Saturday, 28 May 2016 0 comments

.सकारात्मक दृष्टीकोन

  
                                                    सकारात्मक दृष्टीकोन


एक गावात दोन साधु राहत होते. सकाळी उठून मंदिरात पूजा अर्चा करायचे आणि मग दिवसभर भिक्षा मागायचे आणि रात्रि मंदिरा शेजारीच झोपडीत रहायचे. एक दिवस गावात जोराचे वादळ आले आणि त्यानंतर लगेचच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा जोर इतका होता कि त्यात अनेक झाडे,प्राणी आणि अक्षरश मोठमोठे दगडही वाहून गेले. सायंकाळी दोघे साधू आपल्या झोपडीजवळ आले असता पाहतात तर काय त्यांची अर्धी झोपडी तुटलेली होती. केवळ वरचे छत मात्र तसेच शिल्लक होते. तुटलेली झोपडी पाहताच पहिला साधू कमालीचा क्रोधीत झाला आणि मंदिरातील देवाकडे पाहून बडबडू लागला,' अरे परमेश्वरा मी नेहमी मनोभावे तुझी पूजा अर्चा करूनही तू नेहमीच माझ्याशी अन्याय करतोस?

दिवसभर मुखात तुझे नाव घेऊनही तू माझी झोपडी तोडलीस आणि कधीही तुझ्या दाराशी न येणाऱ्या पापी मनाच्या माणसांच्या घराला धक्का देखील लागला नाही. तू क्रूर आहेस आम्ही तुझी भक्ती करतो पण तू आमच्यावर दया कधीच करत नाहीस.

तितक्यात दुसरा साधू आला झोपडीकडे पाहून आनंदाने नाचू लागला आणि उदगारला ,"हे परमेश्वरा मला आज चांगलीच खात्री पटली कि तू आमच्यावर किती प्रेम करतोस ते! कारण तू आमची अर्धी झोपडी वाचावलीस अशा भर पावसात तर झोपड्या पूर्ण उध्वस्त होऊन जातात पण तुझी खरंच कृपा आहे कि आज आमच्या डोक्यावर निदान छत तरी आहे. आता मी उद्यापासून आणखी जोमाने तुझ्या भक्तीत स्वतः ला वाहून घेणार, खूप खूप धन्यवाद परमेश्वरा! दुसरा साधू या उद्गारांनी निरुत्तरित झाला आणि फक्त अवाक होऊन आपल्या साधू मित्राला न्याहाळत राहिला.

मित्रांनो एक घटना आणि एकसारखेच दोन लोक परंतु दृष्टीकोन हे त्यांच्यातील वेगळेपण ठरतं. एकाने त्या घटनेच्या दुखात स्वतःला इतके खोलवर नेलं कि त्याने इतरांना दोष द्यायला सुरुवात केली, परंतु दुसर्याने त्या घटनेकडे चांगल्या नजरेने पाहिले आणि त्या घटनेबद्दल इतरांचे आभारही व्यक्त केले.

या दोघांत दुसरा साधू इथे सर्वश्रेष्ठ व सर्वांत आनंदी ठरला तो फक्त आणि फक्त त्याच्यात असणार्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे.  आपला दृष्टीकोन आपल्या भविष्याची जडणघडण ठरवत असतो म्हणूनच आपले भविष्य त्याचवेळी बदलेल जेभा आपला आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. जर आपला दृष्टीकोन पहिल्या साधू सारखा संकुचित राहिला तर आपल्याला प्रत्येक  संकट आकाशाएवढे  दिसेल मात्र जर आपण आपला दृष्टीकोन दुसर्या साधूसारखा सकारात्मक ठेवला तर मात्र आपल्याला प्रत्येक संकटात संधी दिसेल.

