वाहतूक समस्या गंभीर
पुणे शहरात वाहतूक समस्या हि गंभीर स्वरुपाची आहे. शहरात रस्त्यांपेक्षा वाहने जास्त, बेशिस्त वाहनचालक, त्यांना पोलिसांचा धाक नाही, रस्त्यावरती सुरू असलेली कामे आणि लहान रस्ते यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. शहराच्या बाजारपेठेसह प्रत्येक रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावण्याचा प्रकार व शहरातील अवैध वाहतुकीचे तळ यामुळे चालणेही अवघड होवून बसले आहे. शहराच्या रहदारीचा प्रश्न सोडवण्यासाठी असलेल्या पोलिसांना दिवसभर ट्रॅफिक जाम होत असल्याने व पोलीस केवळ अवैध वाहतुकीच्याच मागेपुढे फिरत आहे . परिणामी दररोज पोटाच्या खळगीसाठी राबणाऱ्या शहरवासीयांना वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडावे लागत आहे. हा प्रश्न सोडवायचा कोणी? हाच सवाल कायम राहत आहे.

0 comments:
Post a Comment