Friday, 13 October 2023

नवरात्री ज्ञानत'रंग : संकल्पना आयुष्यात रंग भरणारी 2023

हिंदू सणात नवरात्रीला खूप महत्व आहे. या वर्षी शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे आकर्षण नवरात्रीत असते.

धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.


लोक सहसा त्याच रंगाचे कपडे त्या दिवशी घालतात. इतकंच नाही, तर नवरात्रीची थीमही प्रत्येक दिवशीच्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या रंगांमध्ये केली जाते. सर्व सजावट आणि रोषणाई संबंधित दिवसाचा जो रंग असेल, त्याप्रमाणे केली जाते. पिवळा, मोरपंखी, राखाडी, नारंगी, पांढरा, लाल, निळा, गुलाबी आणि जांभळा हे प्रमुख नऊ रंग आहेत. हे रंग कधीच बदलत नाहीत, ते वर्षानुवर्षे सारखेच राहतात. फक्त दरवर्षी नवरात्रीला या रंगांचा क्रम बदलतो. 

या रंगांची प्रथेची सुरुवात झाली कशी, हे रंग कोण ठरवतं, याबाबत सर्वांनाच माहीत असतं असं नाही. छान वाटतं, छान दिसतं, टीम स्पिरीट ते देवीचं असतं, आमच्यात करतात इथपर्यंत काहीही कारणं असतात. पण खरं काय ते बऱ्याच लोकांना माहीत नाही. नवरात्री आणि रंगांचा काहीही संबंध नाही असेही बोलले जाते. असो हे सर्व वादविवादाचे मुद्दे आहेत.

परंतु देवीचा सण आहे, आनंद आणि उत्साहाला उधान आलेच पाहिजे. आणि म्हणूनच कपड्याच्या रंगांच्या वादात ना पडता यंदा एक आगळीवेगळी आयुष्यात ज्ञानाचे रंग भरणारी एक ज्ञानदायी संकल्पना मी मांडणार आहे.

जे रंग नवरात्रीत कपड्यांसाठी सुचवले आहेत. त्या रंगाचे मुखपृष्ठ असणारी आणि आपली बौद्धिक समृद्धी वाढविणारी पुस्तके आणि त्याचा थोडक्यात सरांश मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मांडणार आहे.

चला तर मग नऊ दिवस नऊ रंगांची नवरसयुक्त पुस्तके वाचूया आणि नवयशाला गवसणी घालूया


उद्याचा रंग - केशरी


- लेखन व संकल्पना - सागर नवनाथ ननावरे, पुणे -43

0 comments:

Post a Comment

 
;