सकारात्मक विचार करण्याच्या सवयीत आपलं आयुष्य बदलून टाकायचं सामर्थ्य असतं. बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना येणाऱ्या बसला ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशीर झाला तर तिला नक्‍की अपघात झालेला असणार किंवा ती कुठेतरी बंद पडली असणार असे नकारात्मक विचार माणसाला आयुष्यात कधीच सुखी ठेवत नाहीत.

'दी सिक्रेट' ची लेखिका रॉन्डा बर्न सकारात्मकते विषयी सांगते कि, "आशावादी माणसे आजारी पडल्यावरही रुटीन जीवनाशी जोडलेली असतात. आपल्याला कुठला तरी आजार आहे आणि त्याचाच रात्रंदिवस यावरच विचार करता आहात , तुमच्या भेटीला येणार्‍या लोकांशीही याच विषयांवर बोलता आहात तर मग खात्रीने समजा की, तुम्ही या आजाराच्या अधिक कोषिका निर्माण करता आहात. दिवसभर स्वतःलाच शंभरदा म्हणा, मी सुखी, समाधानी आहे. फिट आहे. मला मस्त वाटते आहे. असे म्हणून स्वतःला ऊर्जा द्या. आणि सामान्य जीवनाशी एकरुप व्हा."

असं म्हणतात नजर ' बदलो, नजारा बदलेगा' एखाद्या प्रसंगाकडे,व्यक्तीकडे किंवा परिस्थितीकडे पाहताना आपली नजर. आपले विचार म्हणजेच आपला दृष्टीकोन जर सकारात्मक असेल तर काहीतरी सकारात्मक बदलच आपल्या दृष्टीस येतो.

याउलट बसच्या जागी आपले कोणी असेल तर....? बर्याचदा आपल्यांची काळजी असते म्हणून मनात असे विचार येणे स्वाभाविक आहे परंतु हाच दृष्टीकोन जे बदलतात ते आयुष्यात नेहमीच सुखी राहतात.

आपल्या आजूबाजूला घडणार्‍या प्रतिकूल घटनांवर, समस्यांवर आपले नियंत्रण असतेच असे नाही. परंतु नेहमी आपले विचार सकारात्मक ठेवल्याने मात्र चांगले अनुभव वाट्याला येतात. आपल्या आयुष्यातील नव्वद टक्के समस्या आपल्या नकारात्मक विचारसरणीमुळे उत्पन्न होतात. फक्त दहा टक्के समस्या खरोखर समस्या असतात. वाईट अनुभव तत्काळ नष्ट होतीलच असे नाही मात्र  वाईट घटनांना अनुभवाच्या नजरेतून पाहिल्यास बरंच काही शिकायला मिळतं आणि त्यातूनच  वाईट भावनांची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

आपण नकारात्मक विचार मनात कधीच आणू नयेत कारण अनेकदा त्यांच्यावर आपण नियंत्रणच ठेवू शकत नाही आणि भरकटत जातो. त्यापेक्षा आपली उर्जा सकारात्मक गोष्टींचा विचार करण्यात वापरल्यास मात्र आपल्याला प्रफुल्लीत वाटते.

नकारात्मक विचार किती करायचे हे शेवटी आपल्यावरच अवलंबून असतं म्हणूनच शक्यतो टाळायच असतं.स्वत :ला किती सिरिअसली घ्यायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं

0 comments

प्रभात वर्तमानपत्रातील लेखमाला भाग ३ सकारात्मक दृष्टीकोन रविवार २९ मे २०१६


0 comments

प्रभात वर्तमानपत्रातील लेखमाला भाग २ स्वतः तील सामर्थ्य रविवार २२ मे २०१६


0 comments

प्रभात वर्तमानपत्रातील लेखमाला भाग १............... वेळेचे नियोजन रविवार १५ मे २०१६


