Sunday, 26 February 2017 0 comments

मटा साहित्य मैफल

आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये....
मटा साहित्य मैफलमध्ये निवड झालेल्या माझ्या "चिरतारुण्याचा विमा" या कवितेला रसिकांनी भरभरून आणि वन्समोर प्रतिसाद दिला
माझ्या कवितेच्या सादरीकरणासाठी मला प्रमाणपत्र आणि पुस्तक प्रदान करण्यात आले.
आजच्या महाराष्ट्र टाइम्स वर्तमानपत्रातील त्यासंबंधीची बातमी

Friday, 17 February 2017 0 comments

महाराष्ट्र १ वाहिनीवरील चर्चासत्रातील माझी प्रतिक्रिया



शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'वर बंदी आणण्याच्या भाजपाच्या मागणीवर महाराष्ट्र १ वाहिनीवरील चर्चासत्रातील माझी प्रतिक्रिया 


Monday, 13 February 2017 0 comments

माझा व्हॅलेंटाईन

      माझा व्हॅलेंटाईन

पत्नीच्या केसात अचानक
गजरा घालताच
तिच्या डोळ्यात फुलणारे
प्रितीचे गुलाब
तोच माझा... *Rose day*

पत्नीला अशीच आयुष्यभर
सुख-दुःखात साथ दे
अशी याचना करतो
तोच माझा... *Prapose day*

रस्त्यावर अनाथ मुलांना
चॉकलेट देऊन हसवेन
तोच माझा... *Chocolate day*

माझ्या मुली साठी कशाला हवा
बाहेरचा टेडी
एक दिवस घोडा होऊन
मीच होईन टेडी
तोच माझा... *Teddy day*

आई वडिलांना कधीच
आश्रम दाखवणार नाही
हे वचन देतो मी
तोच माझा... *Promise day*

संध्याकाळी थकुन आल्यावर
माझी चिमुकली  गोड मीठी मारते
तोच माझा... *Hug day*

सुट्टीच्या दिवशी मी
कुटुंबासोबत हसत खेळत
दिवस घालवतो 
तोच माझा..................... 
All family Valentine day.

Sunday, 12 February 2017 0 comments

हायटेक प्रचाराचा ट्रेंड 

हायटेक प्रचाराचा ट्रेंड 
(सदर लेख आजच्या (12 फेब्रुवारी 2017) च्या प्रभात वर्तमानपत्रात रूपगंध मध्ये प्रसिद्ध झाला आहे.)

निवडणुका जवळ आल्या की पूर्वी ट्र्क टेम्पो आणि वाहनांचा ताफा, हातात झेंडे घेऊन शेकडोंचा रस्त्यावर उतरलेला समुदाय आणि एकाचढ एक घोषणा यांनी सारा परिसर दणाणून जायचा. परंतु आता हा ट्रेंड बदलतोय आचारसंहितेच्या लक्ष्मणरेषेने या प्रचारपद्धतीला प्रचंड मर्यादा आणल्या आहेत. 

वेगाने बदलत्या  काळानुसार प्रचार यंत्रणेत अभिनव बदल घडून येत आहे "हायटेक प्रचार" यंत्रणेने स्वतःला सिद्ध केले आहे. 

आणि म्हणूनच सोशल मीडियाने एव्हाना  अवघ्या प्रचारयंत्रणेचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. समाज तांत्रिकदृष्ट्या स्मार्ट होत असताना राजकीय व्यूहरचनाही तितकीच आधुनिक आणि स्मार्ट होताना दिसत आहे. कारण सोशल मीडियामध्ये  सत्तापालटाची असणारी प्रचंड ताकद मागील काळात पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतच सिद्ध झाली आहे. 

तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारतात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये तरुणांचे  प्रमाण मोठे असल्याने सर्व राजकीय पक्ष व उमेदवार सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्यावर भर देत आहेत. 

 मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पक्षांनी व  इच्छुकांनी वॉट्स अॅप, फेसबुक, यू-टय़ूबचा आधार घेतला असून त्या ऑपरेट करण्यासाठी स्वतंत्र मानवी यंत्रणाही सज्ज केली आहे. 

निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाच्या प्रचारासाठी ई-कार्यकर्ता मेळावा तसेच सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळाही आगामी काळात फलदायी ठरणार आहेत.  या कार्यशाळांचे माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना पक्षावर, पक्षाच्या नेत्यांवर व मंत्र्यांवर आरोप वा टीका झाल्यानंतर लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. सोशल मीडियावर चालणारे हे सोशल वॉर युवकांना व मतदारांना  पक्षाकडे किंवा इच्छुक उमेदवाराकडे आकर्षित करणारे ठरणार यात शंका नाही. 

पक्षाचे स्वतंत्र ‘टायटल साँग’, पक्षातील ज्येष्ठ व प्रभावशाली नेत्यांच्या भाषणांच्या चित्रफिती, पक्षाने काढलेले मोर्चे, केलेली आंदोलने यांच्या क्लिप सोशल मीडियावर धुमाकूळ घालू शकतात. मोबाईल अॅप, वॉट्स अॅप, फेसबुक, यू-टय़ूब, ट्विटर या माध्यमातून प्रचाराबरोबच पक्षाची भूमिका सडेतोड मांडल्यास याचा प्रचंड फायदा उमेदवारांना होणार आहे. अपलोड केलेल्या  बातम्या, क्षणचित्रे, विरोधकांचे वस्त्रहरण इ. लाईक आणि  शेअर करून हे सोशल वॉर अधिकच रंजक आणि मतदारांना खेचणारे ठरणार आहे.

याचबरोबर एसएमएस, व्हॉईस कॉल आणि  व्हॉईसमेलच्या सातत्याने होणाऱ्या माऱ्यामुळे उमेदवाराचे नाव मतदारांच्या कानात अगदी फिट्ट बसणार आहे. 

परंपरागत प्रचाराच्या  एक पाऊल पुढे जाऊन  हायटेक प्रचाराची  जोरदार मोर्चेबांधणी केल्यास आगामी  निवडणुकांत सोशल मीडिया खऱ्या अर्थाने  प्रचाराचा आखाडा बनणार आहे.

निवडणुकांमध्ये फ्लेक्स, बॅनर, पत्रके, पोस्टर आदी प्रचार साहित्य छापण्यासाठी होणारी  चढाओढ  आणि प्रचारपत्रके मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी उभी केली जाणारी  कार्यकर्त्यांची फळी तितकीशी प्रभावी ठरणार नाही. आता बदलत्या काळानुसार कमी वेळेत अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन प्रचार लाभदायक ठरणार असल्याने सोशल मीडियाच्या हायटेक प्रचार प्रणालीला पर्याय नाही.

Monday, 6 February 2017 0 comments

भाषणकलेचे सामर्थ्य : बोलणार तोच चालणार

भाषणकलेचे सामर्थ्य : बोलणार तोच चालणार 

काल परवा  एक मित्र भेटला 
'एक युवा राजकीय नेता'राजकीय वारसा पैसा  आणि दांडगा
 जनसंपर्क असणारा.
बर्याच दिवसांनी भेटल्यामुळे आमच्या गप्पा रंगल्या. तो सांगू लागला कि नुकत्याच
झालेल्या पक्षांतर्गत नियुक्तीतून त्याला डावलण्यात आलं त्यामुळे थोडासा नाराजही दिसत होता . मी  त्याला विचारलं " भरपूर पैसापानी आहे, मोठा  मित्रपरिवार आहे मग असं कायघडलं कि तुझ्यावर  हि वेळ  आली ?"

तो सांगू लागला पक्षाने  आयोजित केलेल्या कार्यक्रमातकेवळ प्रभावी  भाषण न करता आल्याने कालपरवाच्या नवीन मुलावर जबाबदारी  सोपविण्यात आली.
मनात विचारचक्र सुरु झाले  नेतृत्व आणि कर्तुत्व असतानाही केवळ वक्तृत्व नसल्याने  अनेकदा राजकीय समीकरणे  वेगाने उलट दिशेने धावतात.  सध्याच्या युगात चर्चेचा आणि जिव्हाळ्याचा  असणारा राजकीय विजयरथ फक्त वक्तृत्वकला नसल्याने  जागीच थांबतो. 
राजकारणात ज्यांची भाषणे  प्रभावी असतात असेच लोक लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतात.
असं म्हणतात बोलणार्या  दहा हजारांत एकच वक्ताअसतो आणि हा वक्ताच खर्या अर्थाने चांगला नेता बनतो.  एखाद्या व्यक्तीला राजकारणात यशस्वी व्हायचेअसेल तर  त्याला प्रभावी भाषण करता येणे हे अपरिहार्य आहे. आणि त्यातही इतिहासाचा विचार केला  तर याभाषणकलेने अनेकांना शून्यातून यशोशिखरापर्यंत पोहोचविले आहे. यात  स्व. आचार्य अत्रे,दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख,प्रमोदजी  
महाजन, गोपीनाथरावजी मुंडे आणि महाराष्ट्राची तोफ  बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे सध्याचे पंतप्रधान  नरेंद्र मोदिजी आदी मंडळींनी भाषणकलेनेच तमाम जनमानसावर राज्य केले.

खरं  तर बोलणे हि माणसाची 
सहजप्रवृत्ती असून याच्या जोरावर वेळोवेळी मानवाने  आपले अस्तित्व आणि वर्चस्व सिध्द केले आहे. केवळ  आपल्या प्रभावी बोलण्याने समोरच्या व्यक्तीच्या मनावर  गारुड घालणे हि  उत्तम वक्तृत्वाचीच देणगी आहे.

