Friday, 12 December 2014 0 comments
निसर्गाचा समृध्द अनुभव - भोर

विकेंड म्हटल कि धम्मालच धम्माल .आठवडाभरात जॉब नावाच्या सर्कशीतील शारीरिक आणि मानसिक कसरतीनंतर थोडंस निवांत आणि फ्रेश होण्याच वार. प्रत्येकजण आतुरतेने विकेंड ची वाटर पाहत असतो आणि प्रत्येकाचे विकेंद्चे बेतही ठरलेले असतात यात चित्रपट पाहणे,सर्कस,खवय्येगिरी ,तीर्थक्षेत्रे,किल्ले . पण यातूनही सर्वात हटके आणि आनंददायी म्हणजे मनसोक्त भटकंती . दर्याखोर्यातून,डोंगरकपारीतून,दीखोर्यातून आणि निसर्गसानिद्ध्यात . मी ही विकेंड एक अनेक प्रकारे साजरा करतो पण या सर्वात मला भावतो तो 'भोर'ला भटकंतीचा विकेंड.शनिवारी ऑफिस मधून गावाच्या दिशेने म्हणजेच भोरच्या दिशेने प्रवास सुरु होतो एक आल्हाददायक आणि दरवेळी एक नवा अनुभव देणारा.  कात्रज घाट चढताना याची सुरुवात होते कात्रजचा घाट चढून बोगद्यापाशी गेल्यावर संपूर्ण पुण्याचा नजारा दिसतो. आणि यात पूर्ण शहर आपल्याला आशाळभूत नजरेने न्याहाळत आहे आणि आपण त्याला ठेंगा दाखवत ,खिजवत चाललो असल्याचा अविर्भाव निर्माण होतो.
कापूरहोळवरून भोरला जाण्यासाठी टर्न घेतला कि सुरुवात होते निसर्गराजाच्या साम्राज्याची.आजूबाजूला शिवारातील सारी झाडे पिके जणूकाही स्वागतासाठीच हिर्व्लीन्र नटलेली असतात. आणि या हिरव्यागार क्षणांना झळाळी देते ती थंडगार वार्याची झुळूक.
माळवाडीच्या अलीकडे एका अगदी छोट्या घाटाच्या सपाटीवर एक नयनरम्य दृश्य आपले लक्ष वेधून घेते आणि ते म्हणजे  नेकलेस पॉइंट . सारी हिरवळ सर निसर्ग म्हणजे जणूकाही एक सुंदर देखणी स्त्री असून तिच्या गळ्यात नदीच्या रूपाने असणारा गोलाकार हार म्हणजेच नेकलेस पॉइंट. माळवाडीला गेलो कि दोन वाटा आपल्याला चांगल्याच संभ्रमात टाकतात.डावीकडे शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणारे भोर शहर तर उजवीकडे निसर्गदेवतेच्या अदभुत सौंदर्याने भुरळ पाडणारा भाटघर वरील परिसर. भोरच्या अलीकडे - किलोमीटरच्या अंतरावर येळवंडी नदीवर १५० फुट उंचीचा 'भाटघर dam 'येणाऱ्या जाणार्या प्रवाशांना एक प्रसन्न अनुभूती देतो आणि त्यामुळेच तिथे फोटो काढण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. थंडीत हिरव्या डोंगरावर पांघरलेलीपांढ-याशुभ्र धुक्याची  चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टिचासहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा वाऱ्याचा स्पर्श....हे सारं विलोभनीयच. यातून नकळतच ओठावर एक गीत रेंगाळत
 'पंछी सूर मी गाते है,भवरे गुनगुनाते है
 घुंघरू बजती है हवा ...
कैसे मुस्कुराती है, यु फिजा भुलती है
जैसे हो ये मेरी दिलरुबा…'
पुढे शिवरायांच्या शूर मावळ्यांचा तालुका असणारे ठिकाण म्हणजेच भोर शहर . भोर शहरचे राजवैभव म्हणजेच भोरचा प्रसिध्द राजवाडा. राजवैभव जरी सरलं तरी त्या काळाच्या ऐश्वर्याची उच्च अभिरूचीची कल्पना वास्तूच्या रूपातून प्रतीत होते. असे म्हणतात ब्रिटीश सरकारच्या खालसा धोरणामध्ये, हे एकमेव असे संस्थान होते ज्याला ब्रिटीश सरकार खालसा करू शकले नाहीत.संस्थानिक वैभवाची साक्ष देणारा, कलाकुसरीने परिपूर्ण असा वास्तुकलेचा उत्तम नमुना तसेच जनमानसातही आदराचे स्थान असलेला भोरचा राजवाडा हा महाराष्ट्राचा अनमोल वारसा आहे.
