दूरदृष्टी: गुंतवणूक भविष्याची
आजचे बघूया आज
आता कशाला उद्याची बात ?
या ओळींना प्रमाण मानून अनेकजण आपले आयुष्य जगताना आपल्याला दिसतात. अगदी खरे आहे हे आजचा दिवस आपण शेवटचा दिवस म्हणून जगायचा परंतु मग उद्याचे काय ? उद्याच्या पहाटे नवीन संधी, नवी सुखे आणि बराच काही नवे घेऊन येणाऱ्या नव्या सूर्योदयाला आपण काय उत्तर देणार ?
आपलंही असंच होत असते बऱ्याचवेळा फक्त आजचा दिवस अंधाधुंद जगण्याच्या नादात आपण आपल्याच उद्याचे संकट बनत असतो. आणि याचे एकमेव कारण म्हणजेच आपल्याकडे असणारा दूरदृष्टीचा अभाव. 'कोणी सांगितलंय उद्याचा दिवस उजाडणार की नाही आजच घ्या ऐश करून ? यासारख्या वाक्यावर आपल्या आयुष्याची भिस्त ठेऊन आपण आपले भविष्य अंधारात नेत असतो. दूरदृष्टी ही मानवाच्या भविष्यासाठी आणि भविष्यातील सुखासाठी आजच करीत असलेली एक मानसिक गुंतवणूक असते. ज्याप्रमाणे आपल्या किंवा आपल्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आपण विविध योजना,फ़ंड,विमा आणि इतर बचतीच्या बाबींसाठी गुंतवणूक करीत असतो. त्याचप्रमाणे 'दूरदृष्टी' ही आपल्या भविष्यातील मानसिक स्थैर्यासाठी उद्याचा विचार करून आजपासूनच केलेली पूर्वतयारी असते.
आपण स्वत:ची दृष्टी नेहमी सूक्ष्म ठेवली पाहिजे ज्यामुळे जीवनात नकळत येणाऱ्या संकटांना आपल्याला तोंड देता येते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आजचा दिवस नव्या जोशात जगण्यावर आपण नक्कीच भर दिला पाहिजे परंतु त्यात उद्याच्या भविष्यवेधाचा विचारही नक्कीच व्हायला हवा.
आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे धडे मोठ्या अभिमानाने गिरवतो तर बरेचदा दुसरीकडे एका प्रश्नासाठी आपण नेहमीच अनुत्तरित राहतो की शहाजी राजांनी आदिलशाहीत चाकरी का करावी? इतिहास केवळ वाचनापुरता ठेवल्याने किंबहुना आपली दृष्टी संकुचित असल्याने आपण शहाजीराजेंच्या दूरदर्शीपणाबद्दल अनभिद्न्य राहतो.
शहाजीराजे आदिलशाहच्या विनंती वरून आदिलशाहित गेले ते मोठ्या मानसन्मानाने. एकीकडे आपण आदिलशाहित राहून स्वराज्य स्थापनेसाठी पोषक वातावरण तयार करावे आणि आदिलशाहित राहूनच आपल्या जहागीरीतील शत्रूंचा उपद्रव कमी व्हावा. तर दुसरीकडे
मासाहेब जिजाऊ आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे काम पूर्ण करावे हा यामागील शहाजीराजे यांचा दूरदर्शीपणा होता. असा दूरदर्शीपणा असलेल्या स्वराज्य संकल्पक सरलष्कर शहाजीराजे यांच्या प्रेरणेतूनच शिवबाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले.
याच दूरदृष्टीचा आदर्श घेत महाराजांनी पुढे सैन्यासाठी सागरी व्यवस्था राबवली आरमार उभे केले. आपल्याकडे मनुष्यबळ आणि शत्रूच्या तुलनेत शस्त्रास्त्रांची कमतरता आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी सागरी व्यवस्थेचा उपयोग करून घेतला. यातून त्यांचा दूरदर्शीपणा लक्षात येतो.
म्हणूनच नुसतीच दृष्टी असून उपयोग नाही तर दृष्टिकोन आणि दूरदृष्टी असणे हे सुद्धा महत्त्वाचे आहेच.
