‘मनाचा कॅमेरा’
लग्नानंतर हनिमून साठी कुठे जा यचे यावर विचारमंथन चालू असताना मनात अनेक पर्यटन स्थळांची ना वे येउन गेली पण शिक्कामोर्तब क ाही होईना. अखेरीसजीवाचा "गोवा "करायचे ठरविले आणि गोव्याला जा ण्यासाठी निघालो. पुण्यावरून रा त्री बसलो असता सकाळी गोव्यात प ोहोचलो. भूरळ घालणारे समुद्रकि नारे वनिसर्गरम्य ठिकाणी सामूहि क सहल करण्यापेक्षा स्वतः जोडी ने वेगवेगळी ठिकाणे गाडीने जाऊन फिरण्याची मजा काही औरच होती. कलंगुट वर मनसोक्त पाण्यातभिजल् यानंतर जवळच २-३ किमी अंतरावर अ सणाऱ्या प्रसिध्द बागा बीच पा हण्यासाठी बीचच्या किनाऱ्यावरून जाताना पायाला मखमली स्पर्श दे णारी वाळू मनालाआनंद देत होती. समुद्राच्या उंच दुधाळ लाटा,कि नाऱ्यावरची नारळीची झाडे, भणा णणारा खारा वारा आणि या निसर् गसागराचा आनंद लुटणारे देशी
वि देशी पर्यटक अशीनयनरम्य दृश्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत चा ललो होतो. या साऱ्या आठवणी टि पणारा आमचा कॅमेरा म्हणजे जणू क ाही सच्चा सवंगडीच वाटत होता.
बागा बीच थोड्याच अंतरावर आलेला असतानाच जोरदार पावसाने त्या स ौंदर्यावर एक मनमोहक साज चढवला. आम्ही दोघे पूर्ण पावसात भिजलो होतो दोघांचेमोबाईल प्लास्टि कच्या पिशवीत ठेवले होते. अचानक फोन वाजू लागला म्हणून मी मोबा ईल बाहेर काढून पहिला तर वडिलां चा मिस कॉल दिसला परंतु गोव्या च्या यासौंदर्याचा आस्वाद घेण् यात मग्न असल्याने नंतर कॉल करत ा येईल म्हणून मी दुर्लक्ष के ले व फोन तसाच खिशात ठेवला. वरू न कोसळणारा जोराचा पाऊस आणिपोटा पर्यंत येणाऱ्या समुद्राच्या ला टा या आनंदात पूर्ण न्हावून नि घालो होतो. तासभर आनंदाचा आस्वा द घेतल्यानंतर अंधाराची चाहूल ल ागताच आम्ही बाहेर पडलोआणि रू मकडे जाण्यासाठी निघालो. पाऊस थ ांबलेला होता म्हणून घरी फोन कर ण्यासाठी मोबाईल काढला दोघांचे मोबाईल बंद होते.
कदाचित भिजल्यामुळे बंद पडले अस तील म्हणून रूम वे गेल्यावर सी मकार्ड काढून पंख्याखाली वळा यला ठेवून पहिला पण काही केल्या फोन चालू होत नव्हते.त्यानंतर मोबाईल स्टोअर मध्ये दाखवले परं तु ते डेड झाले असल्याचे कळाले आणि सर आनंदच क्षणात निवळला.
सकाळी पोहचल्यानंतर परत कॉल का नाही आला या काळजीपोटी घरचे का ळजीत असणार याची चिंता सतावत हो ती. आता कॅमेऱ्यात टिपलेले अवि स्मरणीय क्षणपरत कसे पाहता येणा र? पहिल्याच दिवशी अशी अवस्था झ ाल्याने पुढील दिवसांची क्षणचित्रे कशी काढता येणार ? आणि आता संपूर्ण टूर एकदम निरस होणार या विचारांनी मन कासावीस झाले. पाहता पाहता ते २/३ दिवस अगदी धमाल मौज मजेत निघूनही गेले. पुण्याला येताना गाडीत एकूणच टूर बाबत मनात विचार येऊ लागले. आणि या गोव्याच्या भेटीत काय गमावले आणि काय कमावले याची वेगवान चक्रे मनात फिरू लागली. मोबाईल आणि त्या क्षणांच्या आठवणींना या टूर मध्ये मुकलो होतो पण मोबाईल मुक्त टूर चा आनंद विनाव्यत्यय घेतला होता.
कॅमेऱ्यात फोटो टिपण्याच्या ना दात तो निसर्ग मनामध्ये साठवा यला विसरलो नव्हतो. निसर्गाचे त े चित्तवेधक आणि अद्भुत रूप मना च्या कॅमेऱ्यात भरभरून साठवलेहो ते. ना कॉल ना मेसेज ना व्होट्स अप फक्त आणि फक्त भटकंतीचा आनं द .
बऱ्याचदा आपण कॅमेऱ्यात क्षण टिपण्याचा प्रयत्न करतो आणि एखा द्या सुंदर कलाकृतीचा,स्थळाचा अ थवा अविस्मरणीय क्षणाला आपल्या मनात साठवायलाविसरतो. एकूणच या गोवा ट्रीपने मला हे चांगलं कळ लं कि कॅमेऱ्याने आपण ते सारे क्षण फोटो पाहून आठवू शकतो पण आ पल्या मनाच्या कॅमेऱ्यात मात्र ते साठवूशकत नाही. पाहिले दोन द िवस मोबाईलविना घालवताना नशीबच फुटकं सारखे ‘फुटकळ’ विचार मना त आले पण नंतर मात्र एका उक्ती चा चांगलाच साक्षात्कार झालाआणि तो म्हणजे " जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं".
0 comments:
Post a Comment