पण या घटनेनं आणि या माणसानं खुपकाही शिकवलं..
आयुष्यात अनेकदा मोकळ्या अवकाशात अचानक निराशेचे मळभ दाटून येतात बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध घडू लागतात. अनेक गोष्टी हातून निसटून जातात. जिवाभावाची माणसं दगाफटका करतात. आदराला आदरांजली देत आरोप केले जातात, अपमान केला जातो. मनोधैर्याचे खच्चीकरण केले जाते.
पण अशा आव्हानात्मक परिस्थितीतही संयम न ढासळू देता, क्रोधाने न फणफणता, आरडाओरड न करता, निराश - वैफल्यग्रस्त न होता किंबहुना कसलीही तडफड न करता धीरोदत्त राहून, वेळेला प्रमाण मानून 'परिस्थिती' स्वीकारून लढाऊ मनस्थिती अंगीकारणाऱ्या एका माजी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद.
हा धडा आयुष्यात आम्हाला किंबहुना आमच्या मुलाबाळांना नक्कीच उपयोगी पडणार.... याच धडयातून भविष्यात 'कार्यकर्ता' नाही 'नेता'च घडणार
#MotivatedVibes #Inspiration
#RespectCM
#uddhavthackerayresigns #MaharashtraPoliticalCrisis
(अराजकीय प्रेरणा)
✍🏻 सागर ननावरे
0 comments:
Post a Comment