कारण आपण दैनंदिन जीवनात जी कार्ये करत असतो,ती काळाबरोबर सुसंगत व बदलत्या काळाच्या कसोटीस खडी उतरली पाहिजे. स्पर्धेच्या युगातही आपण आपली सर्व क्षमता,शक्ती आणि कल्पकता यांचा दूरदृष्टीने विचार केला पाहिजे. आजच्या आपल्या आयुष्यात आपण दूरदृष्टीने पेरलेले कष्टाचे आजचे बीज उद्या एका वटवृक्षात रूपांतरित होऊन आपल्यालाच यशाची फळे आणि सुखाची छाया देणारे ठरणार आहे.
आजचा आपण अंगी बाणवलेला दूरदर्शीपणा उद्या आपल्या, आपल्यांच्या, समाजाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावणारा ठरणार आहे.
सागर नवनाथ ननावरे
बस्स झाला आता निषेध आता हवा शिवशासनाचा चौरंगा
कालपरवा आमच्या संतांच्या आणि छत्रपतींचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली. आपल्यातीलच एक असणाऱ्या कोपर्डी येथील एका ताईचा अत्यंत क्रूरपणे बलात्कार करून खून करण्यात आला. एकीकडे सर्वांनी सामाजिक बांधिलकीचा पुचकट दिखावा करत फेसबुक आणि व्हॉट्स अप वर निषेधही व्यक्त केला. तर दुसरीकडे जातीपातीच्या नावाखाली राजकीय पुढाऱ्यांनी आपली आयती पोळीही भाजून घेतली.
पण याने साध्य काय होणार आहे?
त्या आपल्या ताईला न्याय मिळेल काय?
परक्या स्त्रीला मातेसमान वागणूक देणाऱ्या माझ्या महाराजांच्या काळात हेच केलं गेलं का? तर नक्कीच नाही. महाराजांनी त्याच "चौरंगा" करण्याचा आदेश सोडला असता. चौरंगा म्हणजेच दोन्ही हात कोपर्यापासून आणि दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडणें!
अरे शिवरायांचा वारसा छातीठोकपणे सांगणारे आपण माता भगिनींच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्यांचा फक्त निषेध करतो हेच या मातीचे दुर्दैव.
अरे कुठे जाऊन बसले ते माताभगिनींच्या संरक्षणाचे आश्वासन देऊन मते मागणारे?
कुठे जाऊन बसल्या त्या भगिनी ज्यांनी मंदिरप्रवेशासाठी अवघा महाराष्ट्र हलवून सोडला?
कोणत्या भीतीने लपून बसली ती मीडिया जी हागण्या मुतण्याची पण ब्रेकिंग न्यूज करते?
काय चाललंय हे
"बेटी बचाओ बेटी बचाओ" कशासाठी? या अशा वासनांध गिधाडांना लचके तोडायला देण्यासाठी?
आंदोलने,निवेदने, निषेध, आणि विरोध याने होणार आहे.
शासन कठोर शिक्षेचे आश्वासन देणार त्यानंतर सरकारी वकील वर्षानुवर्षे न्यायालयाच्या पायऱ्या झिझवणार, वाद प्रतिवाद चालणार, आणि काही वर्षांनी त्याच्या तुरुंगातील आत्महत्येच्या प्रयत्नाने किंवा वागणुकीने भावनिक होऊन त्याची शिक्षा माफ करणार.
तोपर्यंत या कायदेशीर परंपरेने हे सोकावलेले नराधम पुन्हा भक्ष्याच्या शोधात राहणार आणि आपल्या माताभगिनी जीव मुठीत घेऊन जगावं लागणार.
हे कुठंतरी थांबायला हवं आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने आता आपल्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी वेळप्रसंगी हाती तलवारही घ्यायला हवी.
बस्स झाला आता निषेध आता हवा शिवशासनाचा चौरंगा
सागर नवनाथ ननावरे
कालपरवा आमच्या संतांच्या आणि छत्रपतींचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली. आपल्यातीलच एक असणाऱ्या कोपर्डी येथील एका ताईचा अत्यंत क्रूरपणे बलात्कार करून खून करण्यात आला. एकीकडे सर्वांनी सामाजिक बांधिलकीचा पुचकट दिखावा करत फेसबुक आणि व्हॉट्स अप वर निषेधही व्यक्त केला. तर दुसरीकडे जातीपातीच्या नावाखाली राजकीय पुढाऱ्यांनी आपली आयती पोळीही भाजून घेतली.
