Sunday, 15 October 2023

नवरात्री ज्ञानत'रंग : आजचा रंग केशरी, पुस्तक: मनाचा अँटीव्हायरस

आजचा रंग : केशरी
आजचे पुस्तक : मनाचा अँटीव्हायरस

एक स्तंभलेखक म्हणून माझे पहिले  "मनाचा अँटीव्हायरस" या पुस्तकाचे 2016 साली प्रकाशन झाले.
 १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या जन्मस्थळी किल्ले पुरंदर येथे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. खासदार श्रीमंत संभाजी राजे यांच्या हस्ते पुरंदर गडावरील सभागृहात हे प्रकाशन पार पडले.   यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे,सिने अभिनेता भरत जाधव, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे आणि इतर अनेक मान्यवर या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. संभाजी महाराज जयंती महाराज जयंतीच्या निमित्ताने पुरंदर प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकाशन सोहळा पार पडला. सदर पुस्तकात व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी प्रेरणादायी असे लिखाण केलेले आहे.

 एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जगासमोर येण्यासाठी तसेच यश प्राप्त करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे.

सदर पुस्तकात व्यक्तिमत्व विकासासाठी अतिशय प्रेरणादायी असे लिखाण केलेले आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जगासमोर येण्यासाठी तसेच यश प्राप्त करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासावर आधारित निवडक लेख या पुस्तकात आहेत.

रुपगन्ध पुरवणीतील ५० लेखांचा समावेश असणारे १३६ पानांचे हे पुस्तक आहे. सदर पुस्तकाला व्याख्याते व लेखक डॉ. दत्ता कोहिनकर यांची प्रस्तावना असून, प्रसिद्ध हास्यकवी अनिल दीक्षित यांनी विशेष सदिच्छा दिल्या आहेत.

हे पुस्तक अनेक नामांकित ऑनलाईन साईटसवरही उपलब्ध असून सध्या बुकगंगा या ऑनलाईन बुक साईटवर सध्या उपलब्ध आहे.

0 comments:

Post a Comment

 
;