Thursday, 21 May 2015
मुलांना कोषमुक्त जीवन जगू द्या...
'अवघे विश्वची माझे घर 'असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे .  आज आपल्या मुलांपलीकडे दुसरे जगच  नाही असे समजणाऱ्या  पालकांकडे पहिले की वाईट वाटते.आपला परिवार म्हणजेच आपलं जग आणि घरातील माणसे म्हणजेच अवघा समाज अश शिकवण नकळतच मुलांवर बिंबवली जात आहे.
शाळेवर छात्रशिक्षक म्हणून काम करताना एकदा  दिवसांसाठी एका िबिरासाठी आम्ही निघालो होतोहाटे सर्व शिक्षकवृंद  विद्यार्थी आणि त्यांना निरोपदेण्यासाठी आलेले पालक असा एक घोळका जमल होताकोणी आई आपल्या मुलाचे वारंवार पापे घेत होती तर कोणी रडत होतीनीट रहा ,जेवण करााळजी घ्याअसे शब्द सतत कानावर डत होतेकाही पालक तर ‘मुलांशी फोनवर बोलू द्याम्हणून आयोजकांपाशी हट्ट धरत होते.
अशी हि सारी परिस्थिती  पाहिल्यावर मनात विचार आले कशी घडणार हि मुले आणि कधी जगणार कोषाबाहेरचं जीवनत्यांना बाहेरच जग अनुभवता यावंत्यांच्याज्ञानात  पडावी,त्यांना शेअरिंग म्हणजे काय हे कळावं आणि अनुभवसमृद्धी वाढ व्हावी हा या विविध शिबिरांमागचा उद्देश असतोबाहेरच्या गर्दीत मुलाचे संस्कारहरवू येत म्हणून आपण त्यांना जर हाताला धरून ठेवले तर कशी कळणार त्यांना सामाजिकता आणि कधी येणार परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता.
मुलांबाबत प्रेम असण ,काळजी वाटण साहजिक आहे पण असे त्यांना पल्या विश्वात डांबून आपण अतिरेकाने त्याचं बालपण तर हिरावून ेत नाही नायाचाप्रत्येक पालकाने विचार करणे गरजेचे आहे.या अश वागण्याने आजकालच्या मुलांना उन्हाळ्याची सुट्टी आणि मामाचे गाव अशा संकल्पनांचा विसर पडत ाललाआहे.या घरकोंबडी वृत्तीमुळे मुलांच्या सूरपारंब्या ,कब्बडी,खो खो,आट्यापाट्या,आणि विविध ारीरिक हालचालींची जागा आज मोबईल आणि कॉम्पुटर गेम्सनेघेतली आहेपोहणे,धडपडत सायकल शिकणे,ावण्याची स्पर्धा,गच्चीवरचा पत्त्यांचा डाव,आणि रात्री बिछाने पसरून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत झोपीजाणे या बालपणीच्या सुखाला आजची पिढी पारखी झाली आहे.
पैशाच्या स्पर्धेत धावताना आपण आपल्या मुलांच्या संगोपनावर किती दुर्लक्ष करतो याची जाणीव आपल्याला व्हायला हवी,यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा.मुलांच्या निकोप वाढीसाठी  पालकांनी त्यांच्यावर लादलेली जीवनपद्धती आणि घातलेले सुरक्षाकवच त्यांना मारक  ठरणार नाही याची पालकांनी काळजी घ्यायलाहवी.
मुलांच्या बाह्य व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध  शिबिरांबरोबरच आंतरिक विकास आणि व्यक्ती ‘घडवण्यावर  भर देणारे कार्यक्रम,चित्रपटनाट्य,आणि विविधप्रोग्रॅमसाठी  पालकांनी स्वतःमुलांसोबत हजेरी लावली पाहिजेजाणीवपूर्वक बाहेरच्या कार्यक्रमांना एकटे पाठवून बाह्य जगाचा परिचय त्यांना करायला दिला पाहिजे.यातूनच मुलांची वेगवेगळ्या विचारप्रवाहांशी ओळख होऊन त्यांचे ्यक्तिमत्त्व परिपक्व व्हायला दत होईल.
आज संपर्काची इतकी साधनं उपलब्ध असताना कोणतीही भीती पालकांनी बाळगू नये  उलट यामुळे  मुलं स्मार्ट होतात हे लक्षात घ्यावंस्मार्टनेस म्हणजे फक्त ब्रँडेडवस्तू,कपडे किंव इंग्रजी बोलणे नाहीस्मार्टनेस म्हणजे आत्मविश्वासनिर्णयक्षमताव्यवहारीकतामुळात मुलांना चुका करण्याची संधीच आपण दिली  तरचं  त्यांचेनिर्णयकौशल्य वाढेल.  या सर्वातून मुलं इतकी तावून सुलाखून निघतील की उद्या मोठं झाल्यावर, जगतानाव्यवसाय करताना ज्या डचणी आणि आव्हानं समोरयेतील त्याला तोंड देण्यासाठी मुलं सदैव तयार असतील .”
 थोडक्यात पालकांनी मुलांवर लक् जरूर ठेवावं मात्र आयुष्याच्या रणांगणात कधीतरी मोकळ सोडावं.
या संदर्भात पालकांसाठी खालील ळी आवर्जून सुचवाव्याशा वाटतात ,
 'मुलांसाठी असू द्या मायेची उब
                            अन भावभावनांचा पसारा
   पण उद्याच्या भविष्यासाठी
                                    खुला राहू द्या विश्व सारा'

                                                           - सागर नवनाथ ननावरे, पुणे.                                                  
                                                                                                                                                                                                                                                 Mob: 9657991677

0 comments:

Post a Comment

 
;