Tuesday, 24 May 2016 0 comments

शिवरायांची जलनीती : दुष्काळात शिवनिती वापरावी

                                                          दुष्काळात शिवनिती वापरावी
 महाराष्ट्रात दुष्काळ निवारणासाठी आजवर  अनेक तज्ज्ञांच्या समित्यांकडून सुचवलेल्या अभ्यासपूर्ण उपायांची अंमलबजावणी न झाल्याने आजही अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपडून निघाला आहे. आज दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या जलनीतीची व जलव्यवस्थापनाची  गरज आहे. त्या काळात विजेच्या पंपाचा व अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा शोध लागलेला नसतानाही आणीबाणीच्या काळात जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही यासाठी महाराजांनी जागोजागी  तळी,तलाव व बंधारे  बांधून घेतले. महाराजांनी  वर्षभर पाणी मिळण्यासाठी  गडांवर तलाव, बारव, विहिरी, कुंड, हौद बांधून केलेले उत्तम व्यवस्थापन हे तत्कालीन समृध्द महाराष्ट्राचा पुरावा आहे.
राजकीय पक्षांनी  केवळ  राजकारणासाठी  शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यापेक्षा शिवनीती अवलंबविल्यास  त्याचा महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा राखण्यात नक्कीच फायदा होईल. दुष्काळात फक्त निसर्गाला आणि मानवाला दोष देण्यापेक्षा राजकीय अकार्यक्षमता आणि कायमस्वरूपी उपयोजानंबाबत उदासीनता याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.  
दुष्काळाला राजकारणाचा विषय बनविण्यापेक्षा शिवनीतीने पावसाचं पाणी अडवून, साठवून, त्याला झिरपायला लावून  पावसाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करणाऱ्या यंत्रणा शासनाने विकसित केल्यास टॅंकरमुक्त महाराष्ट्र नक्कीच पहावयास मिळेल.

सागर नवनाथ ननावरे
धनकवडी, पुणे ४३                               
Sunday, 22 May 2016 0 comments

आपल्यातील सुप्तसामर्थ्य 

आयुष्यात आपण जे जे काही मनापासून करतो त्या त्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. परंतु बर्याच वेळा केवळ हे आपल्याला जमणार नाही किंवा हे अशक्य आहे म्हणून आपण आपला मार्गच बदलतो याचं कारण एकच आपल्या आपल्यात  असणार्या अगाध सामर्थ्याबाबत  आपणास असणारे अज्ञान.

प्रत्येकाला आपली यशोगाथा लिहायची असते मात्र त्यासाठी लागणारा आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि सातत्य याच्या अभावाने आपण यात अपयशी ठरतो आणि इतरांच्या यशोगाथा ऐकण्यात आपले सारे आयुष्य खर्ची करतो.

संत तुकाराम म्हणतात, ‘अशक्य ते शक्य करता सायास..’ कारण जगात अशक्य असं खरंच काही नसतं. परंतु आपण हे फक्त अभंगापुरतेच मर्यादित ठेवतो आणि प्रत्यक्षात मात्र अनामिक भीतीने यशाच्या शिखराला अर्ध्यावरच सोडून पळ काढतो.

आपल्यातील अगाध सामर्थ्य आपणच नओळखल्यास त्याचे दुष्परिणाम कसेहोतात याबाबतची वाचनात आलेलीएक सुंदर गोष्ट  आपल्याशी शेअरकरायला नक्कीच आवडेल.

