Friday, 26 June 2015 0 comments

सामाजिक पर्यटन

                               सामाजिक पर्यटनाला सामाजिकतेचे भान असावे ....
शहरातील पर्यटकांची गावातील मातीशी नाळ जोडली जावी आणि दुर्गम  भागातातील लोकांसाठी अमूल्य काम करणाऱ्या समाजसेवकांचीही ओळख व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आता 'सोशल टुरिझम' सुरू केले आहे ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे. परंतु त्यादृष्टीने तेथील शांतता, स्वच्छता आणि नैसर्गिकता याला मनमौजी पर्यटकांकडून तडा जाणार नाही याबाबतही योग्य ती यंत्रणा एमटीडीसी ने कार्यरत करावी. स्थानिकांनाच याबाबत जबाबदारी द्यावी जेणेकरून त्यांना रोजगारही मिळेल आणि त्या स्थळाचे पावित्र्यही टिकून राहील. केवळ कागदोपत्री
सामाजिक स्थळांनाही 'पर्यटनस्थळ' म्हणून घोषित करू नये तर तेथील सामाजिक वारशाचे जतन होईल यासाठी प्रयत्न व्हावेत अन्यथा त्याचीही गड आणि किल्ल्यांप्रमाणे चिंतादायक अवस्था होण्यास वेळ लागणार नाही.

- सागर नवनाथ ननावरे


 ब्लॉग : sagarnanaware.blogspot.in
0 comments

Quote


0 comments

छत्रपती


0 comments

बालपण


0 comments

बालपण 2


Monday, 22 June 2015 0 comments

लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...


लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

समाजाचं अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं.

नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

कायदा सुव्यवस्थेला, कुणी भीत नाही राजे,

सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे,

आया, बहिणी, लेकी, सुना, पवित्र राहिली नाहीत नाती,

शासन करणाऱ्या तलवारीचीच गंजून गेलीयेत पाती.

आपल्या आब्रूचे लक्तर, आब्रू झाकण्यासाठीच मागावं लागतं,

नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

हिंदवी स्वराज्य स्थापन करून, तुम्ही निघून गेलात राजे,

राष्ट्र प्रेमच स्फुल्लिंग करून, तुम्ही निघून गेलात राजे,

पण... या पेटलेल्या राष्ट्रप्रेमावर, स्वताचीच पोळी भाजणाऱ्या...

आणि आमचीच मतं घेऊन, शेवटी सत्तेने माजणाऱ्या.

गल्लीबोळातल्या पुढाऱ्याला, "रयतेचा राजा" म्हणावं लागतं,

नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

इंग्रज इथं दीडशे वर्षे राज्य करून निघून गेले,

भारतीयांचं काय पाणी, ते भारतात राहून बघून गेले,

भारतीय संस्कृतीच्या छाताडावर, आता पाश्चात्य संस्कृती नाचतेय,

महाराष्ट्रीय तुतारीच्या नावाखाली, इथे इंग्रजीचीच पिपाणी वाजतीये.

माय मराठी मरतेय राजे आणि इंग्रजीला पालखीत बघावं लागतं

नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

ज्यांच्याकडे पैसा आहे, त्याचं जगणं झालाय मस्त,

नी पोटासाठी राबनाऱ्याच, इथं मरण झालाय स्वस्त,

किड्यामुंग्यासारखी इथं, जगताहेत मानसं,

दिवसाढवळ्या, आपलं मरण बघतायेत मानसं.

वेदना असह्य होतात, म्हणून इच्छा मरण मागावं लागतं

नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

तुमच्या सारखा छत्रपती पुन्हा इथे झाला नाही,

पुन्हा कुठल्या जिजाऊ पोटी शिवबा जन्माला आला नाही.

घराघरातल्या जिजाऊ आता, करियर वूमन होत आहेत,

संस्कार करण्या ऐवजी पोराला, पाळणाघरात देत आहेत.

कुत्र आई नी पोरगं दाई कडे असलेलं बघावं लागतं

नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

आता एक करा राजे, या पुढे प्रेरणा कोणाला देऊ नका,

अन कृपा करून तुम्ही आमच्या स्वप्नातही येऊ नका..

काय सांगू राजे, आता इथल्या तरुणाई बद्दल बोलवत नाही,

नी तुमच्या आदर्शाच ओझ, इथल्या तरुण खांद्यांना पेलवत नाही.

कर्तव्य विसरून आमची तरुणाई, आपल्याच मस्तीत मग्न आहे,

घराघरातील मूर्ती तुमची, मनामनात भग्न आहे.

तुमच्या जयंतीला राजे, वर्षातून दोन वेळा नाचावं लागतं

नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

अन्याय, अत्याचार, अधर्मावर, इथल्या माणसाचं जीवापाड प्रेम जडलंय,

आणि हिंदू पतपातशाहीवर राजे,दहशतवादच सावट पडलंय.

बॉम्बस्फोटाच्या भीतीने, वारा सुगंध देत नाही,

नी आपल्याच मातृभूमीत राजे, मोकळा श्वासही घेता येत नाही.

गुंड सुटतात मोकाट आणि निर्दोशांना वर्षानुवर्ष न्यायालयात लढावं लागतं

नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

स्वराज्य इथ आहे राजे, पण सुराज्याचा पत्ता नाही,

म्हणतात ना... कौरव सारे माजले आहे आणि पांडवानाच सत्ता नाही

विरोध करण्याची हिम्मत जाऊन, निष्क्रीयताच पक्की मुरली आहे,

माझीही तलावर बोथट झालीये, आता फक्त शब्दांनाच धार उरली आहे.

समाजपरिवर्तनाच चक्र इथं, दुबळ्या हातांनाच फिरवावं लागतं

नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

ताठ मानेनं जगावं म्हटलं, तर राजे, आपलीच मानसं जगू देत नाहीत,

आणि भ्रष्टाचारमुक्त, अखंड भारतच स्वप्न बघू देत नाहीत.

आता हीच निष्क्रिय मानसं, माझा सर्वस्व लुटतील,

आणि तुमच्यावर कविता लिहिली म्हणून माझ्या जीवावर उठतील.

तरी बरं तुमचंच रक्त वाहतंय, माझ्या नसानसामधनं म्हणून लिहावं लागतं

नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

जातील राजे, नक्की जातील, "हे हि दिवस" एकदिवस,

स्वताच्या चुकांची जाणीव होयील, प्रत्येकालाच एकदिवस.

मात्र त्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न हवेत करायला,

बुडणाऱ्याला काडीशिवाय, दुसरं काय लागतं तरायला?

पुन्हा एकदा त्याच डौलानं, भगवा झेंडा फडकणार,

कुणाच्याही चिथावणीने, आमची माथी नाही भडकणार.

आता आम्ही विचार करू, रायते साठी कष्ट करू,

समाज बदलण्यासाठी राजे, स्वतापासून सुरुवात करू.

तुमचेच वारस आम्ही राजे, फक्त रक्त उसळाव लागतं

हा समाज बदलण्यासाठीच राजे, या जगात जगावं लागतं...
0 comments
आयुष्य आपल्याला कधीतरी एकदम सहज हसण्याचं मोका देतं कि नाही? काय असावं त्या मागचं कारण? कारण हे असावं कि, ... तुमच्या नकळत तुमचंच कुणीतरी तुमच्यासाठीच देवाकडे काहीतरी मागतंय. हे "तुमचंच कुणीतरी" कधीकधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात नसतं, ... पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडेच असतं, ते "कुणीतरी" आपलं माणूस आहे हेही कळणे कठीण असते...कारण ते "कुणीतरी" आपल्या नजरेसमोर नसतं. म्हणून आयुष्य जेव्हा पण कधी तुम्हाला काहीतरी देतं, तेव्हा त्या "तुमच्याच कुणीतरीचे" मनातल्या मनात मनापासून आभार मानायचे. आणि त्याहून महत्वाचे आपणही कधीतरी कोणासाठी तरी त्या "कुणीतरीच्या" रांगेत उभे रहावे. कारण दुसऱ्यासाठी मागितलेले देव पटकन पूर्ण करतो असं म्हणतात..............!!!!"
- सागर ननावरे 
Wednesday, 10 June 2015 0 comments