भोर म्हणजे पुण्याचे एक मिनी महाबळेश्वरच .विकेंडसाठी नीरा नदीकाठी वसलेले भोर म्हणजे विकेंडसाठी एक समृध्द अनुभव.  सभोवताली सह्याद्रीचे फाटे आणि महाड-पंढरपूर वर असणारा वरंधा घाट म्हणजे निसर्गाचा देखणा चेहराच.बनेश्वर ,राजवाडा,भोरेश्वर देवालय ,किल्ले रोहिदा,विचित्रगड,रामबाग बंगला ,भाटघर धरण आणि समृद्धतेने नटलेला निसर्ग हि या भोर तालुक्याची ओळख. या भोर परिसरात येण्याचा मोह सिनेसृष्टीला देखील आवरला नाही त्यामुळेच इथे अनेक हिंदी,मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे, भविष्यात चित्रीकरणाच्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने भोर परिसराला मोठे महत्व असणार आहे.
निसर्गाबद्दल आपण नेहमीच आपुलकी दाखवतो, आपल्या गप्पा या वायफळ असतात, आपण त्याच्याशी कधी एकरुप होतो का ? ग्लोबल वॉर्मिंगच्या या जमान्यात निसर्गाच्या सान्निध्यात एक मोकळा श्वास घेऊन ताणताणाव नष्ट करायचा असेल तर भोरसारख्या निसर्गाच्या कुशीतील ठिकाणास आपण विकेंडला महिन्यातून एकदा  जायलाच हवे.
Thursday, 30 October 2014 0 comments
'पंच 'अन्यायाचा’
आशियाई क्रीडा स्पर्धेतील वादग्रस्त कृतीबद्दल भारताची बॉक्सर सरिता देवी हिच्यावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने अनिश्चित काळापर्यंत बंदी घातली आणि मनात तीव्र अन्यायाविरोधी भावना निर्माण झाली.या निर्णयामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सरिता  मुकणार तर आहेच पण तिच्या उज्वल भविष्याला यामुळे पायबंद बसण्याचा धोकाही आहेच. भारताच्या नावलौकिकात मनाचा तुरा रोवणाऱ्या एका जिद्दी महिलेवर निष्पक्षपातीपणे निर्णय देऊन अन्याय होतो आणि आपले भारतीय पदाधिकारी याबाबत काहीही बोलत नाहीत हि मोठी शोकांतिका आहे. ब्राँझपदक विजेत्या सरिताने पुष्पगुच्छ स्वीकारला, पण ब्राँझपदक स्वीकारण्यास नकार दिला आणि आपले पदक तिने रौप्यपदक विजेत्या पार्क कडे दिले हाच काय तो गुन्हा. तिची ही कृती योग्य की अयोग्य हा चर्चेचा भाग झाला. पण अन्यायाने परिसीमा गाठली की त्याला प्रत्युत्तर देण्याची भावना बळावत जाते आणि तिनेही तेच केले मग काय चुकले त्यात तिचे. हे सारे भावनेच्या भरात घडले तिच्याहातून तर ती दोषी आणि जाणीवपूर्वक पंचानी चुकीचा निर्णय दिला हे योग्य हा कुठला न्याय. त्या वेळेस भारतीय संघटनेने शेपूट घालून साधा अपील सुद्धा नोंदवला नव्हता ,अपीलसाठी ५०० $ सुद्धा सरिताला जमवावे लागले  आणि आता भारतीय संघटना सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहे.मंगोलियन खेळाडू हरतो, त्या वेळी त्यांचे पदाधिकारी त्याच्यासाठी लढतात; पण सरिताची बाजू मांडायला एकही भारतीय पदाधिकारी तेथे नव्हता. पदक हिरावून घेतल्याचा ठोसा बसल्याचे तिला दुःख नाही; त्या ठोशाने झालेली जखम भळभळत राहणार आहे, याच्या यातना जास्त आहेत. आता भारतीय संघटनेने  आंतराष्ट्रीय संघटनेला जाब विचारायलाच हवा . सारीतादेवी ने माफी मागून खिलाडूवृत्ती दाखवली आहे त्याचप्रमाणे भारतीय संघटनेनेसुद्धा याविरोधात दखल घेतली पाहिजे. हा लढा फक्त एकट्या सारीतादेवीचा नाही तर तमाम उदयोन्मुख महिला खेळाडूंच्या भविष्याचा आहे आणि याची दखल आपण सर्व क्रीडाप्रेमी भारतीयांनी घेतली  पाहिजे.

