*पत्रकार बांधवांनो काळजी घ्या...*
🎥🎙️🗞️📰📔🖋️🔍📺📻
*पत्रकार हा असा घटक आहे जो समाजात जागृती घडविण्यात आपले योगदान देत असतो. परिस्थिती कशीही असो तो आपले काम प्रामाणिकपणे करीत असतो. मात्र या कोरोनाच्या विळख्यात अनेक पत्रकार बांधवांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोनाच्या संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. मागील दोन आठवड्यात भारतात जवळपास 45 पत्रकारांनी (नामांकित मीडियाचे) आपले प्राण गमावले आहेत.*
*यात छोटया मोठया मीडियाच्या पत्रकारांची गिनती सुद्धा होत नाही. परंतु ते सुद्धा फिल्डवर जाऊन आपले योगदान देत असतात. द प्रेस ऍब्लेम कँपेन' च्या अहवालानुसार आज ही आकडेवारी जाहीर झाली आहे. हाती आलेल्या आकडेवारीपेक्षा मृत्यू झालेल्या पत्रकारांची संख्या अधिक असू शकते.*
*म्हणूनच सर्व पत्रकार बांधवांना(ऑनफिल्ड) सांगणे आहे की काळजी घ्या... पुरेशी खबरदारी घ्या. देशाच्या या चौथ्या स्तंभाला तुमची गरज आहे. कार्य करा पण स्व संरक्षण ही करा... घाबरू नका पण काळजी अवश्य घ्या*
✍🏻 *सागर ननावरे*
www.sagarnanaware.blogspot.com
Subscribe to:
Posts (Atom)