स्व. साधनाताई बाबा आमटे : स्त्रीशक्ती

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या कि सर्वांचा कल सुट्टी एन्जोय करायला फिरायला जाण्यासाठी असतो . मनात विचार चालू होता सर्वत्र हीच परिस्थिती असणार आणि क्षणात याला अपवाद असणारे स्थळ आठवले ,अपवाद कसला भूतलावरच माणुसकी जपणार खर जगच ते !
त्या अनोख्या आणि वैविध्यपूर्ण जगच नाव म्हणजेच ' आनंदवन ',बाबा आमटेच आनंदवन .
स्व. बाबा आमटे म्हणजे महान कर्मयोगीani त्यांच्या संकल्पनेतून या आनंदवनाची निर्मिती झाली . आज  आमटे  आमटे कुटुंबातील चौथी पिढी समाजकार्यात तल्लीन आहे , सर्वांचेच योगदान हे अतुलनीय !
पण मला इथे खास करून उल्लेख करावासा वाटतो ते बाबांच्या अर्धांगिनी आणि आनंदवनातील हजारो कुष्ठरोग्यांची माउली म्हणून संबोधल्या जाणाऱ्या स्व. साधनाताई बाबा  आमटे. आज मे साधनाताईची जयंती त्या निमित्तानेच ताईबाबत थोडेसे  .
२००९ साली महाविद्यालयाच्या सहलीच्या निमित्ताने आनंदवनाला जाण्याचा योग आला आणि धन्य झालो.tyatch दुग्धशर्करा योग म्हणावा तो म्हणजे साधनाताई आमटे यांची भेट. महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून साधनाताईची मुलाखत घेण्याचे भाग्य मला लाभले. मला आजही आठवतो तो दिवस एक नाजूक,गोरापान आणि पाणीदार डोळे असणारा त्या माउलीचा चेहरा .चेहर्यावरिल तेजाने आणि बोलण्यातील आत्मविश्वासाने जणू त्यांच्या वयाला लपवूनच ठेवले होते. या मुलाखतीत साधनाताईनी  आपला संपूर्ण जीवनप्रवास उलगडून सांगितला . आजच्या पैशाच्या हव्यासापोटी आणि परंपरांच्या दोरखंडात बांधलेल्या सर्वाना लाज वाटायला लावणारा तो जीवनप्रवास. य़ा  मुलाखतीतील अनेक गोष्टी जीवन जगण्याची खरी कला शिकवून गेल्या.
साधारणत १९४६ चा तो काळ होता स्वातंत्र्यपूर्व काळ समाजाच्या हितासाठी या त्या कारणाने बाबा आमटे झटतच होते. ताईच्या वर्णनानुसार वाढलेले केस ,साधा पोशाख आणि सतत विचारमग्न असणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे बाबा उर्फ देविदास आमटे. अगदी एखाद्या विरक्त साधूप्रमाणे दिसणारे . नागपूरला एका लग्नात बाबांची आणि इंदुताई ( ताईचे माहेरकडील नाव )यांची नजरानजर झाली. इंदू हि खास आपल्यासाठीच देवाने बनवलेली असावी असा बाबांना साक्षात्कार झाला असावा आणि म्हणूनच पहिल्या भेटीतच बाबा त्यांच्या प्रेमातही पडले. नंतर साधनाताईच्या घराकडे बाबांचे येणे-जाणेही वाढले. आणि  नजरानजरेत ताई सुद्धा बाबांकडे आकर्षित झाल्या .