महाराष्ट्र हे ज्याप्रमाणे कलेचे  आणि कलाकारांचे राज्यआहे त्याचप्रमाणे हे उत्तमोत्तम  वक्त्यांचे जणू माहेरघरचआहे. या महाराष्ट्राच्या मातीने अनेक सुप्रसिध् वक्ते घडविले आणि या वक्त्यांनीच आपल्या प्रभावी वक्तृत्वाने संपूर्ण देशाला आपली दाखल  घेण्यास भाग पाडले.
महाराष्ट्रात राजकीय वकृत्त्वाचे उच्च दर्जाचे  मापदंड आहेत ही आपल्या सर्वांसाठी  अभिमानाची गोष्ट आहे.
सध्याच्या तरुणांत नेतृत्वगुण  दिसून येतो परंतु जर त्याला प्रभावी वक्तृत्वाची जोड मिळाली तर राज्याच्या राजकीय आसमंतावर तेजस्वी तारे उदयास येतील.
एक चांगला 'नेता' बनण्याचा  मानस असणारे पण बरेचजण केवळ भाषणकला न जमल्यामुळे शेवटपर्यंत"कार्यकर्ता"च बनून राहतात.
भाषणाबद्दल वाटणारी  अनावश्यक भीती, नकारात्मक दृष्टीकोन आणि  आत्मविश्वासाचा अभाव या  साऱ्या  गोष्टीच चांगल्या नेतृत्वाला  सतत मागे ठेवतात.
कोणताही राजकीय वारसा  नसणारे अनेक जण केवळ आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर  आपला ठसा उमटवताना दिसतात. तर दुसरीकडे प्रचंड  इच्छाशक्ती,दांडगा जनसंपर्क  आणि शक्तिशाली  राजकीय वारसा असूनदेखील  काही जण इतरांच्या जयजयकारातचआपली कारकीर्द संपवितात,हेच या भाषणकलेचे खरे सामर्थ्य होय.
आपल्याकडे इतरांपेक्षा  कितीही मौलिक विचार असले तरी केवळ भाषणरूपाने ते  मांडता न आल्याने त्या आपल्या विचारांना व्यक्त  होण्यासाठी इतरांच्या वक्तृत्वाचा आधार घ्यावा लागतो. कारण ज्ञान असण्यापेक्षा ते  दिसणं खूप महत्वाचं असतं  आणि हेच दाखविण्याचे प्रभावी साधन  म्हणजेच भाषणकला होय.
आजपर्यंत अनेक योद्ध्यांना  जगावर आपली पकड जमवता आली ती फक्त वक्तृत्व, नेतृत्व आणि  कर्तुत्वाच्याच   जोरावर. उत्तम वक्त्याचे महत्व या जगात फार पूर्वीपासून जोपासले गेले आहे. अनेक राजांनी आपल्या कणखर वाक्तृत्वानेच आपल्या  सैन्याला चेतविले आणि यशस्वी राज्यही केले.  अलेक्झांडर चे  सैन्यही जग जिंकण्यासाठी निघाले होते ते  फक्त त्याच्या प्रभावी आणि कुशल वक्तृत्वामुळेच!
राजकारणाच्या या भाऊगर्दीत आपल्याला जर "राजा"म्हणून  जगायचे असेल तर  भाषणकलेला पर्याय नाही.हजारो इच्छुक आणि शेकडो  उमेदवारांतून आपल्याला जर लाखो लोकांच्या मनावर  अधिराज्य गाजवायचेअसेल तर प्रभावी भाषण कला आत्मसात करणे हि काळाची गरज आहे. अन्यथा  आपल्यातील वक्तृत्वाचा'अभाव' हा  प्रतिस्पर्ध्यांचा 'प्रभाव'  वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतो.
म्हणूनच ज्याप्रमाणे समाजात 'जो शिकला तोच टिकला',त्याचप्रमाणे राजकारणात 'जो बोलणार तोच चालणार' असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.
आपली प्रतिष्ठा, आपला वेळ  आणि आपला पैसा हा भाषण  न जमल्यामुळे इतरांच्या पदरात पाडण्यापेक्षा आपणच  आपल्या यशाचे शिल्पकार ठरू  शकतो ते प्रभावी भाषण कलेनेच.
मित्रांनो जमाना प्रेझेन्टेशनचा  आहे घड्याळाच्या काट्यांमागे काळ धावतोय, बदलाच्या वार्याने फक्त समाजालाच आणि  परिस्थितीलाच नाही तर राजकारणाला देखील विळखा घातला आहे. 
आणि म्हणूनच बदलत्या राजकीय  समीकरणांत आपलं नाणं ठणकावण्यासाठी 
भाषणकलेसारखी दुसरी संधी नाही.
इतरांच्या भाषणाला आपल्या  हाताचे टाळ बडविण्यापेक्षा आपल्या भाषणांसाठी टाळ्यांच्या कडकडाटाची स्वप्ने प्रत्यक्षात  आणणे केंव्हाही चांगलेच.

लेखन - सागर नवनाथ ननावरे 
              धनकवडी ,पुणे
0 comments

मुलांना कोषमुक्त जीवन जगू द्या

                         मुलांना कोषमुक्त जीवन जगू द्या

‘अवघे विश्वची माझे घर ‘असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. पण आज आपल्या मुलांपलीकडे दुसरे जगच नाही असे समजणाऱ्या पालकांकडे पहिले की वाईट वाटते. आपला परिवार म्हणजेच आपलं जग आणि घरातील माणसे म्हणजेच अवघा समाज अशी शिकवण नकळतच मुलांवर बिंबवली जात आहे.
शाळेवर छात्रशिक्षक म्हणून काम करताना एकदा सात दिवसांसाठी एका शिबिरासाठी आम्ही निघालो होतो. पहाटे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी आणि त्यांना निरोप देण्यासाठी आलेले पालक असा एक घोळका जमला होता. कोणी आई आपल्या मुलाचे वारंवार पापे घेत होती तर कोणी रडत होती, नीट राहा ,जेवण करा, काळजी घ्या… असे शब्द सतत कानावर पडत होते. काही पालक तर ‘मुलांशी फोनवर बोलू द्या’ म्हणून आयोजकांपाशी हट्ट धरत होते.
अशी ही सारी परिस्थिती पाहिल्यावर मनात विचार आले कशी घडणार ही मुले आणि कधी जगणार कोषाबाहेरचं जीवन. त्यांना बाहेरच जग अनुभवता यावं, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना शेअरिंग म्हणजे काय हे कळावं आणि अनुभवसमृद्धीत वाढ व्हावी हा या विविध शिबिरांमागचा उद्देश असतो. बाहेरच्या गर्दीत मुलाचे संस्कार हरवू नयेत म्हणून आपण त्यांना जर हाताला धरून ठेवले तर कशी कळणार त्यांना सामाजिकता आणि कधी येणार परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता.
मुलांबाबत प्रेम असणे, काळजी वाटण साहजिक आहे पण असे त्यांना आपल्या विश्वात डांबून आपण अतिरेकाने त्याचं बालपण तर हिरावून घेत नाही ना? याचा प्रत्येक पालकाने विचार करणे गरजेचे आहे. या अशा वागण्याने आजकालच्या मुलांना उन्हाळ्याची सुटी आणि मामाचे गाव अशा संकल्पनांचा विसर पडत चालला आहे. या घरकोंबडी वृत्तीमुळे मुलांच्या सूरपारंब्या, कबड्डी, खो खो, आट्यापाट्या आणि विविध शारीरिक हालचालींची जागा आज मोबइल आणि कॉम्पुटर गेम्सने घेतली आहे. पोहणे, धडपडत सायकल शिकणे, धावण्याची स्पर्धा, गच्चीवरचा पत्त्यांचा डाव आणि रात्री बिछाने पसरून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत झोपी जाणे या बालपणीच्या सुखाला आजची पिढी पारखी झाली आहे.
पैशाच्या स्पर्धेत धावताना आपण आपल्या मुलांच्या संगोपनावर किती दुर्लक्ष करतो, याची जाणीव आपल्याला व्हायला हवी,यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. मुलांच्या निकोप वाढीसाठी पालकांनी त्यांच्यावर लादलेली जीवनपद्धती आणि घातलेले सुरक्षाकवच त्यांना मारक ठरणार नाही, याची पालकांनी काळजी घ्यायला हवी.
मुलांच्या बाह्य व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध शिबिरांबरोबरच आंतरिक विकास आणि व्यक्ती घडवण्यावर भर देणारे कार्यक्रम,चित्रपट, नाट्य,आणि विविध प्रोग्रॅमसाठी पालकांनी स्वतः मुलांसोबत हजेरी लावली पाहिजे. जाणीवपूर्वक बाहेरच्या कार्यक्रमांना एकटे पाठवून बाह्य जगाचा परिचय त्यांना करायला दिला पाहिजे. यातूनच मुलांची वेगवेगळ्या विचारप्रवाहांशी ओळख होऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व परिपक्व व्हायला मदत होईल.
आज संपर्काची इतकी साधनं उपलब्ध असताना कोणतीही भीती पालकांनी बाळगू नये उलट यामुळे मुलं स्मार्ट होतात, हे लक्षात घ्यावं. स्मार्टनेस म्हणजे फक्त ब्रॅंडेड वस्तू, कपडे किंव इंग्रजी बोलणे नाही. स्मार्टनेस म्हणजे आत्मविश्वास, निर्णयक्षमता, व्यवहारिकता. मुळात मुलांना चुका करण्याची संधीच आपण दिली तरचं त्यांचे निर्णयकौशल्य वाढेल. या सर्वातून मुलं इतकी तावून सुलाखून निघतील की उद्या मोठं झाल्यावर, जगताना, व्यवसाय करताना ज्या अडचणी आणि आव्हानं समोर येतील त्याला तोंड देण्यासाठी मुलं सदैव तयार असतील .
थोडक्‍यात पालकांनी मुलांवर लक्ष जरूर ठेवावं मात्र आयुष्याच्या रणांगणात कधीतरी मोकळ सोडावं.
या संदर्भात पालकांसाठी खालील ओळी आवर्जून सुचवाव्याशा वाटतात ,
‘मुलांसाठी असू द्या मायेची उब
अन भावभावनांचा पसारा
पण उद्याच्या भविष्यासाठी
खुला राहू द्या विश्व सारा’



लेखक : सागर ननावरे 

(सदर लेख मे महिन्यातील प्रभात वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला आहे)  
0 comments

"दुबळे सारे जग "

 विक्रमी खपाच्या चपराक दीपावली महाअंक 
महाराष्ट्रभरातून आलेल्या हजारो कवितांतून दीपावली महाअंकात प्रसिद्ध झालेली व नावाजलेली माझी कविता 
"दुबळे सारे जग " 

Saturday, 4 February 2017 0 comments

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका  भाजप  उमेदवार यादी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका  भाजप  उमेदवार यादी  ...