एकदा एक वाघाचे पिल्लू जंगलातूनआपली  वाट चुकले. जवळूनच  एकमेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन चाललाहोता. योगायोगाने ते मेंढ्याच्या कळपातआले. त्याला स्वतःबद्दल काही माहितीनव्हते. ते स्वतःला मेंढी समजू लागले.एका मेंढीला आई समजू लागले. तेमेंढराबरोबर खेळायचे, गवत खायचे.त्याने कधीही डरकाळी दिली नाही.हळूहळू हे पिल्लू  मोठे झाले. एकावाघाने ते पहिले. व त्याने त्या पिल्लालापकडून  जवळ बोलावले. पिल्लू  प्रथमघाबरले. वाघाने त्याला सांगितले, ‘अरेतू वाघ आहेस, मेंढरात का राहतोस?’.पिलाला ते अजिबात पटेना. ते घाबरूनदूर पळू लागले. वाघाने त्याला पकडलेव नदीवर नेले. पाण्यात त्याला प्रतिबिंबदाखवले. पिलाला आता ते वाघ असल्याचे पटले. त्याला आनंद झाला.त्याने मोठ्याने डरकाळी दिली. आणित्यादिवसापासून ते पिल्लू न म्हणवतावाघाचा "बछडा" म्हणून सन्मानाने जगूलागले. जंगलाचा राजा हा शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे जगत होता. याचं कारण त्याला त्याच्यातल्या क्षमतांची ओळख नव्हती.

अनेक लोकाचे जीवन हे या वाघाच्या पिल्लाप्रमाणे असते. जोपर्यंत  स्वतःचेसामर्थ्य त्यांना माहिती नसते तोपर्यंतजग त्यांना पिल्लू म्हणून हिणवतातआणि ते इतरांच्या ताटाखालचे मांजरम्हणून जगतात.  त्यामुळे ते आपलंसंपूर्ण आयुष्य स्वतःच्याच  अस्तित्वाच्याशोधात घालवतात. जोपर्यंतआपल्यातील वाघ जागा होणार नाहीतोपर्यंत आपल्या यशाची डरकाळीघुमणार नाही आणि लोक आपलीदखलही घेणार नाही. जोपर्यंतआपल्यातील वाघ जागा होणार नाहीतोपर्यंत आपल्या यशाची डरकाळीघुमणार नाही आणि लोक आपलीदखलही घेणार नाही. म्हणूनचवाघासारखे जगण्यासाठी आणि मोठ्ठयश मिळवण्यासाठी आपल्याप्रत्येकातील सुप्तगुणांना वाव दिलापाहिजे आणि आपल्यातील सामर्थ्याचीजाणीव स्वतःला आणि जगाला करूनदिली पाहिजे.

आज आपण आपण शून्यातून विश्वनिर्माण करणाऱ्या धीरुभाई अंबानी,रजनीकांत,सचिन तेंडूलकर,बिल गेट्स,मेरी कोम आणि अनेकांची नवे आदरानेघेतो, त्यांच्या योशोगाथांचे गोडवे गातो.पण हे सारे आपल्यापेक्षा वेगळे होतेका? तर नक्कीच नाही आपल्यात आणियांच्यात फरक फक्त एवढाच कि हेआपल्यातील  एकमेवाद्वितीय क्षमताआणि सामर्थ्य जाणून होते आणि याचसामर्थ्याच्या आणि आत्मविश्वासाच्याबळावर त्यांनी जग जिंकले.

म्हणूनच नशिबावर,दैवावर आणिफुटकळ समजुतींवर अवलंबूनराहणार्यांना आयुष्यात कधीच भव्यदिव्ययश प्राप्त करता आले नाही हेअबाधित सत्य आहे.

आपण सर्वांनी आपल्यातील सुप्तसामर्थ्य जाणण्याची गरज आहे तसेकेल्यानेच शिवाजी महाराज बालवयातबलाढ्य शत्रूचे आव्हान पेलू शकलेआणि स्वराज्याचे स्वप्न साकार करूशकले.

अब्दुल कलामांनी स्वतःतीलसामर्थ्याबद्दल अतिशय सुरेख शब्दांतसांगितले आहे कि,

"जीवनात कठीण प्रसंग आपल्यालाउद्धवस्त करण्यास येत नाहीत, तर तेआपल्यातील लपलेले सामर्थ्य आणिशक्तींना बाहेर काढण्यासाठी असतात.आपल्या जीवनातील कठीणपरिस्थितींना आपल्यातील सामर्थ्यानेअसे तोंड द्या की त्यांनाही कळेल,तु्म्ही त्यांच्यापेक्षा कठीण आहात".

आपल्यातील झोपलेल्याआत्मविश्वासाला जागे करण्यासाठीआणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःचे सामर्थ्य ओळखावेच लागेल.

स्वतः च्या सामर्थ्यावर सुचलेल्या खालील ओळी आपल्याला बरंच काही शिकवून जातात,

‘सामर्थ्यवान शोधायला निघालो

पण नाही मिळाले काही

स्वतात शोधून पहिले तर

कोणी  स्वतःपेक्षा मोठा नाही  ‘

जेव्हा आपल्याला आपल्यातील अगाधसामर्थ्याची जाणीव होईल   तेव्हापासूनसमझा की आपल्यातूनसुद्धा काहीमहापुरुष, काहीजण उद्योगपती,काहीजण नेते तसेच  कुठल्या नाकुठल्या क्षेत्रात नक्कीच  यशस्वीठरतील. आपण आपल्या मन,बुद्धीआणि समजाच्या पलीकडे जाऊनज्यावेळेस विचार करू तेव्हाच खर्याअर्थाने या अस्तित्वासाठी झटणाऱ्या यारोजच्या गर्दीत  आपण सामर्थ्यवान वयशस्वी म्हणून गणले जाउ.

चला तर मग आपण एक असे कस्तुरीमृग होऊया जे हजारात एक असेलआणि आपल्या यशाच्या सुगंधाने संपूर्णजगाला आपल्याकडे आकर्षित करूनघेईल.


Thanks & Regards:

Saturday, 14 May 2016 0 comments

वेळेचे नियोजन


वेळेचे नियोजन

वेळ मानवाच्या जीवनाला गती देणारा एकअविभाज्य घटक,वेळ प्रत्येकाच्या आयुष्यातीलसर्वाधिक महत्वाची गोष्ट . आजच्यास्पर्धेच्या युगात तर याला विशेष महत्त्व आहे.वेळ हि एक अशी गोष्ट आहे  जी पैशानेखरेदी करता येत नाही आणि ती गेली कीकाही केल्या पुन्हा आणता येत नाही. वेळेमुळेअनेक गोष्टी घडतातही आणि बिघडतातही.टाईम इज मनी, काळ आला होता पण वेळआली नव्हती, अशा अनेक म्हणी विशेषप्रसिद्धही आहेत. हीच ती वेळ असे म्हणूनएखाद्या कामाचा प्रारंभही केला जातो, किंवागेली ती वेळ म्हणून पश्‍चात्तापही केला जातो.कधी कधी वेळ मारून नेली जाते, तरएखाद्यावर एखादी वेळ येऊही शकते.

वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतोकारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्हीपुन्हा स्पर्श करू शकत नाही.कारण नदीच्याप्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येतनाही.

असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळपुन्हा परत येत नाही. कारण वेळ हीकोणासाठी थांबत नसते. एकदा निघून गेलेलीवेळ पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणूनआपण आपल्या वेळेचा पुरेपूर वापर करूनआपली प्रगती वेगाने करायला हवी. आजकालजमाना बदलतोय काळ घड्याळाच्याकाट्यामागे   धावतोय आणि या धावत्याजीवनशैलीत ज्याने वेळेवर विजय मिळवलातोच आयुष्यात यशस्वी झाला असे म्हणावेलागेल. एका कवीने वेळेबाबत अतिशयसमर्पक शब्दांत वर्णन केले आहे,

'फिरत्याला गती द्या,

काळ मागे चालला,

थांबला तो संपला'.

याचाच अर्थ असा कि

याचाच अर्थ असा कि आयुष्यात प्रत्येक गोष्टकरताना वेळेचा प्राधान्याने विचार करायलाचहवा, आपल्यासाठी आपले सगेसोयरेथांबतील, मित्र थांबतील परंतु गेलेली वेळपुन्हा कधीच येत नाही अगदीकृष्ण्चरीत्रातल्या आकाशवाणी सारखी.आयुष्याच्या व्यवस्थापनात वेळेच्यानियोजनाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.

