गाणे मनातले : टिक टिक
वाजते डोक्यात............
टिक टिक वाजते
डोक्यात
धड धड वाढते
ठोक्यात
कभी जमी कभी
नभी
संपते अंतर
झोक्यात
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते
ठोक्यात …….
- सागर नवनाथ ननावरे
"दुनियादारी" मराठी सिनेजगतातला प्रेम आणि तरुणाईवरील आजपर्यंतचा
सर्वाधिक यशस्वी चित्रपट.प्रदर्शनापूर्वी जास्त चर्चेत नसणाऱ्या या सिनेमाने
प्रदर्शनानंतर तरुणाईला अक्षरश भुरळ पाडली. खर तर हा आजच्या तरुणाईचा जिव्हाळ्याचा
विषय म्हणजेच "प्रेमावर " आधारित चित्रपट. मनातील प्रेमाला वेळीच साद न
दिल्याने त्याचे कसे विचित्र पडसाद उमटतात आणि आयुष्य कसं क्षणातच बदलून जाते यावर
केलेले भाष्य म्हणजे दुनियादारी.या चित्रपटाच्या यशात कलाकारांचा भन्नाट अभिनय ,सुरेख पटकथा, उत्कृष्ट संगीत आणि सुंदर
दिग्दर्शन यांचा मेळ तर आहेच पण याचबरोबर या चित्रपटातील गीतांचाही तितकाच
मोलाचा वाटा आहे. या चित्रपटातील सर्वात सुंदर आणि मला भावलेलं गीत म्हणजे,
चित्रपटाची मुख्य कथा फिरते ती प्रेमाच्या त्रिकोणावर , श्रेयश ,शिरीन आणि मिनू
हे या प्रेमत्रिकोणातील तीन कोन यातील हे
गीत चित्रित केलेलं आहे ते श्रेयश आणि शिरीनवर .कॉलेजच्या कट्ट्यावर उनाडक्या
करणाऱ्या मित्राला वाचविताना या दोघांची पहिली भेट होते.पहिली भेट असणारे हे दोघे
योगायोगाने पुन्हा एकदा थिएटर बाहेर भेटतात आणि त्यांची घटत मैत्रीही होते.
आमदाराची मुलगी असलेली शिरीन श्रेयस आणि त्याचा मित्र दिग्या यांच्या कट्टा
ग्रुप मध्ये सामील होते . श्रेयस हळूहळू
शिरीन च्या प्रेमात पडतो त्याला ती आवडू लागते पण लाजऱ्याबुजऱ्या श्रेयश ला आपल्या
भावना तिच्याजवळ व्यक्त करता येत नाहीत आणि तिकडे शिरीनलाही श्रेयश आवडू लागतो पण ती त्याच्याकडूनच या भावना व्यक्त होण्याची अपेक्षा
करते . आणि मग हि अबोल मने आपलं प्रेम या गीतातून व्यक्त करतात.
प्रेमात पडल्यावर डोक्यातील घड्याळात ( मेंदूत) फक्त टिक टिक वाजते म्हणजेच मनात प्रेमाचे
गुलाबी विचार येतात. आणि हृद्य या अनोळखी
आणि प्रथमच आलेल्या अनुभवाने धडधडू लागत. जमीन आणि आकाश हे अंतर हजारो मैल दूर
असलं तरी परमात पडलेल्या प्रेमींना ते अगदी जवळ वाटू लागत कदाचित त्यामुळेच सर्व
प्रेमी आपले पाय जमिनीवर असताना आपल्या प्रेमिकेसाठी चंद्र तारे
तोडण्याची भाषा करतात.
नाही जरी सारी तरी
भिजते अंग पाण्याने
सोचू तुम्हे पलभर भी
बरसे सावन जोमाने
ज्याप्रमाणे पावसाच्या आगमनाने तप्त झालेली
धरती क्षणात तृप्त होते त्याचप्रमाणे आपल्याही आयुष्यात प्रेम नावाचं वादळ आलं की
मन अगदी प्रेमभावनेत भिजून जात तेही अगदी पाऊस नसतानासुद्धा.
आणि आनंदाचा ऋतू असणारा श्रावण वर्षभरात एकदाच
येत असला तरी प्रेमींसाठी तो वर्षभरात
केव्हाही येऊ शकतो अगदी नकळत .कारण प्रेम असतच असं अवेळी आणि अचानक एकमेकांची ओढ
लावणारं .
या गीतातील सर किंवा अगदी अप्रतिम ओळी म्हणाल
तर,
शिंपल्यांचे शोपीस नको जीव अडकला
मोत्यात.......
तरुणाईत एक आधुनिक म्हण प्रचलित आहे
ती म्हणजे ' दिल आ गया गदी पे
तो परी क्या चीज है'? म्हणजेच प्रेमात
बुडालेल्या प्रेमविरासमोर कितीही सुंदर, देखणी आणि मादक कन्या जरी आली तरी 'माझी हीच खरी, माझी हीच बरी आणि
हीच माझी खरी परी’ असं मन अगदी पटकन
सांगत.आणि या सुंदर ओळींतहि हेच व्यक्त होत आहे की शिंपल्याचे कितीही सुबक आणि अप्रतिम शोपीस असले तरी
त्याची मला गरज नाही तर माझा जीव या मोत्यातच अडकला आहे असे नायकाचे अबोल मन
गुणगुणते . दोन मनांची एकमेकाबद्दलची
हुरहूर आणि त्यांच्या मनात माजलेला भावनांचा काहूर या गीतातून अतिशय समर्पकरीत्या
मांडला गेला आहे.
हे गीत म्हणजे कुणासाठी एक छान संगीत, कुणासाठी सुंदर आवाजाचे
प्रतिक असेल पण ज्यांच्या मनाला या गीताने सुखावह वाटतंय आणि या गीताने ज्यांच्या
डोक्यात टिक टिक वाजते आणि छातीत धडधडही
होते माझ्यामते ते खरे या गीतासाठी पात्र अगदी............माझ्यासारखे... !!!
0 comments:
Post a Comment