
हेच जणू शिकवीत असतो
नवीन पहाट घेवून येणारा सूर्यास्त
सुपरफास्ट जगात आपल्याला टिकून राहायचे असेल तर केवळ ज्ञान आणि अनुभवाने काहीही होणार नाही येणाऱ्या प्रत्येक बदलाला एक संधी समजून तिचेसोने केल्यास आपल्याला "जुनं ते सोनंम्हणण्याची वेळ येणार नाही.
चला तर मग बदलत्या दुनियेत बदलांना स्वीकारून आपल्या आयुष्यात एक सकारात्मक नवीन बदल घडवूया.

0 comments:

Post a Comment

 
;