Monday, 8 February 2016

बोलणार तोच चालणार

काल परवा  एक मित्र भेटला 
'एक युवा राजकीय नेता'राजकीय वारसा पैसा  आणि दांडगा
 जनसंपर्क असणारा.बर्याच 
दिवसांनी भेटल्यामुळे आमच्या गप्पा रंगल्या. तो सांगू लागला कि नुकत्याच
 झालेल्या पक्षांतर्गत नियुक्तीतून त्याला डावलण्यात आलं त्यामुळे
 थोडासा नाराजही दिसत होता . मी  त्याला विचारलं " भरपूर पैसापानी आहे, मोठा  मित्रपरिवार आहे मग असं कायघडलं कि तुझ्यावर  हि वेळ  आली ?"

तो सांगू लागला पक्षाने  आयोजित केलेल्या कार्यक्रमातकेवळ प्रभावी  भाषण न करता आल्याने कालपरवाच्या नवीन मुलावर जबाबदारी  सोपविण्यात आली.

मनात विचारचक्र सुरु झाले  नेतृत्व आणि कर्तुत्व असतानाही केवळ वक्तृत्व नसल्याने  अनेकदा राजकीय समीकरणे  वेगाने उलट दिशेने धावतात.  सध्याच्या युगात चर्चेचा आणि जिव्हाळ्याचा  असणारा राजकीय विजयरथ फक्त वक्तृत्वकला नसल्याने  जागीच थांबतो. 
राजकारणात ज्यांची भाषणे  प्रभावी असतात असेच लोक लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतात.
असं म्हणतात बोलणार्या  दहा हजारांत एकच वक्ताअसतो आणि हा वक्ताच खर्या अर्थाने चांगला नेता बनतो.  एखाद्या व्यक्तीला राजकारणात यशस्वी व्हायचेअसेल तर  त्याला प्रभावी भाषण करता येणे हे अपरिहार्य आहे. आणि त्यातही इतिहासाचा विचार केला  तर याभाषणकलेने अनेकांना शून्यातून यशोशिखरापर्यंत पोहोचविले आहे. यात  स्व. आचार्य अत्रे,दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख,प्रमोदजी  
महाजन, गोपीनाथरावजी मुंडे आणि महाराष्ट्राची तोफ  बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे सध्याचे पंतप्रधान  नरेंद्र मोदिजी आदी मंडळींनी भाषणकलेनेच तमाम जनमानसावर राज्य केले.

खरं  तर बोलणे हि माणसाची 
सहजप्रवृत्ती असून याच्या जोरावर वेळोवेळी मानवाने  आपले अस्तित्व आणि वर्चस्व सिध्द केले आहे. केवळ  आपल्या प्रभावी बोलण्याने समोरच्या व्यक्तीच्या मनावर  गारुड घालणे हि  उत्तम वक्तृत्वाचीच देणगी आहे.

महाराष्ट्र हे ज्याप्रमाणे कलेचे  आणि कलाकारांचे राज्यआहे त्याचप्रमाणे हे उत्तमोत्तम  वक्त्यांचे जणू माहेरघरचआहे. या महाराष्ट्राच्या मातीने अनेक सुप्रसिध् वक्ते घडविले आणि या वक्त्यांनीच आपल्या प्रभावी वक्तृत्वाने संपूर्ण देशाला आपली दाखल  घेण्यास भाग पाडले.
महाराष्ट्रात राजकीय वकृत्त्वाचे उच्च दर्जाचे  मापदंड आहेत ही आपल्या सर्वांसाठी  अभिमानाची गोष्ट आहे.
सध्याच्या तरुणांत नेतृत्वगुण  दिसून येतो परंतु जर त्याला प्रभावी वक्तृत्वाची जोड मिळाली तर राज्याच्या राजकीय आसमंतावर तेजस्वी तारे उदयास vयेतील.
एक चांगला 'नेता' बनण्याचा  मानस असणारे पण बरेचजण केवळ भाषणकला न जमल्यामुळे शेवटपर्यंत"कार्यकर्ता"च बनून vराहतात.
भाषणाबद्दल वाटणारी  अनावश्यक भीती, नकारात्मक दृष्टीकोन आणि  आत्मविश्वासाचा अभाव या  साऱ्या  गोष्टीच चांगल्या नेतृत्वाला  सतत मागे ठेवतात.
कोणताही राजकीय वारसा  नसणारे अनेक जण केवळ आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर  आपला ठसा उमटवताना दिसतात. तर दुसरीकडे प्रचंड  इच्छाशक्ती,दांडगा जनसंपर्क  आणि शक्तिशाली  राजकीय वारसा असूनदेखील  काही जण इतरांच्या जयजयकारातचआपली कारकीर्द संपवितात,हेच या भाषणकलेचे खरे सामर्थ्य होय.
आपल्याकडे इतरांपेक्षा  कितीही मौलिक विचार असले तरी केवळ भाषणरूपाने ते  मांडता न आल्याने त्या आपल्या विचारांना व्यक्त  होण्यासाठी इतरांच्या वक्तृत्वाचा आधार घ्यावा लागतो. कारण ज्ञान असण्यापेक्षा ते  दिसणं खूप महत्वाचं असतं  आणि हेच दाखविण्याचे प्रभावी साधन  म्हणजेच भाषणकला होय.
आजपर्यंत अनेक योद्ध्यांना  जगावर आपली पकड जमवता आली ती फक्त वक्तृत्व, नेतृत्व आणि  कर्तुत्वाच्याच   जोरावर. उत्तम वक्त्याचे महत्व या जगात फार पूर्वीपासून जोपासले गेले आहे. अनेक राजांनी आपल्या कणखर वाक्तृत्वानेच आपल्या  सैन्याला चेतविले आणि यशस्वी राज्यही केले.  अलेक्झांडर चे  सैन्यही जग जिंकण्यासाठी निघाले होते ते  फक्त त्याच्या प्रभावी आणि कुशल वक्तृत्वामुळेच!
राजकारणाच्या या भाऊगर्दीत आपल्याला जर "राजा"म्हणून  जगायचे असेल तर  भाषणकलेला पर्याय नाही.हजारो इच्छुक आणि शेकडो  उमेदवारांतून आपल्याला जर लाखो लोकांच्या मनावर  अधिराज्य गाजवायचेअसेल तर प्रभावी भाषण कला आत्मसात करणे हि काळाची गरज आहे. अन्यथा  आपल्यातील वक्तृत्वाचा'अभाव' हा  प्रतिस्पर्ध्यांचा 'प्रभाव'  वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतो.
म्हणूनच ज्याप्रमाणे समाजात 'जो शिकला तोच टिकला',त्याचप्रमाणे राजकारणात 'जो बोलणार तोच चालणार' असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.
आपली प्रतिष्ठा, आपला वेळ  आणि आपला पैसा हा भाषण  न जमल्यामुळे इतरांच्या पदरात पाडण्यापेक्षा आपणच  आपल्या यशाचे शिल्पकार ठरू  शकतो ते प्रभावी भाषण कलेनेच.
मित्रांनो जमाना प्रेझेन्टेशनचा  आहे घड्याळाच्या काट्यांमागे काळ धावतोय, बदलाच्या वार्याने फक्तसमाजालाच आणि  परिस्थितीलाच नाही तर राजकारणाला देखील विळखा घातला आहे. 
आणि म्हणूनच बदलत्या राजकीय  समीकरणांत आपलं नाणं ठणकावण्यासाठी 
भाषणकलेसारखी दुसरी संधी नाही.

इतरांच्या भाषणाला आपल्या  हाताचे टाळ बडविण्यापेक्षा आपल्या भाषणांसाठी टाळ्यांच्या कडकडाटाची स्वप्ने प्रत्यक्षात  आणणे केंव्हाही चांगलेच.


0 comments:

Post a Comment

 
;