Wednesday, 29 June 2016 0 comments
"देवा" पाव रे

हरिनामाच्या गजरात दरवर्षी मोठ्या उत्साहात निघणा-या  पंढरीच्या वारीत लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने  सहभागी होतातयाच काळात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येते या अधिवेशनात पालखी मार्ग आणि पंढरपूर येथील सोयीसुविधांसाठी शासनातर्फे लाखो रुपयांचा निधीही जाहीर केला जातो. परंतु तरीही  वारक-यांना पावलोपावली गैरसोयींचा सामना करावा लागतो आणि वारी संपताच आश्वासनेही हवेत विरून जातात. पालखीमार्गावरील नद्यांचे प्रदूषण, सार्वजनिक शौचालयाची समस्या यासारख्या गोष्टी वारीवर साथीच्या रोगांचे सावट आणू शकतातदरवर्षी या समस्या  सोडवण्यासाठी सरकारकडून आश्वासने मिळतात मात्र  त्याचा पाठपुरावा होणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाळ्यात रौद्र रूप धारण करणारे साथीचे  रोग आणि स्वाईन फ्लू सारख्या समस्यांवर मात करण्यासाठी आगोदरच उपाययोजनांचा कार्यक्रम शासनाने हाती घ्यायला हवा.

त्याचप्रमाणे पालखीच्या मुक्कामासाठी तळांसाठी ठराविक भूखंड आरक्षित करून वारकऱ्यांची होणारी गैरसोय थांबवता येऊ शकते. दिवसेंदिवस वाढणारी वारीतील वारकऱ्यांची संख्या आणि त्यामानाने असणारा सोयीसुविधांचा  अभाव याकडे पाहून विठ्ठलाआधी शासनाला साकडे घालण्याची वेळ आता वारकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने लोकांचा भक्तिभाव आणि भावना लक्षात घेऊन गैरसोयी दूर करण्यासाठी फिरती शौचालये,स्नानगृह ,अँब्युलन्स, डॉक्टर्स आणि पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करायला हवी
Friday, 17 June 2016 0 comments

नवं ते हवं : बदल

            ✌🏻 नवं ते हवं"✌🏻
दर रविवारी प्रभात वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या प्रेरणादायक लेखमालेतील आजचा लेख
✌🏻 नवं ते हवं✌🏻
अवश्य वाचा
भेटुया पुढील रविवारी एका नवीन प्रेरणादायी विचारासह     

                नवं ते हवं
जुनं ते सोनंखरच अतिशय सुंदर आणि खूप छान संदेश देणाऱ्या या मराठीतल्या म्हणीच्या ओळी ऐकायला आणि बोलायलाही छान वाटतातपरंतु याच ओळीबर्याचदा त्रासदायक ठरतात जेव्हा कारण नसताना केवळ या ओळींचा वापर करून मनुष्य प्राणी  आपल्या दोषांवर आणि नाकर्तेपणावर पांघरून घालत असतो.आपल्या आवाक्यात नसणाऱ्या किंबहुना शक्य असतानाही केवळ प्रयत्न  केल्याने येणाऱ्या प्रसंगासाठी तर या ओळी अगदी सोयीस्कररित्या वापरल्याजातात.
कालपरवाच एक किस्सा घडला असंच एका सुसंस्कृत लोकांच्या एका सुंदर कार्यक्रमाला जाण्याचे निमंत्रण आम्हा दोन मित्रांना मिळालेत्याठिकाणी स्टेजवरबोलण्याची मला आणि माझ्या मित्राला संधी मिळणार होतीतसे आम्ही दोघे गावाकडचे  परंतु बालपणापासूनच प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारेआम्ही आमच्या परिसरातील एकमेवाद्वितीयचनिमंत्रण देणाऱ्या सरांनी आम्हा दोघांना छान सुटाबुटात यायला सांगितले त्या दृष्टीने मी तयारीही केलीदुसर्यादिवशी आम्ही दोघे मित्र त्या कार्यक्रमात भेटलो समोर माझ्या मित्राला पाहताच मी आवक झालो आणि त्याला विचारलं अरे जर सरांनी छान सुटाबुटात यायलासांगितले होते तर तू असा साध्या गणवेशात का आलास ?
तो क्षणभर थबकला आणि मोठ्या आवेशाने बोलला " गणवेशाने काय फरक पडणार?  हा माझा आवडता,लकी  आणि खूप जुना गणवेश आहे आणि तसाहीमला सुटा पेक्षा हाच ड्रेस चांगला दिसतो.
शेवटी "जुनं तेच सोनंअसतं मित्रा" .
मी काहीही बोललो नाही थोड्या वेळाने अशाच गप्पा रंगल्या असता मोबाईल चा विषय निघालाआणि  तो मित्र  आपल्या मोबाईलबद्दल मोठ्या अभिमानाने सांगू लागला कि, " आपण मोबाईल  महिन्यांपेक्षा जास्त वापरत नाही हा तर आताचा लेटेस्ट व्हर्जन आहेतेवढ्यात एक वात्रट मित्र संधी  सोडता  त्यालाउद्देशून पटकन बोलला "मग आता काय जुनं ते लोखंड ?' आणि सर्वच मोठमोठ्याने हसायला लागलेत्याचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा झाला होता.

