‘प्रसिद्धीचा अपघात कि अपघाताची प्रसिद्धी’
हिट ऍण्ड रन‘ खटल्यात पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावलेल्या आरोपी अभिनेता सलमान खानची चर्चा देशभरात इतकी झाली किमनात प्रश्न पडला कि हा प्रसिद्धीचा अपघात कि अपघाताची प्रसिद्धी .
आणि या बातमीचा मिडीयाने एवढा मोठा प्रसार केला कि काही दिवसांपूर्वी भूकंपाने उध्वस्त झालेल्या नेपाळ आणि भारतातील काहीभूकंपग्रस्तांच्या वेदनांचा सर्वांना विसर पडला. खर तर सलमान खान चांगला कि वाईट ,दोषी कि निर्दोषी हे न्यायालय ठरवत असतानाजनमानसाने त्याबद्दल तत्काळ दिलेल्या प्रतिक्रिया जर भूकंपग्रस्तांच्या बाबत दिल्या असत्या तर माणुसकीला खरा न्याय मिळालाअसता. एव्हाना पैसा आणि सत्तेच्या मागे लागलेल्या सिलेब्रीटी आणि मोठ्या हस्तींनी दिलेला पाठींबा,गाठीभेटी,विरोध,धर्मांधराजकारण या साऱ्या लाजिरवाण्या वाटल्या. देशात बाकीच्या पण अनेक समस्या आहेत पण त्याला हि प्रसिद्धी मिळत नसल्यानेच सारेत्याबाबत अनभीज्ञ आहेत. आय पी एलचा धुमाकूळ आणि सलमान खान प्रकरणात गुरफटलेल्या मिडीयाला जर सर्वसामान्यांसाठीआणि एका सुजलाम सुफलाम भारताच्या भविष्यासाठी वेळ मिळाला तर याहून भाग्याची गोष्ट या काळासाठी दुसरी कोणती नसेल.
- सागर नवनाथ ननावरे
भोर,पुणे
0 comments:
Post a Comment