प्रभाग क्रमांक 1 - चिखली गावठाण, मोरे वस्ती, सोनवणे वस्ती
अ - अनुसूचित जाती - कुंदन गायकवाड 
ब - ओबीसी महिला - स्वनील म्हेत्रे 
क- सर्वसाधारण महिला - अलका मोरे
ड - सर्वसाधारण - पांडूरंग साने
प्रभाग क्रमांक 2 - चिखली गावठाण, कुदळवाडी, जाधववाडी
अ -ओबीसी महिला - अश्विनी संतोष जाधव
ब - सर्वसाधारण महिला - सारीका शिवाजी
क -सर्वधारण - राहुल जाधव
ड - सर्वसाधारण - वसंत बोराटे
प्रभाग क्रमांक 3 - मोशी गावठाण, च-होली
अ- ओबीसी - नितीन काळजे
ब- ओबीसी महिला - सुवर्णा विलास भुरडे
क -सर्वसाधारण महिला - साधना सचिन तापकीर
ड - सर्व साधारण - लक्ष्मण सोपान सस्ते
प्रभाग क्रमांक 4 - दिघी, बोपखेल
अ- अनुसूचित जाती - विकास डोळस
ब - अनुसूचित जमाती - लक्ष्मण उंडे
क- ओबीसी महिला - हिराबाई घुले
ड-  सर्वसाधारण महिला - निर्मला मनोज गायकवाड
प्रभाग क्रमांक 5 - गवळीनगर, चक्रपाणी वसाहत - भोसरी
अ - ओबीसी - सागर गवळी
ब- सर्वसाधारण महिला - सुलोचना भोवरे
क-  सर्वसाधारण महिला - प्रियंका बारसे
ड- सर्वसाधारण - अमृत प-हाड, सचिन भैय्या लांडगे
प्रभाग क्रमांक 6 - धावडे वस्ती, गुळवे वस्ती, सदगुरुनगर
अ - अनुसूचीत जमाती महिला - यशोधा बोईनवाड
ब - ओबीसी महिला - सारीका संतोष लांडगे
क- सर्वसाधारण - राजेद्र लांडगे
ड- सर्वसाधारण - रवी लांडगे
प्रभाग क्रमांक 7 - सँन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, लांडेवाडी,
अ - ओबीसी - संतोष लोंढे
ब - सर्वसाधारण महिला - सोनाली गव्हाणे
क - सर्वसाधारण महिला - भिमाताई पोपटराव फुगे
ड-  सर्वासाधारण - नितीन ज्ञानेश्वर लांडगे
प्रभाग क्रमांक - 8 - इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा
अ - अनुसूचीत जाती महिला - सीमा सावळे
ब - ओबीसी महिला - नम्रता लोंढे
क -सर्वसाधारण - विलास मडिगेरी
ड- सर्वसाधारण - सारंग कामतेकर
प्रभाग क्रमांक 9 - मासूळकर कॉलनी, नेहरुनगर, खराळवाडी, गांधीनगर
अ - अनुसूचित जाती महिला - उषा सचिन शिंदे
ब -  ओबीसी - संजय मंगोडेकर
क - सर्वसाधरण महिला - मंदा ठाकरे, वीणा सोनवलकर, ममताज शेख
ड- सर्वसाधारण - राजेश पिल्ले
प्रभाग क्रमांक 10 - मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर
अ -  अनुसूचित जाती महिला - प्रिती अमित गोरखे
ब - ओबीसी - केशव घोळवे
क - सर्वसाधारण महिला - सुप्रिया महेश चांदगुडे
ड- सर्वसाधारण - तुशार हिंगे
प्रभाग क्रमांक 11 - नेवाळेवस्ती, अजंठानगर, फुले नगर
अ - अनुसूचित जाती महिला - अश्विनी बोबडे
ब - ओबीसी महिला - योगिता नागरगोजे
क -सर्वसाधारण - एकनाथ पवार
ड-सर्वसाधारण - संजय नेवाळे
प्रभाग क्रमांक 12 - तळवडेगावठाण, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, रुपीनगर
अ - ओबीसी - सुरेश म्हेत्रे
ब - ओबीसी महिला - शितल वर्णीकर
क - सर्वसाधारण महिला - अरुणा दिलीप भालेकर
ड- सर्वसाधारण - शांताराम भालेकर
प्रभाग क्रमांक 13 - निगडी गावठाण, सेक्टर 22 ओटा स्कीम, यमुनानगर, साईनाथनगर
अ - अनुसूचित जाती महिला - संगीता पवार
ब - ओबीसी - उत्तम केंदळे
क - सर्वसाधारण महिला - कमल घोलप 
ड- सर्वसाधारण - दिपक मोंढवे - पाटील
प्रभाग क्रमांक 14 - चिंचवड स्टेशन, मोहननगर, जयगणेश व्हिजन, विठ्ठलवाडी, दत्तवाडी
अ - ओबीसी - कैलास कुटे
ब - सर्वसाधारण महिला - बेबीताई टेकवडे
क - सर्वसाधारण महिला - तेजस्विनी दुर्गे
ड- सर्वसाधारण - प्रकाश जैन
प्रभाग क्रमांक 15 - आकुर्डी गावठाण, गंगानगर, केंद्रीय वसाहत, सेक्टर क्र. 24,25,26,27अ, 28
अ - ओबीसी - धनंजय काळभोर
ब - सर्वसाधारण महिला - शैलजा अविनाश मोरे
क - सर्वसाधारण महिला - शर्मिला बाबर
ड- सर्वसाधारण - अरुण थोरात
प्रभाग क्रमांक 16- वाल्हेकरवाडी, विकासनगर, किवळे, रावेत
अ - अनुसूचित जाती - बाळासाहेब ओव्हाळ
ब - ओबीसी महिला - दर्शाना राऊत
क - सर्वसाधरण महिला - संगिता भोंडवे
ड- सर्वसाधारण - बाळासाहेब तरस
प्रभाग क्रमांक 17 - दळवीनगर, प्रमलोक पार्क, वाल्हेकरवाडी गावठाण, बिजलीनगर
अ - ओबीसी - नामदेव ढाके
ब - सर्वसाधारण महिला - करुणा शेखर चिंचवडे
क - सर्वसाधारण महिला - माधुरी मुकुंद कुलकर्णी
ड- सर्वसाधारण - सचिन वा. चिंचवडे
प्रभाग क्रमांक 18 - एस.के.एफ कॉलनी, पवनानगर, केशवनगर,चिंचवड गावठाण
अ - ओबीसी - सुरेश भोईर
ब - ओबीसी महिला - माधुरी मुकुंद गुरव
क -सर्वसाधारण महिला - मयुरी संदीप कुलकर्णी
ड- सर्वसाधारण - राजू गावडे
प्रभाग क्रमांक 19 - विजयनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर, पिंपरी कॅम्प
अ - अनुसूचित जाती - नेताजी शिंदे
ब - ओबीसी महिला - जयश्री गावडे
क -सर्वसाधारण महिला - कोमल मेवानी
ड-सर्वसाधारण - शितल शिंदे
प्रभाग क्रमांक 20 -विशालथिअटर परिसर, एच.ए.कॉलनी, कासारवाडी, संत तुकारामनगर, 
अ - अनुसूचित जाती महिला - प्रियंका जितेंद्र ननावरे
ब - ओबीसी - कुणाल लांडगे
क -सर्वसाधारण महिला - सुजाता पालांडे
ड- सर्वसाधारण - यशवंत भोसले
प्रभाग क्रमांक 21 - मिलींदनगर, संजय गांधीनगर,पिंपरी गाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी
अ - अनुसूचित जाती महिला - मोनिका सुरेश निकाळजे
ब - ओबीसी - संदीप वाघेरे
क -सर्वसाधारण महिला - ज्योतीका मलकाणी
ड- सर्वसाधारण - धनराज आसवणी
प्रभाग क्रमांक 22 - काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, नढेनगर, पवनानगर
अ - ओबीसी - सुरेश नढे
ब - सर्वसाधारण महिला - ज्योती भारती
क - सर्वसाधारण महिला - विजया सुतार
ड - सर्वसाधारण - कुमार जाधव
प्रभाग क्रमांक -23 - गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, थेरगाव गावठाण, साईनाथनगर, समर्थ कॉलनी
अ - अनुसूचित जाती महिला - मनीषा पवार
ब - ओबीसी महिला - अर्चना तानाजी बारणे
क - सर्वसाधारण  - संभाजी बाळासाहेब बारणे
ड- सर्वसाधारण  - अभिषेक गोविंद बारणे
प्रभाग क्रमांक 24 - आदित्य बिर्ला हॉस्पीटल, म्हतोबानगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी
अ - अनुसूचित जाती - जयदीप माने
ब - ओबीसी महिला - रेश्मा बारणे
क - सर्वसाधारण महिला - माया संतोष बारणे
ड- सर्वसाधारण - गणेश गुजर
प्रभाग क्रमांक 25 -  माळवाडी, पुनावळे, काटेवस्ती, नवलेवस्ती, भूमकरवस्ती, वाकड, मुंजोबानगर
अ - अनुसूचित जाती महिला - ममता गायकवाड
ब - ओबीसी महिला - सीमा आल्हाट
क - सर्वसाधारण - विशाल कलाटे
ड- सर्वसाधारण - राम हनुमंत वाकडकर
प्रभाग क्रमांक 26 - पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटे वस्ती, धनराज पार्क, रक्षक सोसायटी
अ - अनुसूचित जाती महिला - ममता विनय गायकवाड
ब - ओबीसी - तुषार कामठे
क - सर्वसाधारण महिला - आरती सुरेश चोंधे
ड- स्रवसाधारण - संदीप अरुण कस्पटे
प्रभाग क्रमांक 27 - तापकीरनगर, शिवतिर्थनगर, रहाटणी गावठाण, एसएनबीपी स्कूल, आकालगंगा सोसायटी
अ - अनुसूचित जाती - बाबा त्रिभुवन
ब - ओबीसी महिला - सविता बाळकुष्ण खुळे
क - सर्वसाधारण महिला - सुनिता हेमंत तापकीर
ड- सर्वसाधारण - चंद्रकांत बारखु नखाते
प्रभाग क्रमांक 28 -  शिवार गार्डन, कापसे लॉन पिंपळे सौदागर, रोजलँन्ड
अ - ओबसी - शत्रुघ्न काटे
ब - सर्वसाधारण महिला - कुंदा संजय भिसे
क - सर्वसाधारण महिला - निर्माला संजय कुटे
ड- सर्वसाधारण - जयनाथ काटे
प्रभाग क्रमांक 29 - कल्पतरू इस्टेट, पिंपळे गुरव, गुलमोहोर कॉलनी, सुदर्शननगर
अ - अनुसूचित जाती - सागर आंघोळकर
ब - अनुसूचित जमाती महिला - उषा अंकुश मुंडे
क - ओबीसी - शशिकांत कदम
ड- सर्वसाधारण महिला - पल्लवी जगताप
प्रभाग क्रमांक 30 - केशवनगर, कासारवाडी भाग, कुंदननगर भाग, फुगेवाडी, सुंदरबाग कॉलनी
अ - अनुसूचित जाती - चंद्रकांता सोनकांबळे
ब - ओबीसी महिला - आशा शेंडगे
क - सर्वसाधारण महिला - अनुजा अविनाश काटे
ड- सर्वसाधारण - राजेंद्र काटे
प्रभाग क्रमांक 31 - राजीव गांधीनगर, विनायकनगर, विद्यानगर,गणेशनगर, ऊरो रुग्णालय
अ - अनुसूचित जाती - अंबरनाथ चंद्रकांत कांबळे 
ब - ओबीसी महिला -  माधवी राजापुरे
क - सर्वसाधारण महिला - सीमा चौगुले
ड- सर्वसाधारण - राजेंद्र जगताप
प्रभाग क्रमांक 32 - सांगवी गावठाण, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, कृष्णानगर,पीडब्ल्यूडी, एस.टी कॉलनी
अ - अनुसूचित जाती - संतोष कांबळे
ब - ओबीसी महिला - शारदा हिरेन सोनवणे
क - सर्वसाधारण महिला - उषा मनोहर ढोरे
ड- सर्वसाधारण - हर्षल ढोरे
0 comments