-सागर नवनाथ ननावरे
भोर,पुणे
भ्रमणध्वनी ; 7276829977 
Tuesday, 23 September 2014 0 comments

Success


Sunday, 21 September 2014 0 comments
प्रत्येक उद्योजकाला प्रेरणा देऊ शकेल असे हे गाणे जरूर ऐका…

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ॥धृ.॥
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ॥१॥
तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली ॥२॥
उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली ॥३॥
धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ॥४॥
(१९८० साली प्रदर्शित झालेल्या सिंहासन या गाजलेल्या चित्रपटातील हे गाणे. या गीताचे गीतकार होते सुरेश भट. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी या गाण्याला संगीत दिले तर आशा भोसले यांनी हे गीत गायले.)
Thursday, 18 September 2014 0 comments

निवडणुका आणि राजकारण


Tuesday, 16 September 2014 0 comments
माझ्यामते निवडणुका तोंडावर आल्यावर विकासकामे केवळ जाहिरनाम्यापुरती मर्यादित न राहता येणाऱ्या ५ वर्षांत त्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे . येत्या निवडणुकीसाठी विकासाच्या दृष्टीने खालील मुद्द्यांचा विचार व्हावा हीच लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा
१)कचऱ्याच्या साठा पद्धतीला पायबंद घालून आधुनिक कचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न करावेत
२)महिलांवर होणाऱ्या हर तऱ्हेच्या अत्याचार व हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी महिला अत्याचार निर्मुलन केंद्रांची स्थापना करण्यात यावी. यामार्फत तक्रारींची नोंद पोलिसांत व राज्य महिला आयोग यांच्याकडे पाठपुराव्यासाठी दिली जावी.
३) पुण्याला एक आधुनिक शहर व सांस्कृतिक पर्यटनस्थळ बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असावे.
४) खड्ड्यांसाठी प्रसिध्द असलेल्या पुण्याचे नाव स्व्च्छ आणि सुंदर रस्त्यांच्या नावाने कसे ओळखले जाईल यासाठी पाठपुरावा व्हावा.


