Wednesday, 10 June 2015

स्व. साधनाताई बाबा आमटे : स्त्रीशक्ती

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या कि सर्वांचा कल सुट्टी एन्जोय करायला फिरायला जाण्यासाठी असतो . मनात विचार चालू होता सर्वत्र हीच परिस्थिती असणार आणि क्षणात याला अपवाद असणारे स्थळ आठवले ,अपवाद कसला भूतलावरच माणुसकी जपणार खर जगच ते !
त्या अनोख्या आणि वैविध्यपूर्ण जगच नाव म्हणजेच ' आनंदवन ',बाबा आमटेच आनंदवन .
स्व. बाबा आमटे म्हणजे महान कर्मयोगीani त्यांच्या संकल्पनेतून या आनंदवनाची निर्मिती झाली . आज  आमटे  आमटे कुटुंबातील चौथी पिढी समाजकार्यात तल्लीन आहे , सर्वांचेच योगदान हे अतुलनीय !
पण मला इथे खास करून उल्लेख करावासा वाटतो ते बाबांच्या अर्धांगिनी आणि आनंदवनातील हजारो कुष्ठरोग्यांची माउली म्हणून संबोधल्या जाणाऱ्या स्व. साधनाताई बाबा  आमटे. आज मे साधनाताईची जयंती त्या निमित्तानेच ताईबाबत थोडेसे  .
२००९ साली महाविद्यालयाच्या सहलीच्या निमित्ताने आनंदवनाला जाण्याचा योग आला आणि धन्य झालो.tyatch दुग्धशर्करा योग म्हणावा तो म्हणजे साधनाताई आमटे यांची भेट. महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून साधनाताईची मुलाखत घेण्याचे भाग्य मला लाभले. मला आजही आठवतो तो दिवस एक नाजूक,गोरापान आणि पाणीदार डोळे असणारा त्या माउलीचा चेहरा .चेहर्यावरिल तेजाने आणि बोलण्यातील आत्मविश्वासाने जणू त्यांच्या वयाला लपवूनच ठेवले होते. या मुलाखतीत साधनाताईनी  आपला संपूर्ण जीवनप्रवास उलगडून सांगितला . आजच्या पैशाच्या हव्यासापोटी आणि परंपरांच्या दोरखंडात बांधलेल्या सर्वाना लाज वाटायला लावणारा तो जीवनप्रवास. य़ा  मुलाखतीतील अनेक गोष्टी जीवन जगण्याची खरी कला शिकवून गेल्या.
साधारणत १९४६ चा तो काळ होता स्वातंत्र्यपूर्व काळ समाजाच्या हितासाठी या त्या कारणाने बाबा आमटे झटतच होते. ताईच्या वर्णनानुसार वाढलेले केस ,साधा पोशाख आणि सतत विचारमग्न असणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे बाबा उर्फ देविदास आमटे. अगदी एखाद्या विरक्त साधूप्रमाणे दिसणारे . नागपूरला एका लग्नात बाबांची आणि इंदुताई ( ताईचे माहेरकडील नाव )यांची नजरानजर झाली. इंदू हि खास आपल्यासाठीच देवाने बनवलेली असावी असा बाबांना साक्षात्कार झाला असावा आणि म्हणूनच पहिल्या भेटीतच बाबा त्यांच्या प्रेमातही पडले. नंतर साधनाताईच्या घराकडे बाबांचे येणे-जाणेही वाढले. आणि  नजरानजरेत ताई सुद्धा बाबांकडे आकर्षित झाल्या .पण बाबांच्या साधूप्रमाणे असणाऱ्या अवताराकडे पाहून  साधनाताईच्या घरच्यांनी त्यांची निर्भत्सना केली . पण म्हणतात काही नाती देवाने वरच बांधलेली असतात त्याला कोणीही काहीही  करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे घरच्यांच्या विरीधला जुमानता साधनाताईनी बाबाशी विवाह केला. आजही आंतरजातीय विवाह, परंपरा ,रूढी आणि पैशामध्ये गुरफटलेल्या समाजाला लाजवणारी पण बोधप्रद शी हि गोष्ट. समाजसेवेत सतत आपले योगदान देणाऱ्या बाबांना त्यांच्या जीवनाचे ध्येय सापडत नव्हतेमात्र साधनाताई त्यांच्या आयुष्यात आल्या आणि त्यांना काही दिवसातच त्यांना त्यांचे ध्येय सापडले. हातपाय झडलेला पावसात भिजणारा माणूस पाहून बाबा सुरुवातीला घाबरले खरे पण हाच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पोइंत ठरला . परत येउन त्यांनी त्या माणसाची सेवा केली पण ते त्याला वाचवू शकले नाहीत आणि यानेच एक बोध घेऊन बाबांनी आणि ताईनी स्वतःला कुष्ठरोग्यांच्या सेवेत वाहून घ्यायचे ठरविले आणि यात
                             'साथी हात बढाना ,एक अकेला थक जाये तो
                               मिलकर बोझ उठाना'
या गीतातील ओळींप्रमाणे साधनाताईनी बाबांना साथ दिली. आणि यातूनच पुढे आनंदवन उभारले आणि जगभरातील कुष्ठरोग्यांसाठी ते एक आशास्थान बनले.    
समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारी ,त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारी आणि बाबांना साथ देऊन त्यांच्यामध्ये जगण्याची एक नवी उमेद निर्माण करणारी स्त्रीशक्ती म्हणजेच साधनाताई .
कुष्ठरोगी,अनाथ ,अपंग आणि समाजातील रंजल्या-गांजलेल्यासाठी आश्रम उघडण्यात तसेच पर्यावरण,वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचावो आंदोलनात बाबांच्या पाठीशी खंबीरपणे साधनाताई उभ्या राहिल्या.
आणि म्हणूनच बाबा म्हणायचे माझ्या या कार्यात माझ्या सौभाग्यवतीचा खूप मोठा वाटा आहे तिच्या साथीमुळेच मी हे सर्व करू शकलो.
समाजसेवेत बाबांबरोबर आणि बाबांच्या निधनापश्चातही सुरु असणारा हा समाजसेवेचा झरा २०११ साली आटला. ताईचे निधन झाले आणि आनंदवनातील हजारो माणसे त्या माउलीच्या सुखाला पोरकी झाली .
बाबा आणि ताईपश्चात त्यांची मुले,सुना आणि नातवंडे आजही समाजकार्याचा वारसा समर्थपणे चालवत आहेत हि नक्कीच अभिमानास्पद बाबा आहे
ताईच्या 'समिधा' या आत्मचरित्रपर पुस्तकावर एक मराठी चित्रपटही प्रदर्शित होतोय. काही दिवसांपूर्वी प्रकाश बाबा आमटे ,सिंधुताई सकपाळ यांच्यावरही सिनेमे आले आणि त्यानंतर या समाजाला त्यांच्या कर्तुत्वाची जान झाली. आता ताईवर जो चित्रपट येतोय तेव्हा या चित्रपटातून का होईना या कुष्ठरोग्यांच्या माउलीचे आणि बाबांच्या अर्धान्गीनीचे कार्य सर्वाना समजावे .
मौजमजेसाठी पर्यटन स्थळांना भेटी देण्यापेक्षा आपल्या व्यंगावर मात करून एक सुंदर जग बनविलेल्या जिद्दी लोकांच्या 'आनंदवनाला 'भेट देऊन आपल्यात  आणि आपल्या येणाऱ्या पिढीला माणुसकीचा दिवा काही अंश का होईना पण तेवत ठेवण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळेल.


0 comments:

Post a Comment

 
;