पुणे मनपा निवडणुक 2017 राष्ट्रवादी कॉँग्रेस उमेदवार यादी

पुणे मनपा निवडणुक 2017 राष्ट्रवादी कॉँग्रेस उमेदवार यादी

पुणे महानगरपालिका निवडणुक 2017
साठी राष्ट्रवादीने उमेदवारांची आपली यादी जाहीर केली आहे.
प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी
अ – ऐश्वर्या आशुतोष जाधव
ब – विठ्ठल रामचंद्र काथोरे
क – रेखा चंद्रकांत टिंगरे
ड – दिनेश म्हस्के
प्रभाग क्रमांक २ फुलेनगर- नागपूर चाळ
अ- सुनील गोगले
क – उज्वला नानासाहेब नलावडे
ड – सुनील टिंगरे
प्रभाग क्रमांक ३ विमाननगर सोमानाथनगर
अ – आनंद सरवदे
ब – उषा कळमकर
क – सुरेखा विश्वास खांदवे
ड- रमेश आढाव
प्रभाग क्रमांक ४ खराडी चंदननगर
अ- अॅड भैयासाहेब जाधव
ब - सुमनताई पठारे
क – संजीला पठारे
ड – महेंद्र पठारे
प्रभाग क्रमांक ५ वडगावशेरी कल्याणीनगर
अ- नारायण कांबळे
ब – शिल्पा संजय गलांडे
क – प्रकाश गलांडे
ड- नारायण गलांडे
प्रभाग क्रमांक ६ येरवडा
अ- मीना रवी परदेसी
ब – आशा किशोर विटकर
क – अक्षता शैलेश राजगुरू
ड – शिवाजी क्षीरसागर
प्रभाग क्रमांक ७ पुणे विद्यापीठ वाकडेवाडी
अ – आशा साने
ब – धनश्री चव्हाण
क – रवींद्र ओरसे
ड – निलेश निकम
प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी
अ – अर्चना कांबळे
ब – पौर्णिमा रानवडे
क – श्रीकांत पाटील
ड – अशोक मुरकुटे
प्रभाग क्रमांक ९ बाणेर बालेवाडी पाषाण
अ – विद्या बालवडकर
ब – रोहिणी चिमटे
क – प्रमोद चव्हाण
ड – बाबुराव चांदेरे
प्रभाग क्रमांक १० बावधन कोथरूड डेपो
अ – बंडू उर्फ शंकर केमसे
ब – अंजली राजेंद्र गोरडे
क – साधना विजय डाकले
ड – कुणाल वेडे पाटील
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर
अ – दीपक माधवराव मानकर
ब – अश्विनी जाधव
प्रभाग क्रमांक १२ मयूर कॉलनी डहाणूकर कॉलनी
अ – सुहासिनी तटकरे
क – रोहिदास सुतार
प्रभाग क्रमांक १३ एरंडवणा हॅपी कॉलनी
अ – संजय छबू चव्हाण
ब – अनघा अग्रवाल – नाईक
क – अश्विनी किशोर कांबळे
ड – चैतन्य उर्फ सनी मानकर
प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना
अ- प्रशांत सावंत
ब – मंगला पवार
क – हेमंत उदय महाले
ड – दीपक उर्फ बाळासाहेब बोडके
प्रभाग क्रमांक १५ सदाशिव -शनिवार पेठ
ब – रजनी तुकाराम पाचंगे
क- विद्या दीपक पोकळे
प्रभाग क्रमांक १६ कसबा सोमवार पेठ
-
-
-
-
प्रभाग क्रमांक १७ रास्ता पेठ रविवार पेठ
अ – लक्ष्मी उद्यकांत आंदेकर
ब – धनश्री विलास गायकवाड
क – वनराज सुर्यकांत आंदेकर
ड – सागर प्रवीण पवार
प्रभाग क्रमांक १८ खडकमाळ आळी महात्मा फुले
-
-
-
-
प्रभाग क्रमांक १९ लोहियानगर – कासेवाडी
अ – भारत दत्तात्रय कांबळे
ब – नसीम अन्वर शेख
क – हीना शफिक मोमीन
ड – संदीप नवघणे
प्रभाग क्रमांक २० ताडीवाला रोड – ससून रुग्णालय
अ – प्रदीप गायकवाड
प्रभाग क्रमांक २१ कोरेगाव पार्क - घोरपडी
अ -  प्रशांत म्हस्के
क – सुरेखा चंद्रकांत कवडे
ड – संकेत चंद्रकांत कवडे
प्रभाग क्रमांक २२ मुंढवा मगरपट्टा सिटी
अ- चेतन विठ्ठलराव तुपे
ब- हेमलता निलेश मगर
क- चंचला संदीप कोद्रे
ड- सुनील उर्फ बंडू गायकवाड
प्रभाग क्रमांक २३ हडपसर गावठाण सातववाडी
अ- योगेश ससाणे
ब- वैशाली सुनील बनकर
क- राजलक्ष्मी भोसले
ड- विजय मोरे
प्रभाग क्रमांक २४ रामटेकडी सय्यदनगर
ब- समीना शमसुद्दीन मुलाणी
क- आनंद आलाकुंटे
प्रभाग क्रमांक २५ वानवडी
अ- दिलीप जांभूळकर
ब- कांचन रामचंद्र जाधव
क- रत्नप्रभा सुदाम जगताप
ड- प्रशांत सुदाम जगताप
प्रभाग क्रमांक २६ महमदवाडी – कौसर बाग
अ- अस्मिता राहुल साळवे
ब- फारूक सय्यद
क- नंदा लोणकर
ड- संजय घुले
प्रभाग क्रमांक २७ कोंढवा खुर्द – मिठानगर
अ- गफूर पठाण
ब- परवीन हाजी फिरोज
क- हमीदा अनिस सुंडके
ड- रईस रसीद सुंडके
प्रभाग क्रमांक २८ सॅलिसबरी पार्क – महर्षीनगर
क- श्वेता संग्राम होनराव
प्रभाग क्रमांक २९ नवी पेठ – पर्वती
अ – रीना रवी शिंदे
ब- विनायक हनमघर
क- योगिता श्रीकांत मेमाणे
ड- शाम मानकर
प्रभाग क्रमांक ३० जनता वसाहत – दत्तवाडी
अ – अॅड वैशाली चांदणे
ब – प्रिया शिवाजी गदादे
क – अर्चना विठ्ठल हनमघर
ड – प्रेमराज शिवाजी गदादे
प्रभाग क्रमांक ३१ कर्वेनगर
अ- विनोद मोहिते
ब- लक्ष्मी दुधाने
क- रेश्मा संतोष बराटे
प्रभाग क्रमांक ३२ वारजे माळवाडी
अ- दिलीप बराटे
ब- सायली रमेश वांजळे
क- दिपाली प्रदीप धुमाळ
ड- सचिन दोडके
प्रभाग क्रमांक ३३ वडगाव धायरी – सनसिटी
अ- अक्रूर कुदळे
ब- सुनिता सोपानराव चव्हाण
क- स्वाती सचिन पोकळे
ड- विकास दांगट
प्रभाग क्रमांक ३४ वडगाव बुद्रुक – हिंगणे
अ- बाळासाहेब कापरे
ब- जयश्री बाळासाहेब जगताप
क- माधुरी संदीप कडू
ड- शैलेश चरवड
प्रभाग क्रमांक ३५ सहकार नगर- पर्वती
अ – मेघा भिसे
क- अश्विनी कदम
ड – सुभाष जगताप
प्रभाग क्रमांक ३६ मार्केटयार्ड – लोअर इंदिरानगर
क- वैशाली शिगवी
ड- सुनील बिबवे
प्रभाग क्रमांक ३७ अप्पर सुप्पर इंदिरानगर
अ- शिंदू बसवंत
ब- वर्षाराणी कुंभार
प्रभाग क्रमांक ३८ राजीव गांधी उद्यान – बालाजीनगर
अ- दत्ता धनकवडे
ब- वैशाली खुटवड
क- मनीषा गणेश मोहिते
ड- प्रकाश कदम
प्रभाग क्रमांक ३९ धनकवडी – आंबेगाव पठार
अ- किशोर धनकवडे
ब- अश्विनी सागर भागवत
क- श्रद्धा गोरख परांडे
ड- विशाल तांबे
प्रभाग क्रमांक ४० आंबेगाव दत्तनगर- कात्रज गावठाण
अ-युवराज बेलदरे
ब- अमृता अजित बाबर
क- स्मिता सुधीर कोंढरे
ड - शंकरराव बेलदरे
प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बु. येवलेवाडी
ब- प्रीती बधे
क- वैशाली शेलार
साभार
पुणे महानगरपालिका