-सागर नवनाथ ननावरे
Monday, 15 September 2014 0 comments
कार्यकता  बदलतोय

खरंच आजचा कार्यकर्ता बदललाय .एरवी दिवसभर प्रचाराने घामाघूम कार्यकर्ते चिडचिड,अरेरावी,असभ्यपणा आणि उनाडपण करताना दिसायचे .पण आज काळ सोशल मिडियाने प्रचारात महत्वाची भूमिका बजावल्याने कार्यकर्ते प्रोफेशनली आपली जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच सुसंस्कृतपणा  आणि मतदारांशी सौहार्दपूर्ण संभाषण अशा प्रकारे आपल्या पक्षाचा आणि आपल्या नेत्याचा प्रचार प्रामाणिकपणे करताना दिसत आहेत. हा बदललेला कार्यकर्ता आपल्या पक्षाच्या यशात महत्वाचे योगदान देतोय यात काडीमात्र शंका नाही.
Friday, 12 September 2014 0 comments

0 comments

0 comments

0 comments

मुलींनाच असा दुजाभाव का ?

मुलींनाच असा दुजाभाव का ? by Sagar Nanaware
तुळशी विवाहानंतरच खऱ्या अर्थाने आपल्याकडे लग्नसराईला सुरुवात होते. लग्न करण्यापूर्वी प्रत्येक मुलगा-मुलगी लग्नाबद्दल काही ना काही विचार करतात, काही स्वप्नं रंगवतात. हल्लीची पिढी ही एक नव्या विचारांची, स्मार्ट पिढी म्हणून ओळखली जाते. हा स्मार्टनेस त्यांच्या लग्न या संकल्पनेबाबतच्या विचारांतही दिसतो. 
आपल्या आजूबाजूला आपण बघतो, हल्ली मुलं-मुली लग्नात दिखाऊ खर्च करण्याच्या फंदात न पडता साध्या पद्धतीने कायदेशीर कोर्ट मॅरेज करतात आणि लग्नात होणाऱ्या वायफळ खर्चाची बचत करून त्याचा उपयोग सत्कर्मी करतात. म्हणजेच एखाद्या अनाथाश्रमाला ती रक्कम देतात, तिथल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलतात, वृद्धाश्रमाला काही पैसे मदत म्हणून देतात, तिथल्या वयस्कर व्यक्तींना काही उपयोगी वस्तू भेट म्हणून देतात... स्मार्ट पिढीचं खरं रूप हेच. 

तरीही कुठेतरी आजही याच पिढीला समजून घेण्यात आपला समाज मागे पडतोय असं वाटतं... समाजाने पिढ्यान्‌पिढ्या घालून ठेवलेली काही बंधनं, मर्यादा तोडून या पिढीला काही पावलं उचलावी लागतायत. बंडखोरी करावी लागतेय आणि या साऱ्याची किंमतही मोजावी लागतेय. 
आता हेच पाहा ना... जिथे आज मुलगा आणि मुलगी यात काही अंतर ठेवलं जात नाही, तिथे मुलींवरच सारी बंधनं का लादली जातायत? लग्नासारख्या आयुष्यातील मोठ्या निर्णयासाठी तिला न विचारता, तिचं मत जाणून न घेता परस्पर निर्णय कसे घेतले जातायत? तीही समाजाचा एक घटक आहे, तिचीही काही मतं आहेत, काही अपेक्षा आहेत. त्यांचा विचार का केला जात नाही? मुलीलाही आपल्या पायावर उभं राहून, मजा-मस्ती करून, बॅचलर लाईफचा आनंद लुटून मग लग्नासाठी तयार का केलं जात नाही? फक्त एक मुलगी, परक्‍याचं धन म्हणून लवकरात लवकर तिला लग्नगाठीत अडकवून तिच्यावर साऱ्या अपेक्षांचं ओझं का लादलं जातंय? समाज हा विचार का करत नाही? आपल्या आजूबाजूला एखादी तिशीची मुलगी दिसली तरी लोक अवाक्‌ होऊन पाहातात... बापरे... अजून लग्न नाही केलं पोरीचं? म्हणजे पोरीत काहीतरी कमी असेल, काही गडबड असेल. लोक आपापले तर्क लावून मोकळे होतात, लग्न हीच मुलीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता समजतात. जन्मल्यापासून मुलीने सारं काही करायचं ते लग्नासाठी, होणाऱ्या नवऱ्यासाठी आणि त्याच्या घरच्यांसाठी. अगदी तिने शिकायचं तेही स्वत:साठी नाही, तर मुलगा शिकलेला मिळावा म्हणून! मुलीने स्वतः आपला पार्टनर शोधला, तरीही तिला मागून-पुढून बोलणी... घरच्यांचं नाक कापलं, मुलीचं वळणच ठीक नाही, चांगले संस्कारच नाहीत, नसता आगाऊपणा कसला... म्हणजे चारही बाजूंना खाचखळगे. 