पण याने साध्य काय होणार आहे?
त्या आपल्या ताईला न्याय मिळेल काय?
परक्या स्त्रीला मातेसमान वागणूक देणाऱ्या माझ्या महाराजांच्या काळात हेच केलं गेलं का? तर नक्कीच नाही. महाराजांनी त्याच "चौरंगा" करण्याचा आदेश सोडला असता. चौरंगा म्हणजेच दोन्ही हात कोपर्यापासून आणि दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडणें!
अरे शिवरायांचा वारसा छातीठोकपणे सांगणारे आपण माता भगिनींच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्यांचा फक्त निषेध करतो हेच या मातीचे दुर्दैव.
अरे कुठे जाऊन बसले ते माताभगिनींच्या संरक्षणाचे आश्वासन देऊन मते मागणारे?
कुठे जाऊन बसल्या त्या भगिनी ज्यांनी मंदिरप्रवेशासाठी अवघा महाराष्ट्र हलवून सोडला?
कोणत्या भीतीने लपून बसली ती मीडिया जी हागण्या मुतण्याची पण ब्रेकिंग न्यूज करते?
काय चाललंय हे
"बेटी बचाओ बेटी बचाओ" कशासाठी? या अशा वासनांध गिधाडांना लचके तोडायला देण्यासाठी?
आंदोलने,निवेदने, निषेध, आणि विरोध याने होणार आहे.
शासन कठोर शिक्षेचे आश्वासन देणार त्यानंतर सरकारी वकील वर्षानुवर्षे न्यायालयाच्या पायऱ्या झिझवणार, वाद प्रतिवाद चालणार, आणि काही वर्षांनी त्याच्या तुरुंगातील आत्महत्येच्या प्रयत्नाने किंवा वागणुकीने भावनिक होऊन त्याची शिक्षा माफ करणार.
तोपर्यंत या कायदेशीर परंपरेने हे सोकावलेले नराधम पुन्हा भक्ष्याच्या शोधात राहणार आणि आपल्या माताभगिनी जीव मुठीत घेऊन जगावं लागणार.
हे कुठंतरी थांबायला हवं आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने आता आपल्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी वेळप्रसंगी हाती तलवारही घ्यायला हवी.
बस्स झाला आता निषेध आता हवा शिवशासनाचा चौरंगा
सागर नवनाथ ननावरे
भीती कुणाची कशाला.......?
`भित्यापाठी ब्रह्मराक्षस…आपण आपल्या दैनंदिन जीवनात कितीतरी वेळा ही म्हण वापरत असतो. माणसाला किंबहुना त्याच्या प्रगतीला मर्यादा आणणारी एकमेव आणि मुख्य गोष्ट म्हणजे"भीती." प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रकारची एक अनाहूत भीती नेहमीच असते.
शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या धोक्याची जाणीव होऊन तत्पर राहण्यासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी ठराविक मर्यादेपर्यंत भीती वाटणे साहजिकच आहे मात्र ही भीती आपल्या आयुष्यातील एकमोठी कमतरता ठरणे मात्र नक्कीच धोक्याचे आहे. आपल्याकडे अगदी लहानपणापासूनच जपण्याच्या नावाखाली पाण्यात उतरू नकोस, आगीला हात लावू नकोस, झाडावर चढू नकोस अशाप्रकारच्या भीती मनात रुजवल्या जातात. त्या त्या वयानुसार किंवा काळानुसार ते सारं काही ठीक आहे परंतु हीच भीती पुढे जाऊन आपल्या असमर्थतेच कारण बनली तर? याचाही आपण विचारकरायला हवा.
भीती ही एक संवेदना आहे आणि या संवेदनेवर समर्थपणाने आणि सक्षम मानसिकतेने मात करता येणे अगदी सहज शक्य आहे. भितीवरच मला माझ्याच आजूबाजूला घडलेली एक गोष्ट येथेआवर्जून नमूद करावीशी वाटते.