पुणे शहर कार्यालय राष्ट्रवादी कॉँग्रेस
0 comments

पुणे मनपा निवडणुक 2017मनसे उमेदवार यादी

                                            पुणे मनपा निवडणुक 2017मनसे उमेदवार यादी

2017 च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या परंतु गेल्या काही वर्षात उतरतीला लागलेल्या मनसेने नव्या जोमाने निवडणुकीत उतरण्यासाठी उमेदवारांची यादी आज जाहीर केली
प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी
अ- छाया भैरवनाथ उकारडे
ब-
क – सविता साळुंखे
ड – गणेश संजय पाटील
प्रभाग क्रमांक २ फुलेनगर- नागपूर चाळ
अ- राहुल भरत प्रताप
ब- छाया ताटे
क- दिपाली शिर्के
ड- राजकुमार ढाकणे
प्रभाग क्रमांक ३ विमाननगर सोमानाथनगर
अ – निलेश गायकवाड
ब-
क –प्रमिला अच्युत मोळावडे
ड- मोहन शिंदे सरकार
प्रभाग क्रमांक ४ खराडी चंदननगर
अ-
ब-
क – उर्मिला प्रभाकर बनकर
ड-
प्रभाग क्रमांक ५ वडगावशेरी कल्याणीनगर
अ- रंजना महादेव सिनलकर
ब – विशाखा संदीप गायकवाड
क-
ड-
प्रभाग क्रमांक ६ येरवडा
अ – लक्ष्मण नामदेव काते
ब - अर्चना माछेरकर
क – अश्विनी देवकर
ड- गणेश गुजर
प्रभाग क्रमांक ७ पुणे विद्यापीठ वाकडेवाडी
अ- जयश्री रणदिवे
ब-
क- शंकर तुकाराम पवार
ड- संतोष रंगनाथ चव्हाण
प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी
अ-
ब-
क-
ड-
प्रभाग क्रमांक ९ बाणेर बालेवाडी पाषाण
अ – शिवांजली अशोक दळवी
ब- बेबीताई निम्हण
क- सारिका अनिकेत मुरकुटे
ड- सुहास भगवान निम्हण
प्रभाग क्रमांक १० बावधन कोथरूड डेपो
अ – किशोर नानासाहेब शिंदे
ब- जयश्री गजानन मारणे
क- पुष्पा कैलास कनोजिया
ड- कनोदिया
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर
अ-
ब – वृषाली साधू धुमाळ
क- स्नेहल गणेश शिंदे
ड- संदीप झोरी
प्रभाग क्रमांक १२ मयूर कॉलनी डहाणूकर कॉलनी
अ – माधवी किशोर शिंदे
ब- सुप्रिया संजय काळे
क- हेमंत संभूस
ड- प्रशांत पायगुडे
प्रभाग क्रमांक १३ एरंडवणा हॅपी कॉलनी
अ- अनिल बाबुराव राणे
ब- सुरेखा शरद होले
क- पद्मजा संभूस
ड- मंदार बलकवडे
प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना
अ- राजेश नायडू
ब- सोनम कुसाळकर
क- विनया नितीन दळवी
ड- चैतन्य दिक्षित
प्रभाग क्रमांक १५ सदाशिव -शनिवार पेठ
अ – गणेश सोमनाथ भोकरे
ब- रुपाली पाटील ठोंबरे
क- मनीषा कावेडिया
ड- आशिष शरद देवधर
प्रभाग क्रमांक १६ कसबा सोमवार पेठ
अ- मनीषा सतीश सरोदे
ब- राहुल कैलाश त्रिकोणे
क- संगीता राहुल त्रिकोणे
ड- प्रकाश वाबळे
प्रभाग क्रमांक १७ रास्ता पेठ रविवार पेठ
अ-
ब- मीना केदार पवार
क-
ड- आनंद आगरवाल
प्रभाग क्रमांक १८ खडकमाळ आळी महात्मा फुले
अ-
ब- ज्योती खुटवड
क- आशिष साबळे पाटील
ड- सुशीला शंकर नेटके
प्रभाग क्रमांक १९ लोहियानगर – कासेवाडी
अ- भूपेंद्र राजाभाऊ शेडगे
ब- वंदना सिद्राम जन्नू
क- लक्ष्मी कांबळे
ड- अतुल मारुती जाधव
प्रभाग क्रमांक २० ताडीवाला रोड – ससून रुग्णालय
अ-
ब- पूनम शिंदे
क- उषा बाळू पवार
ड-
प्रभाग क्रमांक २१ कोरेगाव पार्क - घोरपडी
अ- राजकुमार तिखे
ब-
क- वनिता वागसकर
ड- राजेंद्र वागसकर
प्रभाग क्रमांक २२ मुंढवा मगरपट्टा सिटी
अ- विशाल लक्ष्मण बोरावके
ब-
क- कोमल गायकवाड
ड- प्रकाश बोलभट
प्रभाग क्रमांक २३ हडपसर गावठाण सातववाडी
अ- अजिंक्य ससाणे
ब- पूनम आशिष भूमकर
क-
ड- अजय न्हावले
प्रभाग क्रमांक २४ रामटेकडी सय्यदनगर
अ-
ब-
क- दादा साधू साठे
ड-
प्रभाग क्रमांक २५ वानवडी
अ- स्वप्नील सतीश जगताप
ब-
क-
ड- अतुल अशोक वानवडीकर
प्रभाग क्रमांक २६ महमदवाडी – कौसर बाग
अ-
ब-
क-
ड-सय्यद अझरूद्दीन बशीर
प्रभाग क्रमांक २७ कोंढवा खुर्द – मिठानगर
अ- अमोल शिरस
ब- शेख शबाना हुसेन
क- सुप्रिया सतीश शिंदे
ड- साईनाथ बाबर
प्रभाग क्रमांक २८ सॅलिसबरी पार्क – महर्षीनगर
अ- सीमा तीडे
ब-
क-
ड- सय्यद सलीम नजीर
प्रभाग क्रमांक २९ नवी पेठ – पर्वती
अ- ऋतुजा शंकर शेंडगे
ब- अभिमन्यू मैड
क- उषा सुग्रीव काळे
ड- अक्षता संदीप लांडगे
प्रभाग क्रमांक ३० जनता वसाहत – दत्तवाडी
अ- राहुल तुपेरे
ब-
क-
ड- प्रभाकर पाटील
प्रभाग क्रमांक ३१ कर्वेनगर
अ- संजय नांगरे
ब- मेधा आठाले
क- सुरेखा अविनाश मकवान
ड- कैलास दांगट
प्रभाग क्रमांक ३२ वारजे माळवाडी
अ-
ब- भाग्यश्री कैलास दांगट
क-
ड- रियाज मोहिदिन शेख
प्रभाग क्रमांक ३३ वडगाव धायरी – सनसिटी
अ- विजय साळुंखे
ब- युगंधरा कुंडल चाकणकर
क-
ड- चंदन कड
प्रभाग क्रमांक ३४ वडगाव बुद्रुक – हिंगणे
अ- वीरेंद्र सैदाणे
ब- आरती निलेश देशपांडे
क- सुशीला मोरे
ड- पंडित मन्यारे
प्रभाग क्रमांक ३५ सहकार नगर- पर्वती
अ-
ब- रुपेश तुरे
क- भावना वाघमारे
ड- कुशल शिंदे
प्रभाग क्रमांक ३६ मार्केटयार्ड – लोअर इंदिरानगर
अ- सुवर्णा खरात
ब- अभिजित विजय टेंबेकर
क- अस्मिता शिंदे
ड- चंद्रकांत अमराळे
प्रभाग क्रमांक ३७ अप्पर सुप्पर इंदिरानगर
अ- कविता वाघमारे
ब- माधुरी जोशी
क- राहुल अशोकराव गवळी
ड-
प्रभाग क्रमांक ३८ राजीव गांधी उद्यान – बालाजीनगर
अ- मंगेश रासकर
ब- अर्चना त्रिंबक शिवनगे
क- शकुंतला वसंत मोरे
ड- विकास बोडसिंग
प्रभाग क्रमांक ३९ धनकवडी – आंबेगाव पठार
अ- ऋषी सुतार
ब- सविता हाडके
क- ज्योती प्रवीण कोंडे
ड-चंद्रकांत शिवाजी गोगावले
प्रभाग क्रमांक ४० आंबेगाव दत्तनगर- कात्रज गावठाण
अ- अमित बेलदरे
ब- दिपाली काकडे
क- सारिका विकास फाटे
ड- वसंत कृष्णा मोरे
प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बु. येवलेवाडी
अ- अमित जगताप
ब- सीमा दिलीप टिळेकर
क- पद्मजा नितीन शेलार
ड- विलास साहेबराव कामठे
साभार -
पुणे महानगरपालिका