लहानपणापासून आपण शिकत आलोय की प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य असतं. मग मुलीने आपला भावी जोडीदार स्वतः निवडला तर त्यात वावगं काय? मुली आता शिकतायत, त्यांना स्वत:ची मतं असतात, विचार असतात. चांगल्या-वाईटाची पारख असते. त्यांचं स्वतःचं जग असतं. ते तिला आपल्या पद्धतीने जगू द्या. माणूस म्हणून स्त्रीकडे आदराने पाहून तिच्या विचारांचं स्वागत केलं तर समाज नक्कीच पुढे जाईल. बदल आपल्यापासून घडला पाहिजे. आज माणूस मंगळापर्यंत पोहोचतोय, मग या नव्या समाजहिताच्या विचारांच्या वाटेवर चालणं एवढं अवघड का होऊन बसलंय? जरा विचार करा आणि स्वत:त, स्वत:च्या विचारांत बदल करा... अजूनही वेळ गेलेली नाही. 
                                                                                                                                                        
 by  सागर ननावरे
0 comments

छत्तीस गुणांपेक्षा दोघांची मनं जुळायला हवीत

आपला वर्षातून एकदा येणारा वाढदिवस पती-पत्नीनं आनंदानं साजरा करावा. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची आठवणही एकमेकांना करून द्यावी. त्या दिवसाचं औचित्य साधून पतीनं पत्नीला सुंदर सुगंधी फुलांचा गजरा अथवा अचानक एखादी भेटवस्तू देऊन प्रेमळ जाणीव करून दिली, तर पत्नी त्या प्रसंगानं सुखावेल.आपला छोटासा आटोपशीर सुखी संसार आदर्श होण्यासाठी पती-पत्नीतील अतूट नातं मधुर असणं आवश्‍यक असतं. त्यासाठी दोघांनीही एकमेकांशी आदरपूर्वक व स्नेहानं वागलं पाहिजे. लग्नाबद्दल प्रत्येक मुलामुलीच्या मनात एक सुंदर स्वप्न असतं. बहुतेक वेळा लग्नानंतर काही जोडप्यांच्या बाबतीत ती स्वप्नं उमलण्याआधीच कठोर वास्तवाच्या धगीनं करपून जातात. लग्नानंतर आपल्या साऱ्या आवडीनिवडी बासनात गुंडाळून ठेवाव्या लागतात. त्यामुळं संसार करताना या प्रेमसागराला ओहोटी आल्यासारखं वाटतं. अशा वेळी मानसिक खच्चीकरण करणारे शब्द टाळावेत अन्‌ एकमेकांना भरभक्कम आधार देण्यासाठी पुढं यावं.
नोकरीच्या मागे अखंडपणे धावत असताना अथवा व्यवसाय सांभाळताना आपल्या सांसारिक जीवनात आनंद व संसारसुख मिळविण्यासाठीच मनुष्य आयुष्यभर वणवण भटकत असतो. काही वेळा घराच्या सुखरूपतेबरोबरच कुटुंबातील नाती, प्रतिष्ठा आणि ऐश्‍वर्य जपण्याचा पतिपत्नी प्रयत्न करतात; पण प्रेमाचे दोन गोड शब्द आणि एकमेकांची मनं समजून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, तर वादळं उठतात. मन फुलासारखं नाजूक असतं, ते फुलवायचं कसब ज्या स्त्री-पुरुषांकडे असतं, तेच एकमेकांचे सर्वस्व बनू शकतात. पण सांसारिक जीवनात काय होतं, कुणालाच कळत नाही. शरीर दृश्‍य असलं, तरी मन अदृश्‍य असतं. त्या शरीराला शृंगारसुख दिलं की आपली जबाबदारी पूर्ण होत नाही, तर शरीरसुखापेक्षा एकमेकांची मनं जुळायला हवीत आणि पती-पत्नीनं एकमेकांची मनं जिंकायला हवीत. एकमेकांवर मनापासून प्रेम करावं आणि एकमेकांवरचा विश्‍वास वृद्धिंगत करावा. दोन भिन्न वातावरणातून दोन भिन्न स्वभावाची माणसं जेव्हा एक होतात, तेव्हा वाद होणारच. भांड्याला भांडं लागणारच. त्या वादातून एकमेकांची मनं दुखावल्यास अथवा गेलाच चुकून एखादा शब्द तरी पाठीवर आधाराचा हात द्यावा व दोघांनीही माफी मागून कलह दूर करण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबासाठी कष्ट उपसताना दोघांनीही आपल्या शरीराची योग्य काळजी घ्यावीच. आपल्या प्रकृती व शरीरसौंदर्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी साजेसा, सकस आणि समतोल आहार घेण्याचा प्रयत्न करावा. कारण एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वविकासाबरोबरच कुटुंबाचा विकास जास्त महत्त्वाचा असतो.
रसंगानुरूप पती-पत्नीनं एकमेकांच्या सौंदर्याची, सुप्त गुणांची अथवा कलागुणांची भरभरून प्रशंसा करावी. एखाद्यानं चांगलं काम केलं, तर दोघांनीही एकमेकांचं कौतुक करावं व पुढील चांगल्या कामांसाठी प्रोत्साहन द्यावं. काही कामानिमित्त अथवा सण-समारंभानिमित्त नातेवाईकांकडे परगावी गेल्यावर एकमेकांपासून दूर गेल्याची जाणीव ठेवून फोनवर संपर्क ठेवावा. दोघांनीही आस्थापूर्वक एकमेकांची विचारपूस करावी. गोड आठवणींना जपण्याचा प्रयत्न करून, प्रेमानं गप्पा माराव्यात. त्यामुळे पती-पत्नीतील प्रेम द्विगुणित होईल.