मित्रांनो आपलंही असंच  असतं एखाद्या गोष्टीला आपण इतक्या परंपरा आणि जुन्या जोखंडात बांधून ठेवतो आणि दुसरीकडे मात्र आपण अप्रत्यक्षपणे नव्यागोष्टींच्या प्रहावात वाहत असतोखरं तर आपण प्रत्येकाने झपाट्याने बदलत्या जगातील सकारात्मक बदलांना आपण स्वीकारले पाहिजेजुन्यांतून बोधघ्यायला हवा आणि नव्याचा शोध  घ्यायला हवा.
बदलाबाबत कवी माधव ज्युलियन यांच्या या ओळी खूप काही सांगतात
""कायदा पाळा गतीचाकाळ मागे लागला,
थांबला तो संपला!
धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे."
याचाच अर्थ असा कि आपल्या वैभवशाली भूतकाळाला स्मरून  उज्जवल भवितव्यासाठी काळाबरोबर पुढे गेले पाहिजे म्हणजेच येणाऱ्या बदलाला आपणहीस्वीकारले पाहिजे.
बदलत्या काळासोबत चालल्यास प्रत्येक क्षेत्रात प्रगती करता येऊ शकतेत्यामुळे गतवैभवात रममाण राहण्यापेक्षा प्रत्येकाने होणारा बदल स्वीकारूनस्वतःचा आणि समाजाचा  विकास  साधला पाहिजे.
मात्र जे बदल आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या हितासाठीउन्नतीसाठी उपयुक्त असतील अशाच बदलांना आपण आपलंसं करायला हवं
सध्याच्या युगात आर्थिक,राजकीय,सामाजिक,वैज्ञानि आणि सर्वच क्षेत्रांत झपाट्याने बदल होत आहे आणि जो या बदलाला स्वीकारतो तोच आजच्या घडीलाकाहीतरी भव्यदिव्य करू शकतोसातत्याने अपडेट होणारे ज्ञान आणि तंत्रज्ञान सुपरफास्ट जगात आपल्याला नेहमी वेगवेगळी आव्हाने देत आहे आणि हीचआव्हाने आपण काळाबरोबर राहून स्वीकारल्यास हा काळच आपल्या प्रगतीला गती देऊ शकतोउद्याच्या आशेच्यायशाच्या सुर्योद्यासाठी आजच्या अंधारावरमात हि करावीच लागतेम्हणूनच सूर्यास्ताच्या काळोखातून आशेचा नवा किरण पहायचा असेल तर सूर्यास्ताच्या अंधाराला मागे ठेवावेच लागेल.
बदल हवा असेल तर
हवाच असतो जुन्याचा अस्त
हेच जणू शिकवीत असतो
नवीन पहाट घेवून येणारा सूर्यास्त
सुपरफास्ट जगात आपल्याला टिकून राहायचे असेल तर केवळ ज्ञान आणि अनुभवाने काहीही होणार नाही येणाऱ्या प्रत्येक बदलाला एक संधी समजून तिचेसोने केल्यास आपल्याला "जुनं ते सोनंम्हणण्याची वेळ येणार नाही.
चला तर मग बदलत्या दुनियेत बदलांना स्वीकारून आपल्या आयुष्यात एक सकारात्मक नवीन बदल घडवूया.
Wednesday, 15 June 2016 0 comments

Ultimate
Message of the year

*नन्हीं - नन्हीं बच्चियों को . . .*
*. . . चार किताबें पढने दो  साहब . . .*

क्योंकि की.....

