Wednesday, 30 December 2015

नव्या वर्षात जाताना...

२०१५ माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय वर्ष...

खूप काही दिलं या नवीन वर्षाने   नवीन मित्र,नाती अनुभव,यश-अपयश आणि जिद्दीने जगण्याची प्रेरणाही.

गतवर्षात अपेक्षेइतका पैसा नाही कमावता आला कदाचित पण तुमच्यासारखी जी जिवलग व गोड माणसे मिळाली हि करोडो रुपयांना ही लाजवणारी होती.

गतवर्षात माझ्या सुख- दुखात,आनंदात आपला प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे  सहभाग हा नक्कीच सुखावणारा होता. त्याचप्रमणे गतवर्षात मिळालेल्या माझ्या लेखनरुपी  यशाला आपल्या कौतुकाची जी सोनेरी किनार मिळाली हीच माझी प्रेरणा ठरली.

आपले सर्वांचे प्रेम,आधार आणि प्रेरणा येत्या नवीन वर्षातही अशीच राहो तसेच आपली नाती वर्षानुवर्षे अशीच दृढ होत जावो हीच गणेशाचरणी प्रार्थना.

तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे नवीन वर्षासाठी व येणाऱ्या नवीन यशासाठी खूप खूप शुभेच्छा 

आपलाच 

सागर नवनाथ ननावरे  

0 comments:

Post a Comment

 
;