आपला वर्षातून एकदा येणारा वाढदिवस पती-पत्नीनं आनंदानं साजरा करावा. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची आठवणही एकमेकांना करून द्यावी. त्या दिवसाचं औचित्य साधून पतीनं पत्नीला सुंदर सुगंधी फुलांचा गजरा अथवा अचानक एखादी भेटवस्तू देऊन प्रेमळ जाणीव करून दिली, तर पत्नी त्या प्रसंगानं सुखावेल. शेवटी काय, तर लग्न म्हणजे ओढूनताणून केलेला संसार नव्हे; छत्तीस गुणांपेक्षा दोन मनांचं मिलन होणं गरजेचं आहे. त्या मनोमिलनामुळंच सुखी जीवनाला आकार व परीसस्पर्श लाभेल
0 comments
ALL इज नॉट वेल
आजकाल कॉलेज आणि फॅशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत . आजची कॉलेजमधील तरुणाई ही इम्प्रेशन वर जगणारी आहे . इतरांपेक्षा आपण वेगळे कसे दिसू अथवा आपल्या इम्प्रेशनवर लोक आपल्याला जास्त भाव कसा देतील यावर अधिक भर दिसून येतो. या प्रॅक्टिकली विचार करणार्‍या तरुणाईला वाटत कि आपल्याकडेही छोकरी असावी ,छोकरी आली म्हणजेच तिला फिरवायला बाईक तर हवीच ,याशिवाय तिला सलमान खान आवडतो म्हटल्यावर त्यासाठी दिसायला हॅण्डसम आणि रापचिक बॉडी हवीच. हा सारा खटाटोप रोजचाच यात वावग काही नाही पण यामुळे गुणवत्तेत मात्र कोम्प्रमाइज होताना दिसतंय. आपल्या लूक च इम्प्रेशन जास्त काळ टिकत नाही हे तरुणाई च्या लक्षात यायला हवे. एखाद्या अभिनेत्याची नक्कल करणे ठीक आहे पण त्यात अतिरेकपणा आला कि हिरो चा झिरो व्हायला वेळ लागत नाही. स्वत:त बदल करणे , व्यायाम करून बॉडी कमावणे, इतरांना मदत करणे आणि  पॉझिटिव्ह राहणे या गोष्टींचे अनुकरण योग्य आहे पण मद्यप्राशन ,धुम्रपान,अश्लीलता आणि असभ्यता मात्र अनुकरणीय नसावी. वरील परिस्थिती पाहिल्यावर नकळतच एक सुंदर गीताचे विडंबन होते " ALL इज नॉट वेल !"
कॉलेजचा  सतत अभ्यास, परीक्षा यातून रिलॅक्‍स होण्यासाठी एन्जॉयमेंट हवीच  आणि मौजमजा , धमाल करायला कोणाला नाही आवडत? त्यात फॅशन आणि इम्प्रेशन तरुणांचे आवडते पण ही मज्जामस्ती करताना सामाजिकता आणि नैतिकतेचे  भान आणि सुसंस्कृतपणाही हवाच. आयुष्यात मौजमजा हवी ,एन्जोय हवा पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी ,शैक्षणिक गुणवत्ता हवी आणि  फ्रीडमसोबत एक रिस्पॉन्सिबिलीटी पण हवी.
यातूनही आजच्या या तरुणाईच्या मदमस्त आणि बिन्दास्त जगात अजूनही एखाद्या अंध अथवा वृध्द व्यक्तीला रस्ता क्रॉस करण्यासाठी सरसावलेली तरुणाई पहिली कि  मात्र  मनाला सुखावह वाटत.
-सागर नवनाथ ननावरे
0 comments
गाणे मनातले : टिक टिक वाजते डोक्यात............