प्रवीण हा आमच्या शेजारच्या काकूंचा एकुलता एक आणि लाडका मुलगा,लहानपणापासूनच प्रचंड लाडात वाढलेला. काही दिवसानंतर ते आणि त्यांचे कुटुंब आमच्या शेजारच्याच एक गावातस्थायिक झाले होते. गेल्या महिन्यात बऱ्याच दिवसांनी त्याचे बाबा भेटले मी त्यांची आपुलकीने विचारपूस केली आणि प्रवीणबद्दल विचारले. प्रवीणबद्दल विचारताच त्यांचा चेहरा उतरला आणि तेसांगू लागले, "त्याला फोबिया नावाचा मानसिक विकार झाला असून, तो घरीच पडून असतो."
ऐकूनच मन अस्वस्थ झाले शाळेत पहिल्या क्रमांकाने पास होणारा प्रवीण सारखा हुशार विद्यार्थी आज बिछान्यास खिळून पडला होता. त्याच्या बाबांशी चर्चा केली असता समजले की हा भीतीचाविकार असून गेल्या वर्षी यात्रेत त्याला आम्ही आग्रहाने मोठ्या पाळण्यात बसवले खरे परंतु पहिल्या दोन फेरीतच तो चक्कर येऊन पडला. आणि तेव्हापासून त्याला उंचीची प्रचंड भीती वाटते आणिआम्ही पाचव्या मजल्यावर राहत असल्याने तो घराबाहेर पाडण्यासही घाबरतो.
लहानपणापासून एकुलता एक असल्याने त्याच्या आईबाबांनी त्याला नेहमीच आव्हानात्मक गोष्टीपासून दूर ठेवले परिणामी आज आयुष्यातल्या प्रत्येक क्षणावर भीतीचे सावट आहे. आईबाबाआणि त्याच्या मनातील अनामिक भीतीमुळे आज काहीतरी करून दाखवण्याच्या उमेदीच्या वयात आईबाबांना त्याची सेवा करावी लागत आहे.
जर जिजाऊने हाताला कापेल म्हणून शिवाजीच्या हातात तलवार दिली नसती तर आज स्वराज्याचा एवढा दैदिप्यमान इतिहास घडला असता का? नाही कारण प्रत्येक संकटावर आणि भीतीवर मातकरण्याचे आणि त्याला सामोरे जाण्याचे बळ त्या माउलीने शिवबाला दिले होते. भगतसिंग, स्वा. सावरकर,चंद्रशेखर आझाद या देशभक्तांनी कोणत्याही भयाला न जुमानता जुलमी ब्रिटीशसत्तेविरुद्ध लढा दिला म्हणूनच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत.
या जगात भीती घालविण्याचा एकच मार्ग आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीला मुद्दाम सामोरे जाणे, वारंवार ती गोष्ट करणे आणि जिद्दीने संकटांना आव्हान देणे.
चला तर मग भीती नावाच्या पारतंत्र्यातून आपल्या मनाची सुटका करून घेऊन स्वातंत्र्याचा आणि भयमुक्त जीवनाचा आनंद घेऊया.
सागर नवनाथ ननावरे
वारी : एक सक्सेस गुरु
वारी : एक सक्सेस गुरु
पाऊले चालती पंढरीची वाट......
आषाढ सुरु झाला की पावसाळ्यात पालख्यांचे वेध लागतात. आषाढी एकादशी साठी पंढरीची वारी हे तमाम वारकर्याचं आणि भक्तांचं व्रत मानलं जातं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक लोकजीवनाचा संपन्न असा वारसा आहे.
दरवर्षी येणारी पंढरीची वारी ही तमाम भक्तगणांना पराकोटीचा आनंद तर देतेच त्याचबरोबर ही वारी यशासाठी झटणाऱ्या प्रत्येकाला एक प्रेरणाही देते. ही पंढरीची वारी ही एक सक्सेस गुरु म्हणून आपल्या प्रत्येकाला जणू एक अनोखा संदेशच देत असते.
खालील मुद्द्यांच्या आधारे ही वारी आपल्या आयुष्यातील यशाबद्दलची गणिते कशी ठरविते हे आपल्या लक्षात येईल.