मनसे मध्यवर्ती कार्यालय पुणे
0 comments

पुणे महानगरपालिका निवडणुक 2017 : शिवसेना उमेदवार यादी

पुणे महानगरपालिका निवडणुक 2017 : शिवसेना उमेदवार यादी

युती तुटल्या नंतर शिवसेनेने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी साठी 41 प्रभागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली
प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी
अ – करूणा मावळींगकर
ब – दुंदा कोलप
क -
ड – चेतन चव्हाण
प्रभाग क्रमांक २ फुलेनगर- नागपूर चाळ
अ – सुनंदा देवकर
ब – जालिंदर कांबळे
क – योगिता शिर्के
ड – सागर माळकर
प्रभाग क्रमांक ३ विमाननगर सोमानाथनगर
अ – भीमराव खरात
ब – संध्या खेडकर
क – वैशाली चांधारे
ड – प्रीतम खांदवे
प्रभाग क्रमांक ४ खराडी चंदननगर
अ – सुनील साधू थोरात
ब – सुरेश शेजवळ
क – संध्या धीरज पठारे
ड – संतोष भरणे
प्रभाग क्रमांक ५ वडगावशेरी कल्याणीनगर
अ – साधना भगत
ब – मनीषा देवकर
क – नितीन भुजबळ
ड – सचिन भगत
प्रभाग क्रमांक ६ येरवडा
अ – अविनाश साळवे
ब – श्वेता चव्हाण
क – तृप्ती शिंदे
ड – संजय भोसले
प्रभाग क्रमांक ७ पुणे विद्यापीठ वाकडेवाडी
अ – वनमाला कांबळे
ब – सुरेखा भवारी
क – विनोद ओरसे
ड – हरीश निकम
प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी
अ – हर्षा नितीन कांबळे
ब – प्राजक्ता प्रशांत गायकवाड
क – नाना वाळके
ड – अमित मुरकुटे
प्रभाग क्रमांक ९ बाणेर बालेवाडी पाषाण
अ – नीता नितीन रणपिसे
ब – रोहीण धनकवडे
क – संजय निम्हण
ड – सनी निम्हण
प्रभाग क्रमांक १० बावधन कोथरूड डेपो
अ – बबन भिलारे
ब – आशा भिकुले
क – सुशीला तिडके
ड – अविनाश दंडवते
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर
अ – अनिल घोलप
ब – जयदीप पडवळ
क – सविता मते
ड – शर्मिला शिंदे
प्रभाग क्रमांक १२ मयूर कॉलनी डहाणूकर कॉलनी
अ – शांताबाई भेलके
ब – कांचन रुपेश कुंबरे
क – शाम देशपांडे
ड – पृथ्वीराज सुतार
प्रभाग क्रमांक १३ एरंडवणा हॅपी कॉलनी
अ – अनिल माझिरे
ब – प्रांजली थरकुडे
क – आयुषी पळसकर
ड – शिरीष आपटे
प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना
अ – अरविंद कांबळे
ब – नीता मंजाळकर
क – अमिता शिरोळे
ड – राजू पवार
प्रभाग क्रमांक १५ सदाशिव -शनिवार पेठ
अ – निरंजन दाभेकर
ब -
क – प्रतिभा भिलारे
ड – मयूर कडू
प्रभाग क्रमांक १६ कसबा सोमवार पेठ
अ – ज्योतिबा शिर्के
ब – पल्लवी जावळे
क – सुदर्शना त्रिगुणाईत
ड – रवींद्र चव्हाण
प्रभाग क्रमांक १७ रास्ता पेठ रविवार पेठ
अ – सोनम झेंडे
ब – कोमल बारगुजे
क – विजय मारटकर
ड – विशाल धनवडे
प्रभाग क्रमांक १८ खडकमाळ आळी महात्मा फुले
अ – मेघा पवार
ब – सदाफ अब्दुल रौफ धोटेकर
क – बाळासाहेब मालुसरे
ड – संदीप पेटाडे
प्रभाग क्रमांक १९ लोहियानगर – कासेवाडी
अ – अमित महेश जगताप
ब – भारती अनिल दामजी
क – ज्योती आनंद कदम
ड – जावेद इस्माईल खान
प्रभाग क्रमांक २० ताडीवाला रोड – ससून रुग्णालय
अ – संतोष सोनावणे
ब -
क – कविता सोनावणे
ड – रिजवान शेख
प्रभाग क्रमांक २१ कोरेगाव पार्क - घोरपडी
अ – मनोज प्रेक्षाळे
ब – वर्ष कवडे
क – साधना घोडके
ड – दिलीप कवडे
प्रभाग क्रमांक २२ मुंढवा मगरपट्टा सिटी
अ – समीर तुपे
ब – जयश्री जगताप
क – गीतांजली आरो
ड – सुनील गायकवाड
प्रभाग क्रमांक २३ हडपसर गावठाण सातववाडी
अ – जयसिंग भानगिरे
ब – विजया कापरे
क – शीतल शिंदे
ड – विजय देशमुख
प्रभाग क्रमांक २४ रामटेकडी सय्यदनगर
अ – संतोष कसबे
ब – तानाबाई काकडे
क – शेख जान महमद
ड -
प्रभाग क्रमांक २५ वानवडी
अ – मकरंद केदारी
ब – स्वाती जगताप
क – धनश्री कांबळे
ड – प्रवीण यसदे
प्रभाग क्रमांक २६ महमदवाडी – कौसर बाग
अ – प्राची आल्हाट
ब – प्रमोद भानगिरे
क – वैष्णवी घुले
ड – तानाजी लोणकर
प्रभाग क्रमांक २७ कोंढवा खुर्द – मिठानगर
अ – अमर पवळे
ब – भरत चौधरी
क – नीता बाबर
ड -
प्रभाग क्रमांक २८ सॅलिसबरी पार्क – महर्षीनगर
अ – शीतल खुडे
ब – एकनाथ ढोले
क – अश्विनी राऊत
ड – बाळासाहेब अटल
प्रभाग क्रमांक २९ नवी पेठ – पर्वती
अ – जयश्री जाधव
ब – अशोक हरणावळ
क – प्रज्ञा काकडे
ड – सचिन पुणेकर
प्रभाग क्रमांक ३० जनता वसाहत – दत्तवाडी
अ – शिवाजी माने
ब – सुप्रिया कदम
क – सुरज लोखंडे
ड -
प्रभाग क्रमांक ३१ कर्वेनगर
अ – सचिन थोरात
ब – अंजली बराटे
क – वैशाली दिघे
ड – मयूर वांजळे
प्रभाग क्रमांक ३२ वारजे माळवाडी
अ – ज्ञानेश्वर वांजळे
ब – उज्वला घारे
क – वैशाली पोळ
ड -
प्रभाग क्रमांक ३३ वडगाव धायरी – सनसिटी
अ – अमोल दांगट
ब – राधिका गिरमे
क – अनिता दांगट
ड – महेश पोकळे
प्रभाग क्रमांक ३४ वडगाव बुद्रुक – हिंगणे
अ – संतोष गोपाळ
ब – पल्लवी पासलकर
क – पौर्णिमा निंबाळकर
ड – जयसिंग दांगट
प्रभाग क्रमांक ३५ सहकार नगर- पर्वती
अ – ज्ञानेश्वर दारवटकर
ब – पूजा देडे
क – श्रुती नाझीरकर
ड – शिवलाल भोसले
प्रभाग क्रमांक ३६ मार्केटयार्ड – लोअर इंदिरानगर
अ – प्रीती रोकडे
ब – अमोल रासकर
क – धनकौर दुधानी
ड – शशिकांत पापळ
प्रभाग क्रमांक ३७ अप्पर सुप्पर इंदिरानगर
अ – बालिका जोगदंड
ब – शारदा भोकरे
क – बाळासाहेब ओसवाल
ड -
प्रभाग क्रमांक ३८ राजीव गांधी उद्यान – बालाजीनगर
अ – बळीराम निंबाळकर
ब – दीपाजी ओसवाल
क – सरोजा कार्वेकर
ड – विनायक वाळके
प्रभाग क्रमांक ३९ धनकवडी – आंबेगाव पठार
अ – तेजश्री भोसले
ब – निकिता पवार
क – अनिल बटाणे
ड – सुनील खेडेकर
प्रभाग क्रमांक ४० आंबेगाव दत्तनगर- कात्रज गावठाण
अ – राजेंद्र धोंडे
ब – अरुण सांकुडे
क – कल्पना थोरवे
ड – धनराज कोंढरे
प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बु. येवलेवाडी
अ – रमेश गायकवाड
ब – संगीता ठोसर
क – मनीषा कामठे
ड - गंगाधर बधे
3/2/2017
साभार : पुणे महानगरपालिका
Friday, 3 February 2017 0 comments

पुणे मनपा सार्वत्रिक निवडणूक २०१७भाजप उमेदवार अंतिम यादी

                                                 पुणे मनपा सार्वत्रिक निवडणूक २०१७ भाजप

भाजपने एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची नावे
प्रभाग १ कळस-धानोरी
अ -अ. जा. महिला -किरण निलेश जठार
ब -अ. जा. -मारुती सांगडे
क -ओबीसी महिला -अलका अविनाश खाडे
ड -ओपन -अनिल टिंगरे
प्रभाग २ फुलेनगर-नागपूर चाळ
अ -अ. जा. -आरपीआय
ब -ओबीसी महिला -आरपीआय
क -ओपन महिला -शीतल अजय सावंत
ड -ओपन -सुभाष चव्हाण
प्रभाग ३ विमाननगर-सोमनाथनगर
अ -अ. जा. -राहुल भंडारे
ब -ओबीसी महिला -श्‍वेता गंगाधर खोसे -गलांडे          
क -ओपन महिला -मुक्ता अर्जुन जगताप
ड -ओपन -बापू कर्णे गुरूजी
प्रभाग ४ खराडी-चंदननगर
अ -अ. जा. -शैलजित बनसोडे
ब -ओबीसी महिला -बबडाताई पठारे
क -ओपन महिला -सोनल चव्हाण
ड -ओपन -सचिन सातपुते
प्रभाग ५ वडगाव शेरी-कल्याणीनगर
अ -ओबीसी महिला -सुनीता गलांडे
ब  -ओपन महिला -शीतल शिंदे
क -ओपन -संदीप जर्‍हाड
ड -ओपन -योगेश मुळीक
प्रभाग ६ येरवडा
अ -अ. जा. -आरपीआय
ब -ओबीसी महिला -संध्या गणेश देवकर
क -ओपन महिला -शिल्पा संतोष राजगुरू
ड -ओपन -राजेंद्र एंडल
प्रभाग ७ पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी
अ -अ. जा. महिला -आरपीआय किंवा ऍड राजश्री चव्हाण-दामले 
ब -अनु. जमाती महिला -राजश्री काळे
क -ओबीसी -आदीत्य माळवे
ड -ओपन -सतीश बहिरट किंवा रेश्मा अनिल भोसले
प्रभाग ८ औंध - बोपोडी
अ -अ. जा. महिला
ब -ओबीसी महिला -सौ अर्चना मधुकर मुसळे
क -ओपन -प्रकाश ढोरे
ड -ओपन -विजय शेवाळे
प्रभाग ९ बाणेर बालेवाडी पाषाण
अ -ओबीसी महिला -स्वप्नाली सायकर
ब -ओपन महिला -ज्योती गणेश कळमकर
क -ओपन -अमोल बालवडकर
ड -ओपन -राहुल कोकाटे
प्रभाग १० बावधन-कोथरुड डेपो
अ -ओबीसी -किरण दगडे पाटील
ब -ओपन महिला -श्रध्दा प्रभुणे-पाठक
क -ओपन महिला -अपर्णा गणेश वर्पे
ड -ओपन -दिलीप वेडे पाटील
प्रभाग ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर
अ -ओबीसी -संतोष अमराळे
ब -ओपन महिला -छाया अजय मारणे
क -ओपन महिला -मनिषा संदीप बुटाला
ड -ओपन -दिलीप उंबरकर
प्रभाग १२ मयूर कॉलनी - डहाणूकर कॉलनी
अ -ओबीसी महिला -सौ. दीनेश माथवड
ब -ओपन महिला -वासंती जाधव
क -ओपन -मुरली मोहोळ
ड -ओपन -मिहीर प्रभुदेसाई
प्रभाग १३ एरंडवणा हॅपी कॉलनी
अ -ओबीसी -दीपक पोटे
ब -ओपन महिला -माधुरी सहस्त्रबुध्दे
क -ओपन महिला -मंजुश्री खर्डेकर
ड -ओपन -जयंत भावे