पण बाबांच्या साधूप्रमाणे असणाऱ्या अवताराकडे पाहून  साधनाताईच्या घरच्यांनी त्यांची निर्भत्सना केली . पण म्हणतात काही नाती देवाने वरच बांधलेली असतात त्याला कोणीही काहीही  करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे घरच्यांच्या विरीधला जुमानता साधनाताईनी बाबाशी विवाह केला. आजही आंतरजातीय विवाह, परंपरा ,रूढी आणि पैशामध्ये गुरफटलेल्या समाजाला लाजवणारी पण बोधप्रद शी हि गोष्ट. समाजसेवेत सतत आपले योगदान देणाऱ्या बाबांना त्यांच्या जीवनाचे ध्येय सापडत नव्हतेमात्र साधनाताई त्यांच्या आयुष्यात आल्या आणि त्यांना काही दिवसातच त्यांना त्यांचे ध्येय सापडले. हातपाय झडलेला पावसात भिजणारा माणूस पाहून बाबा सुरुवातीला घाबरले खरे पण हाच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पोइंत ठरला . परत येउन त्यांनी त्या माणसाची सेवा केली पण ते त्याला वाचवू शकले नाहीत आणि यानेच एक बोध घेऊन बाबांनी आणि ताईनी स्वतःला कुष्ठरोग्यांच्या सेवेत वाहून घ्यायचे ठरविले आणि यात
                             'साथी हात बढाना ,एक अकेला थक जाये तो
                               मिलकर बोझ उठाना'
या गीतातील ओळींप्रमाणे साधनाताईनी बाबांना साथ दिली. आणि यातूनच पुढे आनंदवन उभारले आणि जगभरातील कुष्ठरोग्यांसाठी ते एक आशास्थान बनले.    
समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारी ,त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारी आणि बाबांना साथ देऊन त्यांच्यामध्ये जगण्याची एक नवी उमेद निर्माण करणारी स्त्रीशक्ती म्हणजेच साधनाताई .
कुष्ठरोगी,अनाथ ,अपंग आणि समाजातील रंजल्या-गांजलेल्यासाठी आश्रम उघडण्यात तसेच पर्यावरण,वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचावो आंदोलनात बाबांच्या पाठीशी खंबीरपणे साधनाताई उभ्या राहिल्या.
आणि म्हणूनच बाबा म्हणायचे माझ्या या कार्यात माझ्या सौभाग्यवतीचा खूप मोठा वाटा आहे तिच्या साथीमुळेच मी हे सर्व करू शकलो.
समाजसेवेत बाबांबरोबर आणि बाबांच्या निधनापश्चातही सुरु असणारा हा समाजसेवेचा झरा २०११ साली आटला. ताईचे निधन झाले आणि आनंदवनातील हजारो माणसे त्या माउलीच्या सुखाला पोरकी झाली .
बाबा आणि ताईपश्चात त्यांची मुले,सुना आणि नातवंडे आजही समाजकार्याचा वारसा समर्थपणे चालवत आहेत हि नक्कीच अभिमानास्पद बाबा आहे
ताईच्या 'समिधा' या आत्मचरित्रपर पुस्तकावर एक मराठी चित्रपटही प्रदर्शित होतोय. काही दिवसांपूर्वी प्रकाश बाबा आमटे ,सिंधुताई सकपाळ यांच्यावरही सिनेमे आले आणि त्यानंतर या समाजाला त्यांच्या कर्तुत्वाची जान झाली. आता ताईवर जो चित्रपट येतोय तेव्हा या चित्रपटातून का होईना या कुष्ठरोग्यांच्या माउलीचे आणि बाबांच्या अर्धान्गीनीचे कार्य सर्वाना समजावे .
मौजमजेसाठी पर्यटन स्थळांना भेटी देण्यापेक्षा आपल्या व्यंगावर मात करून एक सुंदर जग बनविलेल्या जिद्दी लोकांच्या 'आनंदवनाला 'भेट देऊन आपल्यात  आणि आपल्या येणाऱ्या पिढीला माणुसकीचा दिवा काही अंश का होईना पण तेवत ठेवण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळेल.


 
;