मनाचा अँटीव्हायरस
लेखक : सागर
ननावरे
ज्याप्रमाणे कॉम्प्युटर मध्ये व्हायरस शिरून
संपूर्ण फाईल्सचे नुकसान करून कॉम्प्युटर संथ करतो. आणि मग ते व्हायरस काढण्यासाठी
आपण अँटी व्हायरस नावाची टेक्नॉलजी वापरतो. ज्याने त्या कॉम्प्युटरचा वेग वाढतो व
कार्यप्रणाली सुरळीत चालते. मानवी जीवनाचेही तसेच काहीसे आहे. मानवाला मेंदूरूपी
एक सक्षम अशी यंत्रणा मिळाली आहे. परंतु अनेकदा त्यात निराशा,अपयश,न्यूनगंड,नकारात्मकता,आळस,भय
आणि ताणतणावासारखे व्हायरस मन मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करीत असतात. अशावेळी
व्यक्तीला गरज असते ती आत्मविश्वासाची योग्य मार्गदर्शनाची आणि सकारात्मक ऊर्जेची.
आणि याच गोष्टींनी परिपूर्ण असा पुस्तक संच म्हणजेच "मनाचा
अँटीव्हायरस".
व्यक्तिमत्व आणि स्वयंविकासासाठी असणारे यातील
लेख साध्या-सोप्या आणि मोजक्याच शब्दांत मांडले आहेत. यात दिलेली उदाहरणे,बोधकथा
या नक्कीच आपल्याला वास्तवाची जाणीव करून देऊन आपल्यात बदल घडवतील अशी आहेत.
0 comments:
Post a Comment