Tuesday, 29 December 2015
                                                           साहित्यातील ध्रुवतारा निखळला


                                              "या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे"
या ओळींनी अखंड मानवजातीला जगण्याचा खरा अर्थ मिळवून दिला पण आज कविवर्य मंगेशकरांच्या जाण्याने या ओळीही पोरक्या झाल्या. कधी निमुटपणे अन्याय सहन करणाऱ्या समाजाच्या षंढ पानावर आपल्या काव्यातून ताशेरे ओढणारे पाडगावकर तर कधी जगण्यातला दुर्दम्य आशावाद जागविणारे कवी पाडगावकर खरं तर तमाम रसिकप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पाडगावकर हे एकमेवाद्वितीयच!
                                              निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही ! 
                                                आपल दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही !!
असं म्हणून स्वाभिमानी आणि स्वावलंबीपणा त्यांनी प्रत्येकाच्या नसानसात भरला. ' प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच नि आमचं सेम असतं',अशा  शब्दांत सर्वांना प्रेम करण्यास शिकवणा-या पाडगावकरांच्या प्रेमात संपूर्ण महाराष्ट्र पडला होता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर आपल्या कविता मनमुराद उधळणारा आणि आपल्या कवितांतून सर्वांचं जीवन समृध्द करणारा  पाडगावकरांसारखा दुसरा कवी मराठीत नाही..
मराठीला आपल्या कवितांनी चिरतरूण करणाऱ्या कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. कण्हत कण्हत जगण्यापेक्षा गाणे म्हणत जगायला शिकविणारे पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण  पाडगावकर जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या कविता मात्र अजरामर राहतील.
कविवर्य पाडगावकरांना विनम्र श्रद्धांजली.

- सागर नवनाथ ननावरे
Ref by:sagarnanaware.blogspot.in

0 comments:

Post a Comment

 
;