M.A. (pol), D.Ed, MC & Journalism, TC.PEd.
लेखक (स्तंभलेखक): दैनिक प्रभात
व्यक्तिमत्व विकास सदर
पत्रकार : मुक्त पत्रकारिता
व्यवस्थापक : चित्रल प्रशिक्षण संस्था
Friday, 13 January 2017
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा
विसरून सारे हेवेदावे, मिटवु सारा अबोला गोडगुलाबी सण हा आला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
मी व माझ्या परिवारातर्फे आपणांस व आपल्या कुटुंबीयांस मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा
नमस्कार,मी सागर नवनाथ ननावरे (शिक्षण: एम.ए , डी. एड,टी सी पी एड,जर्नालिझम) * प्रभात वर्तमानपत्रात दर रविवारी व्यक्तिमत्व विकास सदरासाठी लेखन. * मटा साहित्यिक मैफिलीत मराठी भाषा दिनानिमित्त काव्यवाचनासाठी विशेष गौरव * 2008 साली लोकसत्ता वर्तमानपत्राकडून प्रथम लेखास प्रसिद्धी व माझ्या लेखनाचा उदयोन्मुख लेखक म्हणून गौरव. * विविध साहित्यिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी मुलाखतीद्वारे ज्ञानात वृद्धीचा सातत्याने प्रयत्न, *2008 साली बाबा आमटे यांच्या आनंदवनात त्यांच्या स्व.धर्मपत्नी साधनाताई आमटे यांची मुलाखत घेण्याचे भाग्य. *कवितालेखानासाठी २००५ पासूनच सुरुवात ,100 पेक्षा अधिक कवितांचे लेखन * 50 हुन अधिक कविता व लेख विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध *गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रातल्या अग्रगण्य वृत्तपत्रांत सातत्याने लेखन प्रसिध्द. * मुंबई मित्र आयोजित साहित्य लेखन स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक* महाराष्ट्र शासनाच्या महामित्र,तसेच केंद्र शासनाच्या भ्रष्टाचारनिर्मुलन,सायबर जागृती आणि इतर विषयांत सक्रीय सहभाग *विविध सामाजिक कार्यांत सहभाग *NGO च्या माध्यमातून विनावेतन अध्यापनाचे कार्य.
माझ्या बहुचर्चित "मनाचा अँटीव्हायरस" या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या जन्मस्थळी किल्ले पुरंदर येथे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. खासदार श्रीमंत संभाजी राजे यांच्या हस्ते पुरंदर गडावरील सभागृहात हे प्रकाशन पार पडले. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे,सिने अभिनेता भरत जाधव, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे आणि इतर अनेक मान्यवर या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. संभाजी महाराज जयंती महाराज जयंतीच्या निमित्ताने पुरंदर प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकाशन सोहळा पार पडला. सदर पुस्तकात व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी प्रेरणादायी असे लिखाण केलेले आहे.
‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
0 comments:
Post a Comment