"दुनियादारी" मराठी सिनेजगतातला प्रेम आणि तरुणाईवरील आजपर्यंतचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट.प्रदर्शनापूर्वी जास्त चर्चेत नसणाऱ्या या सिनेमाने प्रदर्शनानंतर तरुणाईला अक्षरश भुरळ पाडली. खर तर हा आजच्या तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच "प्रेमावर " आधारित चित्रपट. मनातील प्रेमाला वेळीच साद न दिल्याने त्याचे कसे विचित्र पडसाद उमटतात आणि आयुष्य कसं क्षणातच बदलून जाते यावर केलेले भाष्य म्हणजे दुनियादारी.या चित्रपटाच्या यशात कलाकारांचा भन्नाट अभिनय ,सुरेख पटकथा, उत्कृष्ट संगीत आणि सुंदर  दिग्दर्शन यांचा मेळ तर आहेच पण याचबरोबर या चित्रपटातील गीतांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. या चित्रपटातील सर्वात सुंदर आणि मला भावलेलं गीत म्हणजे,
                                 टिक टिक वाजते डोक्यात
                                  धड धड वाढते ठोक्यात
                                  कभी जमी कभी नभी
                                   संपते अंतर झोक्यात
चित्रपटाची मुख्य कथा फिरते ती प्रेमाच्या त्रिकोणावर , श्रेयश ,शिरीन आणि मिनू हे या प्रेमत्रिकोणातील  तीन कोन यातील हे गीत चित्रित केलेलं आहे ते श्रेयश आणि शिरीनवर .कॉलेजच्या कट्ट्यावर उनाडक्या करणाऱ्या मित्राला वाचविताना या दोघांची पहिली भेट होते.पहिली भेट असणारे हे दोघे योगायोगाने पुन्हा एकदा थिएटर बाहेर भेटतात आणि त्यांची घटत मैत्रीही होते. आमदाराची मुलगी असलेली शिरीन श्रेयस आणि त्याचा मित्र दिग्या यांच्या कट्टा ग्रुप  मध्ये सामील होते . श्रेयस हळूहळू शिरीन च्या प्रेमात पडतो त्याला ती आवडू लागते पण लाजऱ्याबुजऱ्या श्रेयश ला आपल्या भावना तिच्याजवळ व्यक्त करता येत नाहीत आणि तिकडे शिरीनलाही श्रेयश आवडू लागतो पण  ती त्याच्याकडूनच या भावना व्यक्त होण्याची अपेक्षा करते . आणि मग हि अबोल मने आपलं प्रेम या गीतातून व्यक्त करतात.
                                                             टिक टिक वाजते डोक्यात
                                  धड धड वाढते ठोक्यात …….
प्रेमात पडल्यावर डोक्यातील घड्याळात ( मेंदूत)  फक्त टिक टिक वाजते म्हणजेच मनात प्रेमाचे गुलाबी विचार येतात. आणि हृद्य  या अनोळखी आणि प्रथमच आलेल्या अनुभवाने धडधडू लागत. जमीन आणि आकाश हे अंतर हजारो मैल दूर असलं तरी परमात पडलेल्या प्रेमींना ते अगदी जवळ वाटू लागत कदाचित त्यामुळेच सर्व प्रेमी आपले पाय जमिनीवर असताना आपल्या प्रेमिकेसाठी चंद्र  तारे  तोडण्याची भाषा करतात.
                                