प्रभाग १४ डेक्कन जिमखाना -मॉडेल कॉलनी
अ -अनु. जाती -स्वाती अशोक लोखंडे
ब -ओबीसी महिला -नीलिमा दत्तात्रय खाडे
क -ओपन महिला -ज्योत्स्ना सरदेशपांडे किंवा ज्योत्स्ना गजानन एकबोटे
ड -ओपन -सिध्दार्थ अनिल शिरोळे
प्रभाग १५ सदाशिव - शनिवार पेठ
अ -ओबीसी -हेमंत रासने
ब -ओबीसी महिला -ऍड गायत्री खडके-सुर्यवंशी
क -ओपन महिला -मुक्ता टिळक
ड -ओपन -राजेश येनपुरे
प्रभाग १६ कसबा पेठ-सोमवार पेठ
अ -अनु. जाती महिला -आरपीआय
ब -ओबीसी -योगेश समेळ
क -ओपन महिला -वैशाली विश्‍वासराव सोनावणे
ड -ओपन -गणेश बिडकर
प्रभाग १७ रास्ता पेठ-रविवार पेठ
अ -ओबीसी महिला -रोहिणी बापू नाईक
ब -ओपन महिला -सुलोचना तेजेंद्र कोंढरे
क -ओपन -अरविंद उर्फ पप्पू कोठारी
ड -ओपन -उमेश चव्हाण
प्रभाग १८ खडकमाळ आळी - महात्मा फुले
अ -अ. जा. महिला -कांचन विष्णू हरिहर
ब -ओबीसी महिला -आरती सचिन कोंढरे
क -ओपन -बाळासाहेब खेडेकर
ड -ओपन -सम‘ाट अभय थोरात
प्रभाग १९ लोहिया नगर - कासेवाडी
अ -अनु. जाती -शंतनू कांबळे
ब -ओबीसी महिला -मनिषा संदीप लडकत
क -ओपन महिला -अर्चना तुषार पाटील
ड -ओपन -रफिक शेख
प्रभाग २० ताडीवाला रोड - ससून हॉस्पिटल
अ -अनु. जाती -आरपीआय
ब -ओबीसी महिला -कल्पना बहिरट
क -ओपन महिला -शबनम यासीन शेख
ड -ओपन -जमील शरीफ शेख
प्रभाग २१ कोरेगाव पार्क - घोरपडी
अ -अनु. जाती -आरपीआय
ब -ओबीसी महिला -सौ. लता विष्णू धायरकर
क -ओपन महिला -मंगला प्रकाश मंत्री
ड -ओपन -उमेश गायकवाड
प्रभाग २२ मुंढवा - मगरपट्टा सिटी
अ -ओबीसी -संदीप दळवी
ब -ओपन महिला -सुजाता जमदाडे
क -ओपन महिला -सुकन्या गायकवाड
ड -ओपन -दिलीप आबा तुपे
प्रभाग २३ हडपसर गावठाण - सातववाडी
अ -ओबीसी -सोपान गोंधळे
ब -ओबीसी महिला -शिल्पा नितीन होले
क - ओपन महिला -उज्ज्वला सुभाष जंगले
ड -ओपन -मारुती आबा तुपे
प्रभाग २४ रामटेकडी - सय्यदनगर
अ -अनु. जाती -आरपीआय
ब - ओबीसी महिला -वर्षा मंंगेश तुपे
क -ओपन -इम्तीयाझ मोमीन
प्रभाग २५ वानवडी
अ -ओबीसी -धनराज घोगरे
ब -ओपन महिला -कालिंदी पुंडे
क -ओपन महिला -कोमल शेंडकर
ड -ओपन -दिनेश होले
प्रभाग २६ महंमदवाडी -कौसर बाग
अ -अनु. जाती महिला -पूजा सचिन ननावरे
ब -ओबीसी -जीवन जाधव
क -ओपन महिला -स्वाती कुरणे
ड -ओपन -संजय घुले
प्रभाग २७ कोंढवा खुर्द - मीठानगर
अ -ओबीसी -महेंद्र गव्हाणे
ब -ओपन महिला -संगीता पोपटराव लोणकर
क -ओपन महिला -अफसाना पानसरे
ड -ओपन -मदन शिंदे
प्रभाग २८ सॅलॅसबरी पार्क - महर्षीनगर
अ -अनु. जाती महिला -कविता भरत वैरागे
ब -ओबीसी -श्रीनाथ भिमाले
क -ओपन महिला -राजश्री अविनाश शिळीमकर
ड -ओपन -प्रविण चोरबले
प्रभाग २९ नवी पेठ -पर्वती
अ -अनु. जाती महिला -आरपीआय
ब -ओबीसी -महेश लडकत
क -ओपन महिला -स्मिता वस्ते
ड -ओपन -धीरज घाटे
प्रभाग ३० जनता वसाहत - दत्तवाडी
अ -अनु. जाती -आनंद रिठे
ब -ओबीसी महिला -
क -ओपन महिला -
ड -ओपन -शंकर पवार
प्रभाग ३१ कर्वेनगर
अ -ओबीसी -सुशील शिवराम मेंगडे
ब -ओपन महिला -वृषाली दत्तात्रय चौधरी
क -ओपन महिला -सौ. वासुदेव भोसले
ड -ओपन -राजाभाऊ बराटे
प्रभाग ३२ वारजे माळवाडी
अ -ओबीसी -किरण बारटक्के
ब -ओपन महिला -श्रध्दा काळे
क -ओपन महिला -शोभा धुमाळ
ड -ओपन -सचिन दांगट
प्रभाग ३३ वडगाव धायरी - सनसिटी
अ -ओबीसी -राजाभाऊ लायगुडे
ब -ओपन महिला -राजश्री नवले
क -ओपन महिला -निता अनंत दांगट
ड -ओपन -हरिदास चरवड
प्रभाग ३४ वडगाव बुद्रुक - हिंगणे
अ -ओबीसी -प्रसन्न जगताप
ब -ओपन महिला -ज्योती किशोर गोसावी
क -ओपन महिला -मंजुश्री नागपुरे
ड -ओपन -श्रीकांत जगताप
प्रभाग ३५ - सहकार नगर - पद्मावती
अ -अनु. जाती महिला -साईदिशा राहुल माने
ब -ओबीसी -महेश वाबळे
क -ओपन महिला -संध्या नांदे
ड -ओपन -हरीश परदेशी
प्रभाग ३६ मार्केट यार्ड - लोअर इंदिरा नगर पूर्ण प्रभाग पेंडिंग
अ -अनु. जाती महिला -अनुसुया चव्हाण
ब -ओबीसी -राजेंद्र शिळीमकर
क -ओपन महिला -मानसी देशपांडे
ड -ओपन -सुनील कांबळे
प्रभाग ३७ अप्पर सुपर इंदिरानगर
अ -अनु. जाती महिला -वर्षा भीमराव साठे
ब -ओबीसी महिला -रुपाली दिनेश धावडे
क -ओपन -गौरव गणेश घुले
प्रभाग ३८ राजीव गांधी उद्यान -बालाजीनगर
अ -ओबीसी -दिगंबर डवरी
ब -ओपन महिला -राणी रायबा भोसले
क -ओपन महिला -मनिषा राजाभाऊ कदम
ड -ओपन -विनय कदम
प्रभाग ३९ धनकवडी - आंबेगाव पठार
अ -ओबीसी -अभिषेक तापकीर
ब -ओबीसी महिला -मोहिनी देवकर
क -ओपन महिला -वर्षा तापकीर
ड -ओपन -गणेश भिंताडे
प्रभाग ४० आंबेगाव दत्तनगर -कात्रज गावठाण
अ -ओबीसी -संदीप बेलदरे
ब -ओपन महिला -सौ स्नेहल जाधव
क -ओपन महिला -सौ माधुरी अरुण राजवाडे
ड -ओपन -अभिजीत कदम
प्रभाग ४१ कोंढवा बु. - येवलेवाडी
अ -अनु. जाती -वीरसेन जगताप
ब -ओबीसी महिला -सुवर्णा विनोद मारकर
क -ओपन महिला -वृषाली सुनील कामठे
ड -ओपन -रंजना टिळेकर
Wednesday, 1 February 2017 0 comments

नोटबंदी: अर्थक्रांतीची चाहूल

नोटबंदी: अर्थक्रांतीची चाहूल

पाऊस आला मोठा
पैसा झाला खोटा

लहानपणापासून ऐकण्यात आलेली पावसावरची ही कविता २०१६ साली खरी झाली. जून जुलै मध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि नोव्हेंबर मध्ये आलेलं नोटबंदीचं अनाकलनीय वादळ या कवितेला खरा अर्थ देऊन गेलं.

काळ्या पैशांवर अंकुश मिळविता यावा या हेतूने मोदी सरकारने चलनातून ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्द केल्या आणि देशात आर्थिक महायुद्धाला प्रारंभ झाला. यात लढणारे दोन्ही प्रतिस्पर्धी म्हणजेच "आपलेच ओठ अन आपलेच दात" या म्हणीप्रमाणे आपलेच भारतीय होते. शासन नामक एका खंबीर योध्दयानें आर्थिक नियमांच्या भडिमाराने भ्रष्टाचाराच्या मुळावर आघात करण्याचा प्रयत्न केला. पण या युद्धाचे नियोजन कुठेतरी कमी पडले आणि यात बळी गेला तो देशातील सर्वसामान्य नागरिकांचा. देशभरातील बँका आणि एटीएम्स ला जणू काही पवित्र धार्मिक स्थळांचे रूप आले आणि रांगांच्या रांगा लक्ष्मीदर्शनासाठी बँका आणि एटीएम्स बाहेर लागल्या.

दिस जातील दिस येतील

रांग सरल नोट येईल

अशा भोळ्याभाबड्या आशेवर सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय असा शिक्का पडलेला प्रत्येकजण बँकेच्या बाहेर रांगेत उभा होता. उद्या यातून नक्कीच काहीतरी चांगले घडणार या आशेवर ऊन,वारा आणि थंडी झेलत प्रत्येकजण रांगेत उभा होता.

खरं पाहता मीही या नोटबंदीच्या निर्णयाचं वैयक्तिक समर्थनच करतो परंतु त्यासाठी उपयोजलेले नियोजन मात्र अतिशय खराब होते हेही मी ठामपणे मांडतो.

तसं पाहता " होईल थोडासा त्रास पण गुण हमखास"या मताने दोन महिन्यांत झालेल्या प्रतिकूल गोष्टींपेक्षा भविष्यात होणाऱ्या सुफलाम बदलाला मी पाठींबा देईल.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८० वर्षांपूर्वी त्यांच्या " रुपयाचा प्रश्न " या प्रबंधात  देशाचे चलन दर १० वर्षांनी बदलविण्यात यावे, अशी सूचना केली होती. यामुळे देशातील काळा बाजार, भ्रष्टाचार, साठेबाजांवर अंकुश येईल असे सुचीत केले आहे. परंतु देशातील सर्वात मोठी लोकशाही समजली जाणाऱ्या आपल्या देशात त्यांच्या या तत्वज्ञानांला राजकीय पुढाऱ्यांनीच तिलांजली दिली. संसदेत नोटांच्या भरलेली बॅग दाखवून अनेक धनीराम आणि भ्रष्टवाद्यांनी  संसदेचे आणि लोकशाहीचेच "वस्त्रहरण " केले. गेल्या ६० ते ६५ वर्षात ज्यांना जमले नाही ते मोदी शासनाने धडाडीने करून दाखविले याबद्दल त्यांचे कौतुकच.

           आज जनमतही या निर्णयाच्याच बाजूने आहे आणि जर तसे नसते तर आज देशभरात शाषणविरोधी दंगली झाल्या असत्या. आर्थिक आणीबाणी चालू असल्याची किंवा  तशी वेळ येण्याची शक्यता अगदी धूसरही दिसत नाही.  नोटबंदीनंतरचे गढूळ वातावरण (काही स्वार्थी घटकांनी तयार केलेले) आता खूपच निवळले आहे. आपल्यापैकी अनेकांना  काही वाईट-त्रासदायक अनुभवही नक्कीच आलेले असतील. ज्यावेळी  आपल्या आयुष्यात फार मोठा सकारात्मक बदल घडून येणार असतो त्यावेळी आपण येणाऱ्या अडचणींचा आनंदाने सामना करतोच की. मग जिथे आज आपला देशच जुनी अर्थव्यवस्था मोडून नवीन अर्थव्यवस्था आणू पाहत आहे तर मग आपण फक्त देशहिताचा विचार करून हा बदल स्वीकारणे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरे जाणे एक भारतीय म्हणून आपले कर्तव्य होते. आणि हे कर्तव्य आज बहुतांश भारतीयांनी पार पडले हेही तितकेच कौतुकास्पद आहे.

