शाहरुख खानच्या विधानानंतर देशात जी काही शाब्दिक चिखलफेक चाललीय ती भारतासारख्या धर्मनिरपेक्षदेशासाठी अजिबात योग्य नाही. देशात विविध जातीधर्माचे करोडो सर्वसामान्य लोक एकरूप होऊन आणिगुण्यागोविंदाने नांदत आहेत. हे सर्वजण माणुसकी हा धर्म आणि एकता हीच जात मानून धर्मनिरपेक्षतेचे एकआगळे वेगळे उदाहरण जगासमोर ठेवत आहेत. परंतु प्रसिद्धीसाठी आणि स्वार्थासाठी हपापलेले हे दिग्गज, नेतेआणि अभिनेते देशात धार्मिक अराजक माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. यांच्यामुळे भारतासमोर झुकल्या मानेनेराहणारे पाकिस्तान सारखे देशही देशातील अंतर्गत वादात तोंड खुपसत आहेत. शाहरुखनेही अशी वक्तव्ये करून वादनिर्माण करण्यापेक्षा हे लक्षात ठेवायला हवे कि जे लोक प्रेमाने त्याला किंग बनवू शकतात ते त्याला शिंगावरघ्यायलाही कमी करणार नाहीत. धर्मासारख्या भावनिक मुद्द्यांवर राजकारण करून आपल्या देशाचे आणिसमाजाचे खूप मोठे नुकसान हे लोक करीत आहेत. आता सर्वसामान्यांनी या अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याआणि बाष्कळ बडबड करणाऱ्या लोकांकडे लक्ष न देता आपल्या एकतेची आणि बंधुभावाची ज्योत अशीच तेवत ठेवून आपला धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा आदर्श जगासमोर ठेवावा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment