माझ्या भावनांना,कल्पनांना आणि कर्तुत्वाला अर्थ देणाऱ्या माझ्या मायमराठीला आज मराठी राजभाषा दिनानिमित्त स्वतःच्या शब्दात गौरवांजली...
अभिमान मराठीचा
मराठी मातीत वाढलो आम्ही
स्वराज्याच्या रणात लढलो आम्ही
शिवबांचा दिमाख कधी पडणार नाय
मराठीचा अभिमान आम्ही सोडणार नाय
शूरांची भूमी अन वीरांचे कर्म
जगाला सांगू मायमराठीचे मर्म
कुसुमाग्रजांचा 'कणा' कधी मोडणार नाय
मराठीचा अभिमान आम्ही सोडणार नाय
आंबेडकरांची बुद्धी अन फुलेंचे कष्ट
अन्याय आणि दैन्य इथे मुळापासून नष्ट
भेदभावाचे पीक आता वाढणार नाय
मराठीचा अभिमान आम्ही सोडणार नाय
जगदंबेची कृपा आणि शिवरायांचे शौर्य
बाळासाहेबांची हाक अन टिळकांचे चातुर्य
संकटाच्या आघाताने आता रडणार नाय
मराठीचा अभिमान आम्ही सोडणार नाय
इंग्रजीचा स्वीकार अन मराठीचा सत्कार
ज्ञानाच्या अमृताने बरे करू अज्ञानाचे विकार
शिक्षणाच्या शस्त्राने आता लढणार हाय
मराठीचा अभिमान आम्ही सोडणार नाय
सागर नवनाथ ननावरे
0 comments:
Post a Comment