ALL
इज
नॉट वेल
आजकाल कॉलेज आणि फॅशन
या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत . आजची कॉलेजमधील तरुणाई ही इम्प्रेशन वर
जगणारी आहे . इतरांपेक्षा आपण वेगळे कसे दिसू अथवा आपल्या इम्प्रेशनवर लोक
आपल्याला जास्त भाव कसा देतील यावर अधिक भर दिसून येतो. या प्रॅक्टिकली विचार
करणार्या तरुणाईला वाटत कि आपल्याकडेही छोकरी असावी ,छोकरी आली म्हणजेच तिला फिरवायला बाईक
तर हवीच ,याशिवाय तिला सलमान
खान आवडतो म्हटल्यावर त्यासाठी दिसायला हॅण्डसम आणि रापचिक बॉडी हवीच. हा सारा
खटाटोप रोजचाच यात वावग काही नाही पण यामुळे गुणवत्तेत मात्र कोम्प्रमाइज होताना
दिसतंय. आपल्या लूक च इम्प्रेशन जास्त काळ टिकत नाही हे तरुणाई च्या लक्षात यायला
हवे. एखाद्या अभिनेत्याची नक्कल करणे ठीक आहे पण त्यात अतिरेकपणा आला कि हिरो चा
झिरो व्हायला वेळ लागत नाही. स्वत:त बदल करणे , व्यायाम करून बॉडी कमावणे, इतरांना मदत करणे आणि पॉझिटिव्ह राहणे या गोष्टींचे अनुकरण योग्य आहे
पण मद्यप्राशन ,धुम्रपान,अश्लीलता आणि असभ्यता मात्र अनुकरणीय
नसावी. वरील परिस्थिती पाहिल्यावर नकळतच एक
सुंदर गीताचे विडंबन होते " ALL
इज नॉट वेल !"कॉलेजचा सतत अभ्यास, परीक्षा यातून रिलॅक्स होण्यासाठी एन्जॉयमेंट हवीच आणि मौजमजा , धमाल करायला कोणाला नाही आवडत? त्यात फॅशन आणि इम्प्रेशन तरुणांचे आवडते पण ही मज्जामस्ती करताना सामाजिकता आणि नैतिकतेचे भान आणि सुसंस्कृतपणाही हवाच. आयुष्यात मौजमजा हवी ,एन्जोय हवा पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी ,शैक्षणिक गुणवत्ता हवी आणि फ्रीडमसोबत एक रिस्पॉन्सिबिलीटी पण हवी.
यातूनही आजच्या या तरुणाईच्या मदमस्त आणि बिन्दास्त जगात अजूनही एखाद्या अंध अथवा वृध्द व्यक्तीला रस्ता क्रॉस करण्यासाठी सरसावलेली तरुणाई पहिली कि मात्र मनाला सुखावह वाटत.
-सागर नवनाथ ननावरे
0 comments:
Post a Comment