बालगुन्हेगारांवरही प्रौढ़ाप्रमाणेच
खटले...
बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय सद्य परिस्थितीनुसार योग्य असला तरी हा केवळ मलमपट्टीचा उपाय वाटतो. कारण एखाद्या झाडाचे खोड कितीही वेळा कापले तरी जोपर्यंत मूळ साबुत आहे तोपर्यंत त्याची वाढ होतच राहणार अगदी त्याचप्रमाणे वेळोवेळी सुधारग्रुह आणि नंतर तुरूंगाची हवा खाऊन ही गुन्हेगारी पाळेमुळे कोवळ्या मनावर घट्ट रुजतात आणि उत्सुकता,थ्रील,मौजमस्ती आणि हव्यास यातून निर्माण कहाणीचा शेवट एखाद्या गुन्हेगाराच्या तलवारीवर किंवा पोलिसांच्या बंदुकीच्या गोळीवर काळ्या अक्षरात लिहिला जातॊ. इथं फक्त खेळाडू बदलतात पण खेळ मात्र तोच राहतो.
शासनाने यासाठी काहीतरी विधायक करणं गरजेचं आहे. जर बाबा आमटेसारखा एक व्यक्ती समाजाने टाकलेल्या हज़ारों कुष्ठरोगी लोकांना नवसंजीवनी देऊ शकतात तर आपण आपल्याच लोकांसाठी काही का नाही करू शकत ही नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. शासनाने आणि समाजाने शिक्षेपेक्षाही संस्कार आणि विचार याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ऐषाराम आणि हव्यासापोटी बंदूकीची 'ट्रीगर'हाती घेणाऱ्याना जगण्यासाठी कष्टाचा 'जिगर ' शिकवले पाहिजे. शासनाने केवळ एक कठोर निर्णय घेऊन कायमस्वरूपी बदलाची अपेक्षा करण्यापेक्षा शिक्षेसोबतच पून्हा अशा स्वरूपाचे क्रुत्य करण्यास कोणी धजावणार नाही यासाठी समाजप्रबोधनपर प्रयत्न करावे