Wednesday, 1 July 2015

श्री. शरद पवार फेसबुक लाइव्ह चॅट




राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरद पवार फेसबुक लाइव्ह चॅटद्वारे नेटिझन्सशी संवाद साधत असताना साहेबांशी शेअर केलेले दोन प्रश्न  (दि. १ जुलै २०१५ )




या वर्षात शेतकऱ्यांचे मागील वर्षांपेक्षा ५०% नुकसान झाले आहे. २५% अवकाळी पावसाने व २५% बाजारभावाने , ही वस्तुस्थिती शेतकर्याचे कुटुंबच जाणते. "ज्याचे जळते, त्यालाच कळते." भलेही त्यात सरकारचा हात नसेलही, पण गुजराथी व्यापार्यांसाठी कमी बाजार भावाकडे दुर्लक्ष केले गेले , अशी शंका वाटते. असो . यापुढे काहीतरी ठोस उपाय योजना करतील अशी अपेक्षा करूयात. मदत देण्यापेक्षा बाजारात स्थिरता आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा 
.शेतकऱ्यांची परिस्थितीत हलाखीची असून त्यांच्या प्रश्‍नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा तयारी असल्याचा इशारा आपण काही दिवसांपूर्वी दिला होतात. तर साहेब यादृष्टीने आपली पुढील भूमिका काय असेल ? आणि त्यादृष्टीने सरकारचा कौल काय असेल? 

सागर नवनाथ ननावरे,
भोर,पुणे 


साहेब नमस्कार 
महाराष्ट्रातील जाणता व मुत्सद्दी लोकनेता अशी आपली ख्याती आहे. महाराष्ट्राचे राजकारण आजही आपल्याशिवाय अपूर्णच आहे.
साहेब महाराष्ट्र हि साधुसंतांची आणि पुरोगामी विचारांची भूमी आहे आणि याचा प्रत्येक मराठी माणसाला सार्थ अभिमानही आहे. परंतु 
साहेब आता भीती वाटते हो या महाराष्ट्रात राहण्याची आणि आपले विचार राबविण्याची.
विवेकाचा आवाज बुलंद करणाऱ्या महापुरुषांना पूर्वीपासूनच प्राणांची आहुती द्यावी लागली आहे. आजही तीच परिस्थिती आहे; पण शेवटी लगाम राज्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या हातात असतो. त्यामुळे प्रतिगामी विचारसरणी आपल्याला मागे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे या दोन पुरोगामी विचारांची हत्या. साहेब महिने, वर्षे उलटून जातात पण गुन्हेगारी वृत्ती बेलगामपणे आपले तांडव सुरूच ठेवतात. साहेब तुमच्याकडून उभ्या महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत . महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय साहेब . मला आपणास एवढेच विचारायचे आहे साहेब यासाठी आपली काय भूमिका असेल.?एक पुरोगामी आणि वैचारिक व्यक्तिमत्व म्हणून आपली ख्याती आहे तर आपण यावर आपले विचार व्यक्त करावेत अशी अपेक्षा करतो. आपल्या अभ्यासू विचाराने आणि आशादायक उत्तराने कदाचित आमच्यासारख्या सर्वसामान्यांना आधार तरी मिळेल .



सागर नवनाथ ननावरे,
भोर,पुणे 





0 comments:

Post a Comment

 
;