"जल है तो कल है "
अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असताना आणि पावसाळ्यास बराच अवधी शिल्लक असतानादेखील शहरांत होणारा पाण्याचा अपव्यय हि चिंतादायी बाब आहे.पुणे शहरात जुलै पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याच्या बातमीने पुणेकरांनी अगदी निर्धास्तपणे पाण्याचा वापर जैसे थे असाच चालू ठेवला आहे आणि हीच शहरासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. प्रत्येकाने आपत्काळातील जबाबदारी म्हणून पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल आणि जलसंधारणासाठी सजग नागरिक म्हणून आपणास काय करता येईल याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केवळ स्मार्ट सिटीच्या गप्पा मारून काहीही होणार नाही तर यासाठी समाजाने खर्या अर्थाने जलसाक्षर होऊन स्मार्ट होणे हि काळाची गरज आहे.आगामी काळात स्मार्ट सिटीचे नियोजन करतांना बांधकाम विभागाने ईमारत परिसरात रेन हार्वेस्टिंग सारख्या विविध प्रभावी प्रकल्पांचा वापर करणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. जलसाक्षर झालो तर पाण्याच्या योग्य नियोजनातून दुष्काळावर मात करता येऊ शकते आणि यातून भविष्यात सुजलाम सुफलाम शहर आणि राष्ट्र नक्कीच उदयास येईल.
सागर नवनाथ ननावरे
धनकवडी, पुणे

0 comments:
Post a Comment