वेळेच्या नियोजनाबद्दल मी ऐकलेली एक सुंदरग्रीक कथा आपल्याशी नक्कीच शेअर करायलाआवडेल, 

एकदा एक शिष्य आपल्या गुरूंकडे गेला आणिगुरूंना आपले गार्हाणे सांगू लागला कि,”मीकामात आणि सर्व गोष्टींत स्वतःला इतकाव्यस्त ठेवतो तरी मला अनेक गोष्टीकरण्यासाठी वेळ पुरत नाही आणि त्यामुळेबर्याच गोष्टींना मुकावे लागते, तर मग मलासांगा मी काय करू?     गुरुंनी त्याच्याकडेपहिले आणि स्मितहास्य केले.

आणि एक मोठा जार त्याच्या हातात दिलाआणि त्याला त्यात मुठीएवढे ओबडधोबड दगड भरायला सांगितले शिष्याने त्यात दगडभरले.

गुरूने विचारले "आता तो जार भरला "?

शिष्य म्हणाला," हो भरला!

गुरूंनी त्याला मुठभर माती दिली आणि तीत्यात टाकून ते हलवायला सांगितले

गुरूने पुन्हा विचारले  "आता तरी  तो जारभरला का  "?

शिष्य म्हणाला," हो भरला, अगदी काठोकाठ!

गुरूंनी त्याला ग्लास भरून पाणी दिले आणिते त्यात ओतण्यास सांगितले. शिष्याने पाणीत्या जर मध्ये ओतले,

गुरूने पुन्हा विचारले  "आता तो जार भरलाका  "?

शिष्य म्हणाला," हो भरला,अगदी घट्ट,ज्यातून आता तो जार उलटा केला तरीत्यातून काहीही सांडणार नाही  !

गुरूंनी आपल्या शिष्याला सांगण्यास सुरुवातकेली

आपलं जीवन हे त्या जार सारखे असते ज्यातआपण ते  दगड, माती  आणि त्यापाण्यासारख्या वेगवेगळ्या रंगांनी ते जीवनफुलवण्याचे,रंगविण्याचे काम करीत असतो.परंतु हे रंग भरताना आपण कोणत्यावेळी,कोणत्या क्रमाने, किती आणि कोणते रंगभरायचे हे आपणास माहित नसते. त्यामुळेचआपण नेहमी आपल्या मनाचा ग्रह करून  याना त्या गोष्टींविषयी तक्रार करीत असतो.तुझंही अगदी तसाच झालंय तुझ्याआयुष्याच्या जार मध्ये कोणत्या गोष्टींनाकिती वेळ द्यायचा हे तुला कळत नाही.परिणामी बराचसा वेळ तुझ्याकडे असूनहीकेवळ वेळेचे नियोजन नसल्याने तू वेळेबाबततक्रार करत बसला आहेस.

शिष्याला आपली चूक लक्षात आली आयुष्यजगताना काम,कुटुंब,नाती,पैसा,छंद आणिइतर अनेक गोष्टींना पुरेसा वेळ देऊन आपणमनमुराद आनंद घेऊ शकतो याचा चांगलाचधडा त्याला मिळाला.

आयुष्यातल्या प्रत्येक कामासाठी वेळेचेनियोजन करणे गरजेचे असते.

मित्रांनो आपल्यालाही या सुंदर आयुष्यातअनेक गोष्टी करायच्या असतात परंतु वेळेच्याअभावाचे कारण पुढे ढकलून आयुष्यातीलविविध अविस्मरणीय पैलूंना आपण मुकत असतो. चल तर मग आपल्या आयुष्यालावेळेच्या नियोजनाची किनार देऊन एकदाचमिळालेल्या बहुमोल आयुष्याच्या प्रत्येकक्षणाचा आनंद घेऊया

 
;