*कोख से बच आई हैं . . .*
*. . . . . दहेज से भी बच जायेगी .*

👏👏👏👏👏

Friday, 10 June 2016 0 comments

0 comments

सोन्यासारखी संधी

                                सोन्यासारखी संधी 

संधी हा एक शब्द कुणाच्या  आशा  पल्लवित करणारा तर कुणाच्या जगण्याला बळ देणारा शब्दबरेचवेळा आपण आपल्यापेक्षा यशस्वी व्यक्तीकडे   पाहूनत्याच्याबद्दल  आपल्या मनात इर्षा निर्माण करत तसेच मला देवाने अशी  एक  संधी द्यायला हवी होती असं म्हणून स्वतःच्या अपयशावर पांघरून घालतअसतो . परंतु नक्की संधी म्हणजे काय हेच आपल्याला माहित नसते आणि आपण सहज शक्य होणार्या णि दिलासा देणाऱ्या गोष्टींनाच संधी समजूनबसतोजगाच्या कानाकोपर्यात वावरताना एक  अनेक संधी आपल्या आजूबाजूला हवेप्रमाणे हरत असतात परंतु केवळ ती ओळखता  आल्याने त्याअखेरीस हवेतच विरून जातात आणि आपण नशिबाला दोष देत बसतोया संधीवरच वाचनात आलेली अतिशय समर्पक गोष्ट येथे आवर्जून मांडावीशी वाटते.
एका गावात एक गरीब आणि आळशी  माणूस  राहत असतो नेहमी इतरांच्या यशावर जळणारातो नेहमी मंदिरा जातो आणि देवाला म्हणतो "माझ्याआयुष्याचं सोनं कर". एके दिवशी देव त्याच्या स्वप्नात येतो आणि त्याला सांगतो किइथून दू सर्वांत उंच डोंगरावर तुला एक दगडाप्रमाणे  दिसणारा एकपरिसाचा तुकडा सापडेल त्याचा स्पर्श तू ज्या लोखंडी वस्तूला करशील िचे सोने होईल"  स्वतः च्या नशिबाला दोष देणारा तो माणूस परीस  शोधायलानिघाला.
त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचागळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झालासंपूर्ण डोंगर शंभरदा पालथा घातला त्यात दिवस गेले,महिने लोटले,वर्षे सरलीपण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही.दगड घ्यायचा,साखळीला लावायचा आणि मगतो फेकून द्यायचा.
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.णि ज्या क्षणि तो आपले शेवटचे ्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले.  तीसाखळी सोन्याची झाली होती,दगड घ्यायचासाखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे क्षच गेले नाही आणि परिणामी हातीआलेला परिस त्याला प्राप्त करता आला नाही.
थोडक्यात काय तर या परिसाचे अने दगड आपल्याकडे संधीच्या रूपाने येत असतात फक्त योग्य वेळी ोग्य संधीचा फायदा  घेत आल्याने आपण अपयशीहोतो.
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी एक उत्तम संधी  येत असतो कधी संकटाच्या रूपानेकधी मेहनतीच्या जोरावर ,तर कधी ज्ञानाच्या  बळावर  कोणत्या नाकोणत्या रूपात   आपल्याला भेटत असते  आणि आपल्या आयुष्याचे सोने करीत असतेपरंतु केवळ भीतीने,अपयशाने किंवा आत्मविश्वासाच्या अभावानेआपल्याला ती ओळखता येत नाही आणि आप हताशपणे दुसर्या संधीची वाट ाहत बसतोआपल्या  आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पणत्या क्षणाला आपण तिच्याकडे आंधळे पणाने पाहत असतोआणि अशीच एक छोटीशी संधी आपल्या  आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते.
संधी ओळखण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही फक्त त्या संधीकडे पाहण्याची आपली नजर बदलली ाहिजेबर्याचवेळा आपण संधीकडे नकारात्मकभावनेने अथवा आव्हान ्हणून पाहत असतो आणि परिणामी आपल्याला त्या संधीचे सोने करता ेत नाहीनोकरीव्यवसायात आणि कोणत्याही क्षेत्रात प्रगती   होण्याचं  महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक संधी ही आव्हान िंवा संकट  वाटणं हे होयफक्त आपली बघण्याची नजर आणि सकारात्मक दृष्टीकोनआपल्याला संधीचे सोने करून देऊ शकतात.
आपल्या आजूबाजूला घडणारे  बदलआलेल्या जबाबदाऱ्याघेतलेले निर्णय याकडं संधी म्हणून बघण्याचं सोडून आपण आव्हान म्हणून बघत आणिनकारात्मक भावनेने त्या गोष्टींना टाळतोत्यामुळे आपलं  नुकसान तर होतंचपरंतु संधी हि फक्त स्वप्नातच दिसते ती प्रत्यक्षात कधीही अवतरत नाही.
वार्याच्या वेगाने बदलणाऱ्या आजच्या युगात अनेक संधी आपल्यासमो स्वैरपणे लहरत आहेत आणि हीच ोग्य वेळ आहे त्या संधीला आपलेसे करून त्यासंधीने प्रगतीची मंदी घालविण्याची.
चला तर मग संकट असोआव्हान असो किंवा अजून काहीही असो त्याकडे आपण संधी म्हणूनच पाहूया आणि ोन्यासारख्या आयुष्याला नवी झळाळी देऊया.


सागर नवनाथ ननावरे 
 
;