Friday, 12 December 2014 0 comments
निसर्गाचा समृध्द अनुभव - भोर

विकेंड म्हटल कि धम्मालच धम्माल .आठवडाभरात जॉब नावाच्या सर्कशीतील शारीरिक आणि मानसिक कसरतीनंतर थोडंस निवांत आणि फ्रेश होण्याच वार. प्रत्येकजण आतुरतेने विकेंड ची वाटर पाहत असतो आणि प्रत्येकाचे विकेंद्चे बेतही ठरलेले असतात यात चित्रपट पाहणे,सर्कस,खवय्येगिरी ,तीर्थक्षेत्रे,किल्ले . पण यातूनही सर्वात हटके आणि आनंददायी म्हणजे मनसोक्त भटकंती . दर्याखोर्यातून,डोंगरकपारीतून,दीखोर्यातून आणि निसर्गसानिद्ध्यात . मी ही विकेंड एक अनेक प्रकारे साजरा करतो पण या सर्वात मला भावतो तो 'भोर'ला भटकंतीचा विकेंड.शनिवारी ऑफिस मधून गावाच्या दिशेने म्हणजेच भोरच्या दिशेने प्रवास सुरु होतो एक आल्हाददायक आणि दरवेळी एक नवा अनुभव देणारा.  कात्रज घाट चढताना याची सुरुवात होते कात्रजचा घाट चढून बोगद्यापाशी गेल्यावर संपूर्ण पुण्याचा नजारा दिसतो. आणि यात पूर्ण शहर आपल्याला आशाळभूत नजरेने न्याहाळत आहे आणि आपण त्याला ठेंगा दाखवत ,खिजवत चाललो असल्याचा अविर्भाव निर्माण होतो.
कापूरहोळवरून भोरला जाण्यासाठी टर्न घेतला कि सुरुवात होते निसर्गराजाच्या साम्राज्याची.आजूबाजूला शिवारातील सारी झाडे पिके जणूकाही स्वागतासाठीच हिर्व्लीन्र नटलेली असतात. आणि या हिरव्यागार क्षणांना झळाळी देते ती थंडगार वार्याची झुळूक.
माळवाडीच्या अलीकडे एका अगदी छोट्या घाटाच्या सपाटीवर एक नयनरम्य दृश्य आपले लक्ष वेधून घेते आणि ते म्हणजे  नेकलेस पॉइंट . सारी हिरवळ सर निसर्ग म्हणजे जणूकाही एक सुंदर देखणी स्त्री असून तिच्या गळ्यात नदीच्या रूपाने असणारा गोलाकार हार म्हणजेच नेकलेस पॉइंट. माळवाडीला गेलो कि दोन वाटा आपल्याला चांगल्याच संभ्रमात टाकतात.डावीकडे शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणारे भोर शहर तर उजवीकडे निसर्गदेवतेच्या अदभुत सौंदर्याने भुरळ पाडणारा भाटघर वरील परिसर. भोरच्या अलीकडे - किलोमीटरच्या अंतरावर येळवंडी नदीवर १५० फुट उंचीचा 'भाटघर dam 'येणाऱ्या जाणार्या प्रवाशांना एक प्रसन्न अनुभूती देतो आणि त्यामुळेच तिथे फोटो काढण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. थंडीत हिरव्या डोंगरावर पांघरलेलीपांढ-याशुभ्र धुक्याची  चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टिचासहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा वाऱ्याचा स्पर्श....हे सारं विलोभनीयच. यातून नकळतच ओठावर एक गीत रेंगाळत
 'पंछी सूर मी गाते है,भवरे गुनगुनाते है
 घुंघरू बजती है हवा ...
कैसे मुस्कुराती है, यु फिजा भुलती है
जैसे हो ये मेरी दिलरुबा…'
पुढे शिवरायांच्या शूर मावळ्यांचा तालुका असणारे ठिकाण म्हणजेच भोर शहर . भोर शहरचे राजवैभव म्हणजेच भोरचा प्रसिध्द राजवाडा. राजवैभव जरी सरलं तरी त्या काळाच्या ऐश्वर्याची उच्च अभिरूचीची कल्पना वास्तूच्या रूपातून प्रतीत होते. असे म्हणतात ब्रिटीश सरकारच्या खालसा धोरणामध्ये, हे एकमेव असे संस्थान होते ज्याला ब्रिटीश सरकार खालसा करू शकले नाहीत.संस्थानिक वैभवाची साक्ष देणारा, कलाकुसरीने परिपूर्ण असा वास्तुकलेचा उत्तम नमुना तसेच जनमानसातही आदराचे स्थान असलेला भोरचा राजवाडा हा महाराष्ट्राचा अनमोल वारसा आहे.
भोर म्हणजे पुण्याचे एक मिनी महाबळेश्वरच .विकेंडसाठी नीरा नदीकाठी वसलेले भोर म्हणजे विकेंडसाठी एक समृध्द अनुभव.  सभोवताली सह्याद्रीचे फाटे आणि महाड-पंढरपूर वर असणारा वरंधा घाट म्हणजे निसर्गाचा देखणा चेहराच.बनेश्वर ,राजवाडा,भोरेश्वर देवालय ,किल्ले रोहिदा,विचित्रगड,रामबाग बंगला ,भाटघर धरण आणि समृद्धतेने नटलेला निसर्ग हि या भोर तालुक्याची ओळख. या भोर परिसरात येण्याचा मोह सिनेसृष्टीला देखील आवरला नाही त्यामुळेच इथे अनेक हिंदी,मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे, भविष्यात चित्रीकरणाच्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने भोर परिसराला मोठे महत्व असणार आहे.
निसर्गाबद्दल आपण नेहमीच आपुलकी दाखवतो, आपल्या गप्पा या वायफळ असतात, आपण त्याच्याशी कधी एकरुप होतो का ? ग्लोबल वॉर्मिंगच्या या जमान्यात निसर्गाच्या सान्निध्यात एक मोकळा श्वास घेऊन ताणताणाव नष्ट करायचा असेल तर भोरसारख्या निसर्गाच्या कुशीतील ठिकाणास आपण विकेंडला महिन्यातून एकदा  जायलाच हवे.
 
;