नाही जरी सारी तरी
भिजते अंग पाण्याने
सोचू तुम्हे पलभर भी
बरसे सावन जोमाने
ज्याप्रमाणे पावसाच्या आगमनाने तप्त झालेली धरती क्षणात तृप्त होते त्याचप्रमाणे आपल्याही आयुष्यात प्रेम नावाचं वादळ आलं की मन अगदी प्रेमभावनेत भिजून जात तेही अगदी पाऊस नसतानासुद्धा. 
आणि आनंदाचा ऋतू असणारा श्रावण वर्षभरात एकदाच येत असला तरी  प्रेमींसाठी तो वर्षभरात केव्हाही येऊ शकतो अगदी नकळत .कारण प्रेम असतच असं अवेळी आणि अचानक एकमेकांची ओढ लावणारं .
या गीतातील सर किंवा अगदी अप्रतिम ओळी म्हणाल तर,
शिंपल्यांचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.......
तरुणाईत एक आधुनिक  म्हण प्रचलित आहे ती म्हणजे ' दिल आ गया गदी पे तो परी क्या चीज है'? म्हणजेच प्रेमात बुडालेल्या प्रेमविरासमोर कितीही सुंदर, देखणी आणि मादक कन्या जरी आली तरी 'माझी हीच खरी, माझी हीच बरी आणि हीच माझी खरी परीअसं मन अगदी पटकन सांगत.आणि या सुंदर ओळींतहि हेच व्यक्त होत आहे की शिंपल्याचे   कितीही सुबक आणि अप्रतिम शोपीस असले तरी त्याची मला गरज नाही तर माझा जीव या मोत्यातच अडकला आहे असे नायकाचे अबोल मन गुणगुणते . दोन मनांची एकमेकाबद्दलची  हुरहूर आणि त्यांच्या मनात माजलेला भावनांचा काहूर या गीतातून अतिशय समर्पकरीत्या मांडला गेला आहे.
हे गीत म्हणजे कुणासाठी एक छान संगीत, कुणासाठी सुंदर आवाजाचे प्रतिक असेल पण ज्यांच्या मनाला या गीताने सुखावह वाटतंय आणि या गीताने ज्यांच्या डोक्यात टिक  टिक वाजते आणि छातीत धडधडही होते माझ्यामते ते खरे या गीतासाठी पात्र अगदी............माझ्यासारखे...!!!
                                                                                  
                                                                                                                           -   सागर नवनाथ ननावरे
 
;