सामाजिक पर्यटनाला सामाजिकतेचे भान असावे ....
शहरातील पर्यटकांची गावातील मातीशी नाळ जोडली जावी आणि दुर्गम भागातातील लोकांसाठी अमूल्य काम करणाऱ्या समाजसेवकांचीही ओळख व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आता 'सोशल टुरिझम' सुरू केले आहे ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे. परंतु त्यादृष्टीने तेथील शांतता, स्वच्छता आणि नैसर्गिकता याला मनमौजी पर्यटकांकडून तडा जाणार नाही याबाबतही योग्य ती यंत्रणा एमटीडीसी ने कार्यरत करावी. स्थानिकांनाच याबाबत जबाबदारी द्यावी जेणेकरून त्यांना रोजगारही मिळेल आणि त्या स्थळाचे पावित्र्यही टिकून राहील. केवळ कागदोपत्री
सामाजिक स्थळांनाही 'पर्यटनस्थळ' म्हणून घोषित करू नये तर तेथील सामाजिक वारशाचे जतन होईल यासाठी प्रयत्न व्हावेत अन्यथा त्याचीही गड आणि किल्ल्यांप्रमाणे चिंतादायक अवस्था होण्यास वेळ लागणार नाही.
- सागर नवनाथ ननावरे
ब्लॉग : sagarnanaware.blogspot.in

0 comments:
Post a Comment