१. ध्येय निश्चिती :
पंढरीच्या वारीतील प्रत्येकाने एक ध्येय आखलेले असते आणि ते ध्येय म्हणजे विठोबाचरणी नतमस्तक व्हायचे. यात प्रत्येक वारकरी हा वारीच्या माध्यमातून एकादशीला विठोबा चरणी मस्तक ठेवण्याचे ध्येय साकार करीत असतो.
२. शिस्तबद्धपणा व एकी :
ध्येयाच्या दिशेने धावणाऱ्या या वारकऱ्यांच्या कमालीची शिस्तबद्धता आपल्याला आढळून येते. यात हरिनामाचा गजर करत लाखोंच्या संख्येने सामील झालेल्या प्रत्येकात शिस्त पालनाचे तत्व ठासून भरलेले असते. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही आणि सर्वजण मिळून एकीने आपले ध्येय साध्य करू हा एकमात्र मंत्र ते मनात जपत असतात. आपणही अशीच एकी आणि शिस्त आपल्या ध्येयाच्या वाटचालीत अंगी बनवायला हवी.
३. वक्तशीरपणा आणि नियोजन :
कोणत्याही कारणाने चालढकल न करता वारीतील सर्व धार्मिक क्रिया या नियोजनबद्ध आणि वेळच्या वेळीच केल्या जातात. कोणत्या दिवशी कुठे मुक्काम? किती वाजता पोहोचायचे? कसे निघायचे? मार्ग कोणता ? या सर्व गोष्टींचे नियोजन अगदी वक्तशीरपणे आचरणात आणले जाते.
वक्तशीरपणा आणि नियोजन हे गुण प्रत्येक व्यक्तीच्या आचरणात आढळत नसले तरीही ध्येयप्राप्ती साठी प्रत्येकाने आत्मसात करावेत इतके महत्वपूर्ण आहेत.
४. निष्ठा :
वारीत आपल्या परमेश्वराच्या भेटीप्रती असणारी प्रत्येकाच्या मनातील प्रामाणिक निष्ठा ही सर्वांना अचंबित करणारी असते. कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार मनात न आणता आणि एकमेकांचे पाय मागे न ओढता एकनिष्ठेने आणि एकदिलाने ध्येय साध्य करण्याचा राजमार्ग आपल्याला वारीतून शिकायला मिळतो.
५. जिद्द आणि इच्छाशक्ती:
कधी उन्हाची काहिली तर कधी पावसाच्या सरी, पायात काटेकुटे, रस्त्यांत खड्डेखुडडे आणि अनेक इतर आव्हानांवर मात करीत प्रत्येकजण जिद्दीने पायी चालत असतो. शरीरावरचे ओझे मनावर न आणता जिद्दीने ध्येय कसे गाठावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच पंढरीची वारी होय.
६. सातत्य:
शेकडो मैलांचा प्रवास पायी चालताना थंडी वाजते, पाय दुखू लागतात, प्रचंड थकवा येऊ लागतो परंतु तहानभूक विसरून ध्येयासाठी हरिनामाचा गजर मात्र सातत्याने चालू असतो. कोणत्याही कारणाने न थकता न भागता ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हवे असणारे सातत्य आपल्याला वारीतून अनुभवायास मिळते.
७. नव्या ध्येयाची आस:
अनंत अडचणींचा सामना करून एकादशीला त्या पांडुरंगाच्या चरणी माथा ठेवून ध्येयप्राप्तीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत असतो. परंतु एवढ्यावर समाधान न मानता"पुढच्या वर्षी पुन्हा वारी घडू दे" ही नव्या ध्येयाची नवी आस जीवनाला एक वेगळाच अर्थ निर्माण करून देते.
आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी पंढरीची वारी ही एक सक्सेस गुरु म्हणून आपणाला नक्कीच एक नवी ऊर्जा आणि एक नवी प्रेरणा देऊ शकते. पंढरीच्या वारीप्रमाणेच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील यशाची वारी सदा सुफळ संपन्न होवो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना...!
सागर नवनाथ ननावरे
Subscribe to:
Posts (Atom)