आता नोटबंदीच्या परिणामांबद्दलच बोलायचे झाले तर सध्यस्थितीत आणि भविष्यात होणाऱ्या सकारात्मक बदलांवरच लिहायला मला आवडेल.

                देशाचा एक नागरिक या नात्याने आपला देश सुरक्षित असावा अशी माझीही भावना आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या, काश्मीर अशांत होते. पण नोटबंदीमुळे दहशतवादी,दगडफेक करणारे,आतंकवादी यांचे कंबरडेच मोडले आहे. दररोज नित्यनियमाने येणाऱ्या दहशतवाद्यांच्या तांडवाच्या बातम्या आता सहसा कानावर पडत नाहीत. काश्मीरमध्ये स्थानिक युवकांना दररोज काही रोख रक्कम देऊन दगडफेक करण्याचे काम दिले जाते. आता दहशतवादी संघटनांकडे पैसाच राहिलेला नसल्याने काश्मीरमध्ये दगडफेकीचे प्रकार बऱ्याच प्रमाणात थांबले आहेत. जुन्या एक हजार आणि 500 रुपयांच्या नोटा बदलून घेणे नक्षलवादी संघटनांना मुश्किल बनले आहे. त्यामुळे त्यांचा उपद्रव कमी झाला आहे.
                     नोटबंदीच्या निर्णयाने काहीशी हललेल्या अर्थव्यवस्थेत लवकरच एक क्रांती घडून येईल व देशाची अर्थव्यवस्था निरोगी होण्यास मदत होईल. नोटबंदी ही अर्थव्यवस्थेसाठी 'शॉर्ट टर्म पेन आणि लॉन्ग टर्म गेनअसेल यात कसलीही शंका नाही. बँकेत जास्त प्रमाणात पैसा जमा होऊ लागल्याने कर्ज सहज उपलब्ध होईल,बँकांचे व्याजदरही कमी होतील आणि याने अर्थकारणाला चालना मिळेल. व्याजदर कमी झाल्याने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल तसेच यातून राहणीमानाचा दर्जाही हळूहळू उंचावत जाईल. अडगळीत लपविलेला काळा पैसा आणि सोने अर्थव्यवस्थेत आल्याने अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. घर, कार्यालयात पडून असलेले शेकडो कोटी रुपये कुणी घ्यायला तयार नसल्याने या रकमेचे आता काय करावे, असा प्रश्न काळा पैसा बाळगणार्यांना पडला होता. त्यामुळे सट्टाबाजार,हवाला,जुगार अड्डे आणि इतर अवैद्य धंद्यांची नोटबंदीने झोपच उडविली आणि हे होणं देशाच्या स्वास्थ्यासाठी अतिशय गरजेचं होतं. आज अर्थव्यवस्थेला आलेली उतरण आणि सुस्तीच उद्या अर्थव्यवस्थेची खरी तंदुरुस्ती ठरणार आहे. परंतु त्यादृष्टीने केली जाणारी कार्यवाहीसुद्धा तितकीच पारदर्शक आणि तंदुरुस्त असावी लागणार यात शंका नाही.

   लोकशाहीच्या अंमलबजावणीतील महत्वाचा घटक ठरणाऱ्या निवडणुकांत नोटबंदीचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे. नोटबंदीने विशिष्ट एका पक्षाला फायदा होणार असे जरी बोलले जात असले तरी निवडणुकांत होणारा नोटांचा अंधाधुंद वर्षाव मात्र थंडावणार आहे. निवडणुकांत पैशाच्या जोरावर मते खरेदी करून सत्तेत आल्यावर  गरीबांचे शोषण करणा-या तसेच करचोरी करून गडगंज संपत्ती जमवणा-यांना चांगलाच चाप बसणार आहे. निवडणुकांत नोटबंदी ही स्वार्थी  आणि सत्तालोलुप राजकारयांना एक तरी घरी बसवणार किंवा लोकशाहीच्या मार्गाने चालण्याचा धडा मिळवून देणार. एखाद्या भ्रष्ट व्यक्तीला कुठल्याही प्रकारची सत्ता मिळते आणि सत्ताधारी असल्याचा फायदा घेऊन ती व्यक्ती भ्रष्टाचार करते. किंवा एखाद्या प्रामाणिक व्यक्तीहाती सत्ता येते, जी टिकवण्यासाठी तिला आता आजूबाजूच्या भ्रष्टाचाराकडे किंवा गुन्ह्याकडे कानाडोळा करता येणार नाही.निवडणूकात होणारी लाखो रुपयांची खैरात जरी नवीन नोटा चलनात आल्यावर होणार असली तरी त्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा निश्चितच कमी झालेले असेल. निवडणुकीसाठी सजलेला राजकीय पट ‘नोटबंदी’ने विस्कळीत झालेला असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सर्व पक्षांसाठीच अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

विकसित देशांची अर्थव्यवस्था ही डिजिटल प्रणालीयुक्त म्हणजेच कॅशलेस असलेली आपणास पाहावयास मिळते. कॅशलेस व्यवहार देशभर झाले पाहिजेत आणि संपूर्ण देश रोकडाविरहित व्यवहारांमध्ये विलीन झाला पाहिजे हा नोटबंदीमागचा हेतूही आपल्यासाठी फायद्याचाच ठरणार आहे. आर्थिक व्यवहारांबाबत प्रगत राष्ट्रापेक्षा स्वतःला वर्षे मागे पाहणाऱ्या आपल्या देशात नोटबंदीनंतर  डिजिटल माध्यमांद्वारे पैशांची देवाण घेवाण करता येऊ लागली आहे. कार्डांच्या माध्यमातून प्लास्टिकमनीची हाताळणी सोपी झाली आहे. आता मोबाइल बँकिंग सुरू झालं आहे लोक डिजिटली सज्ञान होत आहेत. डिजिटल मनीने पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करता येत आहेत. आता रोख रक्कम खिशात ठेवण्याची गरज पडत नाही.साध्या पानाच्या टपरीपासून ते मॉलमध्ये,दुकानात, पेट्रोल भरताना, अगदी किराणा दुकानातही आता कार्ड पेमेंट वा पेटीएमसारखी मोबाइल पेमेंटची सोय सुरू झाली आहे. शहरांप्रमाणेच ग्रामीण वर्गही आता "हम किसीसे कम नही" म्हणत कॅशलेसकडं अधिक वळू लागला आहे. आणि यातून काळ्या पैशाचा नायनाट होईल अशी प्रामाणिक भावना प्रत्येकाच्या मनात येत आहे हे नक्कीच सुखावह आहे.

नोटबंदीमुळे रोख रक्कम आणि सोन्याची खरेदी करून ती लपवून ठेवण्याची मानसिकता आता बदलत आहे. आपल्याकडील पैसा हा नदीप्रमाणे प्रवाहीत राहीला पाहिजे, आपला पैसा आपल्याकडे कमी आणि बॅंकेत जास्त असला पाहिजे हे उद्दिष्ट साध्य होणार आहे. परिणामी छुपे व्यवहार आणि बेकायदेशीर व्यवहार कमी होऊन देशातील गरिबी,बेरोजगारीवर मात करण्यासह, उद्योग,व्यापाराला चालना मिळू शकणार आहे.

करचुकवेगिरी करणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या थकबाकीदारांनी आपल्याकडील पाचशे-हजाराच्या नोटा वर्षअखेरीस कागदाचे तुकडे ठरणार म्हटल्यावर तातडिने कर भरण्यास सुरुवात केली.  राज्यातील सर्व महापालिकांच्या तिजोरीत मिळून एक हजार ४०० कोटी ७७ लाखांचा करभरणा झाला हे नोटबंदीचे तत्कालीन सर्वांत मोठे यश मानावे लागेल. 

एकीकडे पैसे नाहीत म्हणून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुसरीकडे पैशाची होणारी उधळपट्टी यातील प्रचंड मोठी दारी यानिमित्ताने भरून येण्यास नक्कीच मदत होणार आहे. पूर्वी निवडणुका,सणसमारंभ तसेच लग्नकार्यात प्रतिष्टेच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी होत होती. मात्र  नोटा उधळणे हे येथील श्रीमंतीचे,प्रतिष्ठेचे लक्षण मानण्याची लोकांची मानसिकता नोटबंदीनंतर बदलत गेली हेही याचे यशच म्हणावे लागेल.

नोटाबंदीचे फायदे-तोटे भविष्य काळात कळतील तेव्हा कळतील, पण सद्यपरिस्थितीत आपल्या देशात सर्वांनाच आर्थिक शिस्त कशी गरजेची आहे याची जाणीव झाली हे महत्वाचे.

नोटाबंदीच्या निमित्ताने पैशाची चणचण काय असते, याची जाणीव सर्वांना झाली. त्यामुळे भविष्यातील तरतूद म्हणून पैसा दडवून ठेवण्यापेक्षा वस्तू विनियोगासाठी त्याचा वापर करण्याची आवश्यकता लोकांपर्यंत एव्हाना पोहोचली आहे. आता चलन बदलले आहे परंतु आता गरज आहे ती लोकांनी चलन वापराची मानसिकता बदलायची आणि ही झाल्यास नोटाबंदीच्या चांगल्या परिणामांमध्ये अजून नक्कीच भर पडेल.

कोणत्याही पक्षाचा पाठीराखा किंवा मोदीभक्त म्हणून नाही तर देशाच्या हितासाठी एक सजग नागरिक आणि देशभक्त म्हणून नोटबंदीचे समर्थ करण्यास मला सार्थ अभिमान वाटेल.

 

ठण ठण कि सुनो झंकार

ये दुनिया है काला बाजार

कि पैसा बोलता है ........

हे फार पूर्वीपासून कानावर पडणारे गीतच देशातील काळ्या व्यवहारांवर यथोचित भाष्य करीत होते परंतु आता हे गीत गुणगुण्याची इच्छा नक्कीच होणार नाही. कारण नोटबंदीनंतर आता हे गीत कालबाह्य ठरणार असून ओठावर भविष्यात या ओळी सातत्याने येऊ लागल्या तर विशेष नको वाटायला...

जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा
वो भारत देश है मेरा
जहाँ सत्यअहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा.

लेखक :
सागर नवनाथ ननावरे
 

 

 

 

 

 

 

 

 

                                                                                                     

 
;